AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

राज्यपालांनी 12 आमदारांच्या फाईलवर सही केली तर पेढे वाटू, संजय राऊतांचा टोला

ही काही बोफोर्स, राफेल किंवा एखाद्या ठेकेदाराची फाईल आहे का? राज्याच्या मंत्रिमडळाने एकमताने मंजूर केलेल्या आमदारांची ही नावे आहेत. | Sanjay Raut

राज्यपालांनी 12 आमदारांच्या फाईलवर सही केली तर पेढे वाटू, संजय राऊतांचा टोला
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि संजय राऊत
Rohit Dhamnaskar
Rohit Dhamnaskar | Updated on: May 25, 2021 | 10:28 AM
Share

मुंबई: राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी त्यांच्या पदाला शोभेणारे काम केले पाहिजे. आता त्यांनी विधानपरिषदेतील 12 आमदारांच्या फाईलवर सही केली की आम्ही पेढे वाटू, अशी खोचक प्रतिक्रिया शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी व्यक्त केली. 12 आमदारांच्या नावाची फाईल भुताने पळवली नसून ती राजभवनातच आहे, हे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे आता राज्यपालांनी त्यावर सही करावी, असे संजय राऊत यांनी म्हटले. (Shivsena leader Sanjay Raut on 12 MLC appointment)

ते मंगळवारी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते. 12 आमदारांच्या नावासंदर्भात इतके दिवस उलटूनही का निर्णय होत नाही? ही काही बोफोर्स, राफेल किंवा एखाद्या ठेकेदाराची फाईल आहे का? राज्याच्या मंत्रिमडळाने एकमताने मंजूर केलेल्या आमदारांची ही नावे आहेत. त्यावर सहा-सात महिने निर्णय होत नाही. ही गोष्ट महाराष्ट्राच्या गतिमान प्रशासनाच्या लौकिकाला साजेशी नाही. राज्यपाल हे राज्याचे प्रमुख असतात. त्यामुळे राज्यपालांनी या गोष्टीचे भान ठेवावे, असे संजय राऊत यांनी म्हटले.

12 आमदारांची यादी राजभवनात ‘सुरक्षित’

राज्यपालनियुक्त 12 नामनिर्देशित आमदारांच्या नियुक्तीचा मुद्दा आता चांगलाच तापला आहे. राज्यपालांना दिलेली 12 आमदारांची यादी भुतांनी पळवली तर नाही ना?, अशी खोचक टिप्पणी शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केली होती. त्यानंतर आता 12 आमदारांची यादी राजभवनात (RajBhavan) सुरक्षित असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

गेल्यावर्षी 6 नोव्हेंबरला महाविकासघाडीतील नवाब मलिक, अमित देशमुख आणि अनिल परब या तीन मंत्र्यांनी राजभवनात जाऊन ही यादी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे सुपूर्द केली होती. मात्र, तेव्हापासून राज्यपालांनी आमदारांच्या नियुक्तीबाबत चकार शब्दही काढलेला नाही. या पार्श्वभूमीवर माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली यांनी राज्यपाल सचिवालयाकडे 12 आमदारांच्या नावाचा यादी मागितली होती.

मात्र, सचिवालयाने अशी यादी उपलब्ध नसल्याचे म्हटले होते. त्यामुळे यावरुन राजकारण सुरु झाले होते. अखेर गोपनीयतेच्या कारणामुळे राजभवनाला ही यादी देता येणे शक्य नसल्याचे स्पष्टीकरण सचिवालयाकडून देण्यात आले होते. मात्र, आता 12 आमदारांची ही यादी राजभवनातच असल्याने राज्यपाल कोश्यारी त्याबाबत काही निर्णय घेणार का, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. तर दुसरीकडे उच्च न्यायालयानेही राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना स्पष्टीकरण देण्याचे निर्देश दिले आहेत.

संबंधित बातम्या:

संजय राऊतांची राज्यपालांवरील टीका हा पोरखेळ; देवेंद्र फडणवीसांनी फटकारले

राजभवनात भुताटकीचा वावर, एकदा शांतीयज्ञ करून घ्या, शिवसेनेचं टीकास्त्र

सर्जिकल स्ट्राईकही 24 तासात झाला होता, पण राज्यपालांचं संशोधन सुरूच; राऊतांची खोचक टीका

(Shivsena leader Sanjay Raut on 12 MLC appointment)

Follow Us
मेट्रो कधी सुरू होणार? हिंजवडीच्या IT कर्मचाऱ्यांचा संताप, म्हणाले...
मेट्रो कधी सुरू होणार? हिंजवडीच्या IT कर्मचाऱ्यांचा संताप, म्हणाले...
दुष्काळग्रस्त शेतकरी मदतीवरून रोहित पवार आक्रमक; सरकारला दिला...
दुष्काळग्रस्त शेतकरी मदतीवरून रोहित पवार आक्रमक; सरकारला दिला आंदोलनाचा इशारा
ज्ञानेश कुमार यांच्या आग्रा निवासस्थानाबाहेर आंदोलन, काँग्रेसच्या...
ज्ञानेश कुमार यांच्या आग्रा निवासस्थानाबाहेर आंदोलन, काँग्रेसच्या नेत्यांना अटक
Thane Case : ठाण्यात ठाकरेंच्या पदाधिकाऱ्याला संपवलं, CCTV फुटेज समोर
Thane Case : ठाण्यात ठाकरेंच्या पदाधिकाऱ्याला संपवलं, CCTV फुटेज समोर
छत्रपती संभाजीनगराचे नाव पुन्हा औरंगाबादच करावे; बड्या नेत्याच्या...
छत्रपती संभाजीनगराचे नाव पुन्हा औरंगाबादच करावे; बड्या नेत्याच्या विधानाने खळबळ, मनसे आक्रमक
मतदार नोंदणीबाबत मोठी बातमी! Form 6 ची जुनी ऑनलाइन प्रक्रिया सुरू
मतदार नोंदणीबाबत मोठी बातमी! Form 6 ची जुनी ऑनलाइन प्रक्रिया पुन्हा सुरू; अतिरिक्त...
सचिन वाझेचा जामीन कायम राहणार? कोर्टाने पुन्हा सुनावणी नाकारली; कारण..
सचिन वाझेचा जामीन कायम राहणार? कोर्टाने पुन्हा सुनावणी नाकारली; कारण...
कर्जमाफीचा तिसरा हप्ता आला; शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट पैसे जमा...
मोठी बातमी! कर्जमाफीचा तिसरा हप्ता आला; शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट पैसे जमा...
AI चं नाव बदललं? डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; आता...
Donald Trump : AI चं नाव बदललं? डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; आता Artificial Intelligence नव्हे तर....
अरबी समुद्रात ड्रग्ज तस्करांना झटका! एवढे किलो हेरॉईन-मेथाफेमाईन जप्त
Lakshadweep : अरबी समुद्रात ड्रग्ज तस्करांना मोठा झटका! तब्बल एवढे किलो हेरॉईन-मेथाफेमाईन जप्त; थेट पाकिस्तानी...