Eknath Shinde : एअरपोर्ट ते ताज प्रेसिडंट हॉटेल.. एकनाथ शिंदेंसोबत आलेल्या आमदारांचा प्रवास, कडेकोट सुरक्षा आणि जंगी स्वागत..

या आमदारांसाठी बसची व्यवस्था करण्यात आली होती. विशेष कॉरिडॉरअंतर्गत सर्व रस्ता रिकामा करण्यात आला होता. अनेक ठिकाणी बॅरिकेड्स (Barricades) लावण्यात आले होते.

Eknath Shinde : एअरपोर्ट ते ताज प्रेसिडंट हॉटेल.. एकनाथ शिंदेंसोबत आलेल्या आमदारांचा प्रवास, कडेकोट सुरक्षा आणि जंगी स्वागत..
बंडखोर आमदारांसह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
Image Credit source: tv9
प्रदीप गरड

|

Jul 02, 2022 | 9:21 PM

मुंबई : शिवसेनेचे बंडखोर आमदार (Rebel mlas) मुंबईत दाखल झाले. मुंबई विमानतळावर त्यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) त्यांच्यासोबत होते. तर भाजपाचे प्रसाद लाड यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी वेस्टर्न एक्स्प्रेस हायवेवर विशेष कॉरिडॉर करण्यात आला होता. या आमदारांसाठी बसची व्यवस्था करण्यात आली होती. विशेष कॉरिडॉरअंतर्गत सर्व रस्ता रिकामा करण्यात आला होता. अनेक ठिकाणी बॅरिकेड्स (Barricades) लावण्यात आले होते. विमानतळापासून ताज प्रेसिडेंटपर्यंतचा रस्ता रिकामा करण्यात आला होता. पोलिसांकडून चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. दरम्यान, हा रस्ता कधीही रिकामा नसतो. कोविड काळ वगळता या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहनांची ये-जा असते. मात्र आज आमदारांसाठी हा रस्ता मोकळा करण्यात आला. वरळी सी लिंकदेखील बंद ठेवण्यात आला होता.

बसच्या मागे-पुढे पोलिसांची सुरक्षा

तीन बसेसमधून कडेकोट सुरक्षा व्यवस्थेत आमदार हॉटेल ताज प्रेसिडेंटकडे रवाना होत आहे. प्रत्येक बसच्या मागे-पुढे पोलिसांचे वाहन धावत होते. तब्बल 30 ते 40 पोलिसांच्या गाड्यांचा ताफा या आमदारांच्या सोबत होता. शिवाय रस्त्याच्या कडेलादेखील काही अंतरावर पोलीस उभे असलेले पाहायला मिळत होते.

reb 2

बंडखोर आमदारांचं मुंबई विमानतळावर स्वागत

मुंबईकरांचा खोळंबा

आमदारांच्या गाड्यांचा ताफा जसजसा पुढे जात होता, तसे रस्ते मोकळे केले जात होते. सामान्य नागरिकांचा यामुळे खोळंबा झाला होता. मात्र शिवसैनिकांच्या संभाव्य आक्रमक पवित्र्यानंतर पोलीस सतर्क झालेले पाहायला मिळाले. ताज प्रेसिडेंटमध्ये या आमदारांची बस पोहोचल्यानंतर त्यांचे स्वागत देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील आदी महत्त्वाचे भाजपा नेते स्वागत करणार आहेत. आमदारांच्या पीएंनाही हॉटेलमध्ये सोडले जाणार नाही. दरम्यान, ज्या ठिकाणी या बंडखोर आमदारांचा मुक्काम असणार आहे, त्या हॉटेल प्रेसिडेंटच्या परिसरात तब्बल 170हून अधिक पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आलेला आहे. कोणालाही याठिकाणी प्रवेश दिला जाणार नाही. सुरक्षाव्यवस्था चोख असणार आहे. सुरत, गुवाहाटी, गोव्यानंतर आता हे आमदार मुंबईत पोहोचले आहेत.

हे सुद्धा वाचा

आमदारांच्या गाड्यांचा ताफा

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें