मिलिंद नार्वेकर तिरुमाला तिरुपती देवस्थानच्या बैठकीस उपस्थित, मंदिराच्या अध्यक्षांचा सिद्धिविनायकाची प्रतिकृती भेट देऊन सत्कार

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे विश्वासू सहकारी आणि शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर (Milind Narvekar) यांनी आज आंध्र प्रदेशतील तिरुमाला तिरुपती देवस्थानच्या पहिल्या बैठकीला हजेरी लावली.

मिलिंद नार्वेकर तिरुमाला तिरुपती देवस्थानच्या बैठकीस उपस्थित, मंदिराच्या अध्यक्षांचा सिद्धिविनायकाची प्रतिकृती भेट देऊन सत्कार
मिलिंद नार्वेकर

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे विश्वासू सहकारी आणि शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर (Milind Narvekar) यांनी आज आंध्र प्रदेशतील तिरुमाला तिरुपती देवस्थानच्या पहिल्या बैठकीला हजेरी लावली. यावेळी त्यांनी तिरुमाला तिरुपती देवस्थानचे अध्यक्ष वाय. व्ही. सुब्बा रेड्डी यांची भेट घेतली. मिलिंद नार्वेकर यांनी त्यांना सिद्धिविनायकाची मूर्ती महाराष्ट्रातर्फे भेट दिली. मिलिंद नार्वेकर यांनी काल आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी (Y S Jaganmohan Reddy) यांची भेट घेतली. यावेळी नार्वेकर यांच्यासोबत त्यांचा परिवार, आणि पक्षाचे सचिव सुरज चव्हाणही होते. तिरुमला तिरुपती देवस्थान (Tirumala Tirupati Devasthan Trust) बोर्डावर सदस्य म्हणून नियुक्ती केल्याबद्दल नार्वेकर यांनी जगनमोहन रेड्डी यांचे आभार मानले होते.

महाराष्ट्रातून मिलिंद नार्वेकर यांना संधी

देशातील सर्वाधिक लोकप्रिय आणि श्रीमंत देवस्थान तिरुमला तिरुपती देवस्थान ट्रस्टच्या सदस्यांची यादी 16 सप्टेंबर रोजी आंध्र प्रदेश सरकारने जाहीर केली. या यादीत देशभरातून 24 व्यक्तींची नियुक्ती केली जाते. महाराष्ट्रातून या यादीत शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर यांना सदस्य म्हणून नियुक्त करण्यात आलं आहे.

ठाकरेंचा रेड्डींना फोन

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Maharashtra CM Uddhav Thackeray) यांनी आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री आणि वायएसआर काँग्रेसचे प्रमुख वाय एस जगनमोहन रेड्डी यांच्याशी फोनवरुन संवाद साधला. त्यानंतर महाराष्ट्रातून मिलिंद नार्वेकर यांची अधिकृत नियुक्ती जाहीर करण्यात आली होती.

आंध्र प्रदेश सरकारने त्याप्रमाणे 16 सप्टेंबर रोजी अधिकृत अधिसूचना काढत तिरुमला तिरुपती देवस्थान ट्रस्टच्या नवीन सदस्यांच्या नावांची यादी जाहीर केली. शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर यांच्या खांद्यावर याआधीच मुंबई क्रिकेट संघटनेच्या मुंबई प्रीमिअर लीग (MPL) गव्हर्निंग कौन्सिलच्या अध्यक्षपदाची धुरा आहेच. त्यानंतर आता देशातील सर्वात श्रीमंत देवस्थानाच्या ट्रस्टवर सदस्य म्हणून मिलिंद नार्वेकर यांची नियुक्ती जाहीर झाली. त्यामुळे शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर यांचं वलय आता देश पातळीवर विस्तारल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाली होती.

इतर बातम्या:

ज्या तिरुपती देवस्थानच्या ट्रस्टपदी मिलिंद नार्वेकरांची नियुक्ती झालीय, तो नेमका काय आहे? सर्वात श्रीमंत ट्रस्टचा कारभार कसा चालतो?

मिलिंद नार्वेकर जगनमोहन रेड्डींच्या भेटीला, ‘या’ कारणासाठी मानले आभार

Shivsena Secretary Milind Narvekar Attended the first board meeting of the Tirumala Tirupati Devasthanams conducted by Chairman Y V Subba Reddy

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI