प्रताप सरनाईकांना आणखी एक धक्का, पूर्वेश सरनाईक ईडीच्या रडारवर

Namrata Patil

|

Updated on: Dec 13, 2020 | 8:08 AM

प्रताप सरनाईक यांचे सुपूत्र पूर्वेश सरनाईक यांना गुरुवारी ईडीने नोटीस बजावली आहे. (MLA Pratap Sarnaik Son Purvesh Sarnaik On ED radar)

प्रताप सरनाईकांना आणखी एक धक्का, पूर्वेश सरनाईक ईडीच्या रडारवर

Follow us on

मुंबई : शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांना ईडीने आणखी एक धक्का दिला आहे. प्रताप सरनाईक यांचे धाकटे पूत्र पूर्वेश सरनाईक हेही ईडीच्या रडारवर असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. विशेष म्हणजे पूर्वेश सरनाईक यांनाही ईडीने नोटीस बजावल्याची शक्यता आहे. मात्र अद्याप याबाबत कोणतीही माहिती मिळालेली नाही. (MLA Pratap Sarnaik Son Purvesh Sarnaik On ED radar)

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रताप सरनाईक यांचे धाकटे सुपूत्र पूर्वेश सरनाईक यांना गुरुवारी (10 डिसेंबर) ईडीने नोटीस बजावली आहे. यात त्यांना चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. टॉप्स सिक्युरिटी गैरव्यवहाराबाबत ही चौकशी करण्यात येत आहे. तसेच यात आणखी काही परदेशी व्यवहारही झाले आहेत, याचीही ईडीकडून चौकशी केली जात आहे.

ईडीला दोन क्रेडीट कार्ड सापडले असून ते दोन्ही विदेशी असल्याचे सांगितले जात आहेत. या दोन्ही क्रेडीट कार्डची इंट्री भारतात केली जात नाही. या क्रेडीट कार्डच्या खात्यात किती पैसे आहेत, किती व्यवहार झाले आहेत, याबाबत ईडीकडून चौकशी केली जाणार आहे.

दरम्यान याआधी ईडीकडून प्रताप सरनाईक आणि मुलगा विहंग सरनाईक यांना नोटीस बजावण्यात आली होती. यात त्यांना चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेशही दिले होते. तसेच गुरुवारी (10 डिसेंबर) ईडीच्या अधिकाऱ्यांकडून प्रताप सरनाईक यांची चौकशीही करण्यात आली. यावेळी तब्बल सहा तास त्यांची चौकशी चालली. या चौकशीत त्यांना अनेक प्रश्न विचारण्यात आले. (MLA Pratap Sarnaik Son Purvesh Sarnaik On ED radar)

सरनाईक यांना कोणते प्रश्न विचारले?

प्रताप सरनाईक ईडी कार्यालयात पोहोचल्यानंतर ईडीच्या अधिकाऱ्यांनी त्यांची चौकशी सुरु केली. यावेळी त्यांनी टॉप्स सेक्यूरिटीच्या कथित आर्थिक गैरव्यवहाराबाबत विचारण्यात आलं. तसेच, त्यांना कौटूंबिक माहितीही विचारण्यात आली. तुमच्या कुटुंबात कोण-कोण आहेत?, ते काय करतात?, असे प्रश्न त्यांना विचारण्यात आले. तसेच, त्यांच्या आतापर्यंतच्या राजकीय प्रवासाबाबतही सरनाईक यांना विचारण्यात आल्याची माहिती आहे.

सरनाईक कुटुंबाला अटकेपासून संरक्षण

मिळालेल्या माहितीनुसार शिवसेना आमदार प्रताप सरनाईक आणि त्यांचे पुत्र विहंग सरनाईक यांना ईडीने अनेकवेळा समन्स बजावले होते. मात्र, दोघेही ईडी कार्यालयात हजर झाले नव्हते. त्यानंतर, सर्वोच्च न्यायालयाने प्रताप सरनाईक यांना अटकेपासून संरक्षण दिलेले आहे. कोर्टाने आपल्या आदेशात प्रताप सरनाईक यांची तसेच त्याच्या कुटुंबीयांची चौकशी करण्याचे अधिकार ईडीला दिलेले आहेत. मात्र, सरानईक यांना अटक करता येणार नाही, असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. या आदेशानंतर प्रताप सरनाईक गुरुवारी (10 डिसेंबर) ईडीसमोर हजर झाले. यावेळी ईडीच्या अधिकाऱ्यांनी सरनाईक यांना अनेक प्रश्न विचारले.

सरनाईक यांच्या घर, कार्यालयावर छापे

ईडीने 24 नोव्हेंबर रोजी प्रताप सरनाईक आणि त्यांचे सुपुत्र विहंग आणि पूर्वेश सरनाईक यांचे घर आणि कार्यालयावर छापे मारले होते. त्यानंतर विहंग यांची ईडीने पाच तास चौकशी केली होती. ईडीने सरनाईक यांचे घर, कार्यालय आणि हॉटेलसह विविध 10 ठिकाणांवर छापे मारले होते. त्यावेळी सरनाईक भारताबाहेर होते. (MLA Pratap Sarnaik Son Purvesh Sarnaik On ED radar)

संबंधित बातम्या : 

Pratap Sarnaik | दोन दिवसांपूर्वी चौकशी, आता प्रताप सरनाईकांना पुन्हा ईडीचा समन्स

प्रताप सरनाईकांची तब्बल 6 तास चौकशी, ईडीकडून कोणते प्रश्न? सरनाईकांची प्रतिक्रिया काय?

Non Stop LIVE Update

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI