AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘मैत्री धाग्याशी नाही, मैत्री वाघाशी…’, मुंबईत ‘मातोश्री’ परिसरात दोन्ही शिवसेनेत बॅनरवॉर

एकनाथ शिंदे गटाकडून लावण्यात आलेल्या बॅनरवर उद्धव ठाकरे शिवबंधन बांधत असतानाचा फोटो वापरला आहे. त्यामुळे शिवसेना उबाठाला डिवचण्याचा प्रयत्न केल्याची चर्चा रंगली आहे. तसेच या बॅनरवर क्यूआर कोड दिला आहे.

'मैत्री धाग्याशी नाही, मैत्री वाघाशी...', मुंबईत 'मातोश्री' परिसरात दोन्ही शिवसेनेत बॅनरवॉर
मुंबईत शिवसेनेत बॅनरबाजी
Jitendra Zavar
Jitendra Zavar | Updated on: May 03, 2025 | 10:08 AM
Share

मुंबईत शिवसेनेत पुन्हा बॅनरवॉर सुरु झाले आहे. एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि उद्धव ठाकरे यांची शिवसेना यांच्यात बॅनरबाजी वांद्रे भागात सुरु झाली आहे. वांद्रे येथील ‘मातोश्री’समोरच शिवसेनेकडून बॅनर लावण्यात आले आहे. शिंदे यांच्या शिवसेनेकडून ‘मैत्री धाग्याशी नाही, मैत्री वाघाशी’, असे बॅनर लावण्यात आले. बॅनरवर उद्धव ठाकरे शिवसैनिकांना शिवबंधन बांधतानाचा फोटोसुद्धा वापरला आहे. तसेच या बॅनरवर दुसरीकडे एकनाथ शिंदे यांचा फोटो लावला आहे. तसेच बघताय काय? सामील व्हा, असे आवाहन शिवसैनिकांना केले आहे.

एकनाथ शिंदे गटाकडून लावण्यात आलेल्या बॅनरवर उद्धव ठाकरे शिवबंधन बांधत असतानाचा फोटो वापरला आहे. त्यामुळे शिवसेना उबाठाला डिवचण्याचा प्रयत्न केल्याची चर्चा रंगली आहे. तसेच या बॅनरवर क्यूआर कोड दिला आहे. एक मोबाईल क्रमांक दिला आहे. त्यामाध्यमातून शिवसेना सदस्य होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

शिवसेना उबाठाकडून विकास कामांचा बॅनर

एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या बॅनरला उद्धव ठाकरे यांच्याकडून उत्तर देण्यात आले आहे. त्यात वांद्रे येथील पाणी पुरवठ्याचा विषय मांडला होता. वांद्रे पूर्वेला मिळणार ५ एम एल डी अतिरिक्त पाणी, या अशा आशयाची बॅनरबाजी शिवसेना ठाकरे पक्षाकडून लावण्यात आली आहे. यामुळे वांद्रे येथे एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि उद्धव ठाकरे यांची शिवसेना आमनेसामने येतात का? असा प्रश्न विचारला जात आहे. विकास कामांवरून आणि सदस्य नोंदणी वरून दोन्ही पक्षांकडून जोरदार बॅनरबाजी केली गेली आहे.

मुंबईत शिवसेनेचे दोन्ही गट वर्चस्वाची लढाई करत आहे. मुंबई कोणाची? हे महानगरपालिका निवडणुकीत पुन्हा एकदा स्पष्ट होणार आहे. ही निवडणूक अद्याप जाहीर झाली नसली तरी दोन्ही शिवसेनेकडून मुंबई मनपा निवडणुकीची तयारी सुरु केली जात आहे. त्यामुळे मुंबईकर मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न शिवसेना उबाठा आणि शिवसेना एकनाथ शिंदे गटाकडून केला जात आहे.

Follow Us
पुण्यातील डेअरी प्रकरणी मुंबई हायकोर्टाने FDA ला 5 लाखांचा दंड ठोठावला
पुण्यातील डेअरी प्रकरणी मुंबई हायकोर्टाने FDA ला 5 लाखांचा दंड ठोठावला
मोदींच्या पंतप्रधानपदावर राऊतांचे भाकीत; बन यांच्याकडून प्रत्युत्तर
संजय राऊतांचा दावा: पंतप्रधान मोदींचा १७ सप्टेंबरला शेवटचा वाढदिवस असेल
राहुल गांधींनी झारखंडचाही दौरा करावा: चित्रा वाघ यांचे आवाहन
राहुल गांधींनी झारखंडचाही दौरा करावा: चित्रा वाघ यांचे आवाहन
लातूर शाळेतील शासकीय अनास्था आणि गैरव्यवस्थापन: तातडीने कारवाईची मागणी
लातूर शाळेतील शासकीय अनास्था आणि गैरव्यवस्थापन: तातडीने कारवाईची मागणी
पालकमंत्री गोगावलेंना तटकरेंच्या शुभेच्छा अजून नाहीत
पालकमंत्रीपदाच्या शुभेच्छा: भरत गोगावलेंना अजूनही सुनील तटकरेंच्या शुभेच्छांची प्रतीक्षा
आता काही खरं नाही! तुकाराम मुंढेंनी खाद्य तेलाबाबत घोषणा केलीच...
आता काही खरं नाही! तुकाराम मुंढेंनी घोषणा केलीच...  खाद्य तेलाबाबत एफडीएकडून कडक नियमावली
जज साहेब...बाळासाहेबांचे विचार...व्यंगचित्रातून शिंदे गटाचा ठाकरेंवर
जज साहेब...बाळासाहेबांचे विचार...व्यंगचित्रातून शिंदे गटाचा ठाकरे गटावर निशाणा!
पोलिस संरक्षण काढून ये मग... फलटणमध्ये निंबाळकर vs निंबाळकर,
Video : पोलिस संरक्षण काढून ये मग...  फलटणमध्ये निंबाळकर vs निंबाळकर, थेट बुलेटस्वारी करत स्वीकारलं चॅलेंज
गद्दारी करून मलाही आमदारकी... ठाकरेंच्या बड्या नेत्याचं विधान तुफान
गद्दारी करून मलाही आमदारकी... ठाकरेंच्या बड्या नेत्याचं विधान तुफान चर्चेत, असं काही घडलं की...
शिवसेना कोणाची? 2018 ची घटना आणि 19 लाख सदस्यांचा दावा, कोर्टात काय...
शिवसेना कोणाची? 2018 ची घटना आणि 19 लाख सदस्यांचा दावा, कामत यांचा युक्तिवाद, ठाकरेंना जिंकून देणार?