AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘मेळाव्यानंतर महायुतीचे नेते गोंधळलेले, त्यांच्या डोक्यात सडकी…’, संजय राऊत यांचा हल्लाबोल

विजयी मेळाव्यानंतर महायुतीचे नेते गोंधळे आहेत. आता त्यांना रडावेच लागणार आहे. त्यांचा जाहीरपणे रडण्याचा कार्यक्रम महाराष्ट्रात जागोजागी सुरु करा, अशी टीका शिवसेना उबाठा नेते संजय राऊत यांनी केली.

'मेळाव्यानंतर महायुतीचे नेते गोंधळलेले, त्यांच्या डोक्यात सडकी...', संजय राऊत यांचा हल्लाबोल
संजय राऊत
Updated on: Jul 06, 2025 | 10:52 AM
Share

ठाकरे बंधू एकत्र आल्यानंतर महायुतीच्या लोकांची डोकी चालत नाही. त्यामुळे त्यांच्याकडून विचित्र विधान केली जात आहे. त्यांच्या डोक्यात सडकी बटाटे भरली आहेत. शनिवारी झालेल्या विजयी मेळाव्यानंतर महायुतीचे नेते गोंधळे आहेत. आता त्यांना रडावेच लागणार आहे. त्यांचा जाहीरपणे रडण्याचा कार्यक्रम महाराष्ट्रात जागोजागी सुरु करा. आम्ही तुमचे कार्यक्रम लावतो, असा हल्ला शिवसेना उबाठा नेते संजय राऊत यांनी महायुतीवर केला.

अनेक राज्यांतील नेत्यांकडून अभिनंदन

संजय राऊत म्हणाले, विजय मेळाव्यानंतर संपूर्ण देशात हिंदी सक्तीविरोधात वातावरण निर्माण झाले. अनेक राज्याच्या नेत्यांनी उद्धव ठाकरे यांच्याशी संपर्क साधून त्यांचे अभिनंदन केले. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या मेळाव्यानंतर केंद्राच्या हिंदी सक्तीच्या निर्णयाविरोधात लढण्याचे बळ मिळाल्याचे अनेक राज्यातील नेत्यांनी सांगितले. दुसरीकडे महाराष्ट्र मुंबईत एकटवला होता, असे दिसून आले.

राज ठाकरे यांची विधानेही राजकीयच

राज ठाकरे यांचे भाषण राजकीय नव्हते पण उद्धव ठाकरे यांचे राजकीय भाषण झाले? या टीकेवर बोलताना संजय राऊत म्हणाले, राज ठाकरे यांचे भाषण कोणाला कळले असले तर त्यांनीसुद्धा राजकीय भूमिका भाषणात मांडली आहे. सक्ती लावून तर दाखवा…, सत्ता तुमची विधानसभेत असेल, आम्ही रस्त्यावर आहोत…अशी विधाने त्यांनी केली. ही राजकीय विधाने आहेत. बाळासाहेब ठाकरे यांनी ५५ वर्षांपूर्वी हेच विधान केले होते. एअर इंडियात भूमीपुत्रांची भरती केली जात नव्हती. तेव्हा बाळासाहेब म्हणाले होते, तुमची विमाने हवेत आहे, पण मुंबईतील रस्ते आमचे आहेत. हे सुद्धा राजकीय विधान होते.

काय बोलावे हे ठाकरे यांना सांगावे लागत नाही. ठाकरे घराण्यास लेखणी आणि वाणीची परंपरा मिळाली आहे. त्यामुळे महाराष्ट्रावर त्यांनी आपले साम्राज्य निर्माण केले आहे, असे राऊत यांनी म्हटले. एकनाथ शिंदे यांच्या जय गुजरात या घोषणेवर हल्ला करताना ते म्हणाले, शिंदे आता वडे, भजी, कांदा पोहे खात नाही. ते ढोकळा खातात. त्यांच्या नातवाला पण खाऊ घालत आहे. त्यांची दाढी ही नकली आहे. ती महाराजांची दाढी नाही. अमित शहा हे कधीही कापू शकता. त्यांची दाढी ही गद्दारांची आहे. अफजल खानाची आहे, अशी टीका संजय राऊत यांनी केली.

मराठा कार्यकर्ते आणि मंत्री सरनाईक यांच्यात शाब्दिक चकमक, पाहा VIDEO
मराठा कार्यकर्ते आणि मंत्री सरनाईक यांच्यात शाब्दिक चकमक, पाहा VIDEO.
ती कौटुंबिक मुलाखत, त्यावर .. ; मंत्री प्रताप सरनाईकांचा हल्लाबोल
ती कौटुंबिक मुलाखत, त्यावर .. ; मंत्री प्रताप सरनाईकांचा हल्लाबोल.
शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी 24 जुलैला चक्का जाम, बच्चू कडू यांचा इशारा
शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी 24 जुलैला चक्का जाम, बच्चू कडू यांचा इशारा.
जुनी म्हण आहे, मुंबईत ठाकरे..; मनोज जरांगेंचं ठाकरेंच्या युतीवर विधान
जुनी म्हण आहे, मुंबईत ठाकरे..; मनोज जरांगेंचं ठाकरेंच्या युतीवर विधान.
एकनाथ शिंदेंचं नाव सुवर्णाक्षरात का कोरलं जाणार?
एकनाथ शिंदेंचं नाव सुवर्णाक्षरात का कोरलं जाणार?.
गावात कुत्रं विचारत नाही..;अविनाश जाधवांचं भाजप नेत्यांना खरमरीत उत्तर
गावात कुत्रं विचारत नाही..;अविनाश जाधवांचं भाजप नेत्यांना खरमरीत उत्तर.
माझ्या पत्नीच्या नावाने सावली बार, पण..; रामदास कदमांचा खुलासा
माझ्या पत्नीच्या नावाने सावली बार, पण..; रामदास कदमांचा खुलासा.
हनीट्रॅपमुळे शिंदेंचं सरकार आलं; वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
हनीट्रॅपमुळे शिंदेंचं सरकार आलं; वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा.
निशिकांत दुबेने पुन्हा राज ठाकरेंना चिमटी काढली, म्हणाले..
निशिकांत दुबेने पुन्हा राज ठाकरेंना चिमटी काढली, म्हणाले...
भास्कर जाधवांना विरोधी पक्षनेते पद का नाही? राऊतांचा मोठा दावा
भास्कर जाधवांना विरोधी पक्षनेते पद का नाही? राऊतांचा मोठा दावा.