AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

तारीख बदलली तरी आमदारांची गुवाहाटी दौऱ्याला दांडी; काहींना बदनामीची भीती तर काहींना…

शिंदे गटाचा आज आणि उद्याचा गुवाहाटी दौरा आहे. काही आमदारांनी वैयक्तिक कारण देऊन या दौऱ्याला जाणार नसल्याचं स्पष्ट केलं आहे.

तारीख बदलली तरी आमदारांची गुवाहाटी दौऱ्याला दांडी; काहींना बदनामीची भीती तर काहींना...
तारीख बदलली तरी आमदारांची गुवाहाटी दौऱ्याला दांडीImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Nov 26, 2022 | 9:15 AM
Share

मुंबई: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबतचे 50 आमदार तसेच 12 खासदार गुवाहाटीला जाणार आहेत. गुवाहाटीला जाऊन हे आमदार आणि खासदार कामाख्या देवीचं दर्शन घेणार आहेत. मात्र, यातील बरेच आमदार आणि खासदार गुवाहाटीला जाणार नाहीत. विशेष म्हणजे गुवाहाटी दौऱ्याची तारीख बदलल्यानंतरही काही आमदार आणि खासदारांनी या दौऱ्यावर जाणं टाळल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार काहींना बदनामीची भीती वाटत आहे तर काहींची शिंदे यांच्यावर नाराजी असल्याने त्यांनी या दौऱ्यापासून दूर राहणं पसंत केलं आहे. तर काहींचे नियोजित कार्यक्रम आणि घरगुती कार्यक्रम आहेत. त्यामुळे या आमदारांनी गुवाहाटीला न जाण्याचा निर्णय घेतला आहे.

शिंदे गटाचा आज आणि उद्याचा गुवाहाटी दौरा आहे. काही आमदारांनी वैयक्तिक कारण देऊन या दौऱ्याला जाणार नसल्याचं स्पष्ट केलं आहे. काही मंत्री त्यांच्या कार्यक्रमात व्यस्त असल्याने ते गुवाहाटीला जाणार नाहीत.

तर काही आमदार नाराज असल्याने हा दौरा करत नसल्याची चर्चा आहे. तर काही बदनामीच्या भीतीने जात नसून ढोबळ कारणे पुढे करत असल्याची चर्चा आहे. एकूण तीन मंत्री आणि तीन आमदार या दौऱ्याला जाणार नाहीत.

विशेष म्हणजे हा दौरा आधी 21 नोव्हेंबर रोजी होणार होता. मात्र, सर्वांच्या सोयीसाठी ही तारीख बदलून 26 नोव्हेंबर करण्यात आली. त्यानंतरही काही आमदार गुवाहाटीला जाणार नसल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.

शिंदे गटाचे आमदार दादा भुसे, आमदार संजय गायकवाड आणि सुहास कांदे दोघेही गुवाहाटीला जाणार आहेत. तथापि शिंदे गटाचे मंत्री अब्दुल सत्तार यांचा नाशिक दौरा अचानक आल्याने ते गुवाहाटीला जाणार नाही अशी माहिती आहे. सत्तार हे गुवाहाटीला जाणार नसल्याने एकच चर्चा रंगली आहे.

पाचोरा येथील आमदार किशोर पाटील गुवाहाटीला जाणार आहेत. पारोळ्याचे आमदार चिमणराव पाटील हेही गुवाहाटीला जाणार आहेत. मात्र, पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील हे सुद्धा गुवाहाटीला जाणार नाहीत. ते जळगावमध्येच थांबणार आहेत. तर आमदार लताताई सोनवणे या गुवाहाटीला जाणार की नाही हे अनिश्चित आहे.

मुक्ताईनगरचे अपक्ष आमदार चंद्रकांत पाटील गुवाहाटीला जाणार नाहीत. महत्त्वाची कामे आणि लग्न समारंभामुळे ते गुवाहाटीला जाणार नाहीत. आरोग्य मंत्री तानाजी सावंत हे आज दुपारी 2 वाजेपर्यंत पुण्यात आहेत. 27 व 28 तारखेला त्यांच्या परंडा मतदारसंघात आरोग्य शिबीर असल्याने ते गुवाहाटीला जाणार नाहीत.

साताऱ्याचे पालकमंत्री शंभुराज देसाई आणि कोरेगावचे आमदार महेश शिंदे यांचा गुवाहाटी दौरा रद्द झाला आहे. आगामी ग्रामपंचायत निवडणुकीच्या कारणास्तव दौरा रद्द केल्याची आमदार महेश शिंदे यांनी फोनवरून दिली माहिती. शंभूराज देसाई यांच्या घरातील मंगलकार्य असल्याने ते देखील जाणार नाहीत.

आमदारांपाठोपाठ काही खासदारही या दौऱ्यावर जाणार नाहीत. शिरूरचे माजी खासदार शिवाजी आढळराव पाटील आणि मावळचे खासदार श्रीरंग बारणे गुवाहाटीला जाणार नाहीत. नियोजित कार्यक्रम असल्याने बारणे गुवाहाटीला जाणार नाहीत.

गुवाहाटीला न जाणारे

1) तानाजी सावंत 2) चंद्रकांत पाटील (अपक्ष) 3) सौ लताताई सोनवणे (अनिश्चित) 4) गुलाबराव पाटील 5) शंभुराज देसाई 6) महेश शिंदे 7) अब्दुल सत्तार 8) संजय गायकवाड 9) श्रीरंग बारणे (खासदार) 10) शिवाजी आढळराव पाटील (माजी खासदार)

Follow Us
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
Abhijeet Dipke : ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी...
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?