AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अजितदादा थोडं उशीरा आले तर, आम्हाला किमान…; शिंदे गटातील नेत्यांनी सांगितली मनातली सल

Ramdas Kadam on Ajit Pawar : शिवसेना शिंदे गटाच्या बड्या नेत्याने अजित पवार यांच्याबाबत एक महत्वाचं विधान केलं आहे. अजित पवार यांच्या महायुतीत येण्याच्या टायमिंगवर या नेत्याने बोट ठेवलं आहे. नेमकं काय म्हणाले? उद्धव ठाकरे यांच्याबाबतही त्यांनी एक विधान केलं आहे. वाचा सविस्तर...

अजितदादा थोडं उशीरा आले तर, आम्हाला किमान...; शिंदे गटातील नेत्यांनी सांगितली मनातली सल
अजित पवार, उपमुख्यमंत्रीImage Credit source: Facebook
| Updated on: Jun 20, 2024 | 5:35 PM
Share

मागच्या पाच वर्षात राज्याच्या राजकारणात मोठे बदल झाले. आधी शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत गेली. त्यानंतर शिवसेनेत फूट पडली. एकनाथ शिंदे आणि समर्थक आमदार भाजपसोबत गेले. त्यानंतर अजित पवार यांनीही भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतला. यामुळे राज्याच्या राजकारणात मोठे बदल झाले. अशाताच अजित पवार यांनी भाजपसोबत जाण्यावर शिवसेना शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी भाष्य केलं आहे. अजितदादा थोडे उशीरा आले असते. बरं झालं असतं. आम्हाला मंत्रिपद मिळाली असती, असं रामदास कदम म्हणालेत.

अजित पवारांबाबत काय म्हणाले?

अजितदादा थोडं उशिरा आले असते. बरं झालं असतं. आम्हाला मंत्रिपदं मिळाली असती. मी माझ्या वक्तव्याची माहिती दिलीय, असं रामदास कदम म्हणाले.

हमाम मै सब नंगे होते है… सुनिल तटकरेंची जागा कुणामुळे आली, हे त्यांना विचारा… सुनिल तटकरे यांना मी निवडून आणलेलं आहे. रायगडमधून धैर्यशील पाटीलला भाजपा लढवण्याची तयारी करत होती. तटकरेंना जागा मिळवून देण्यासाठी आम्ही काय केलं विचारा… तू तुझी लगोंट सांभाळं…, अशा शब्दात रामदास कदम यांनी राष्ट्रवादी अजित पवार गटाचे अमोल मिटकरी यांना सुनावलं आहे.

लोकसभा निवडणुकीवर भाष्य

भाजपच्या वरिष्ठाच्या 15 जागा सोडण्यात आल्या. 18 जागा आमच्या विजयी झालेल्या होत्या. जेवढ्या लढल्या तेवढ्या जागा मिळाल्या. भाजपचा दोन महिन्याधी डिक्लेअर झालं असतं. 13 ते 14 जागा आपल्या आल्या असत्या. नाशिकला भुजबळ बाशिंग बांधून बसले होते. आमचे सिटींग खासदार हटवल्यामुळे जागा कमी झाल्या. तीन ते चार जागा आम्हाला बदलायला लावल्या. त्यामुळे आमच्या चार ते पाच जागा गेल्या, असं रामदास कदम म्हणाले.

श्रीकांत शिंदेंची जागा देवेंद्र फडणवीसांनी जाहीर केली. तुम्ही सर्व्हे केला होता. मग तुमच्या जागा गेल्या कुठे? एकनाथ शिंदेचं नुकसान झालं पर्यायानं भाजपा आणि मोदीजीचं नुकसान झालं आहे. सर्व्हेचं उत्तर भाजपला मिळालेलं आहे, असंही त्यांनी म्हटलं आहे.

डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.