माटुंगा स्टेशनवर तरुणींची छेड काढणाऱ्या विकृतास नितीन नांदगावकरांकडून चोप

माटुंगा स्टेशनवर तरुणींची छेड काढणाऱ्या विकृतास नितीन नांदगावकरांकडून चोप

काही दिवसांपूर्वी माटुंगा रेल्वे स्टेशन येथील पादचारी पुलावर एक विकृत मुलींची छेड काढत असल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला (Nitin Nandgaonkar video viral) होता.

सचिन पाटील

| Edited By:

Feb 17, 2020 | 10:26 PM

मुंबई : काही दिवसांपूर्वी माटुंगा रेल्वे स्टेशन येथील पादचारी पुलावर एक विकृत मुलींची छेड काढत असल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला (Nitin Nandgaonkar video viral) होता. या व्हिडीओमध्ये हा विकृत अश्लील स्पर्श करुन पळ काढत असल्याचे दिसत आहे. पण या विकृताला शिवसेना नेते नितीन नांदगावकर यांनी पकडून चांगलाच चोप दिला आहे. रजिउर खान (37) असं या विकृत तरुणाचे नाव (Nitin Nandgaonkar video viral) आहे.

हा विकृत तरुण रेल्वे स्टेशनवरील पादचारी पुलावर महिलांच्या पार्श्वभागाला स्पर्श करणे, चुंबन घेणे असे अश्लील चाळे करत होता. या घटनेच्या व्हिडीओही सीसीटीव्हीत कैद झाला होता. 26 जानेवारीलाही अनेक महिला प्रवाशांसोबत त्याने अश्लील वर्तन केले होते. त्यानंतर नादगावकरांनी या विकृत तरुणाला पकडून चांगलाच चोप दिला आहे. याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

“हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांचा शिवसैनिक म्हणून महाराष्ट्रातील तमाम माता-भगिंनींच्या संरक्षणाची जबाबदारी घेतो. रयतेच्या राज्यात माता-भगिनींकडे यापुढे कुणी वेड्या वाकड्या नजरेने बघू नये. जिथे जिथे मुलींवर अत्याचार होतील आणि ते नराधम वासनेने पछाडलेले मोकाट फिरत असतील तिथे तिथे जाऊन त्यांना ठोकणार, मग तो कोणत्याही जाती-धर्माचा असुदेत त्याची धिंड काढली जाईल”, असं नादगावकरांनी या व्हिडीओतून सांगितले.

विशेष म्हणजे यापूर्वी मोबाईल, पाकीट चोरी प्रकरणी मुंबई सेंट्रल रेल्वे पोलिसांनी रजिउरला चोरीच्या आरोपाखाली अटक केली आहे.


Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें