ज्या जजनं अनिल देशमुखांचं घरचं जेवण बंद केलं, त्यांची थेट यवतमाळला बदली

न्यायाधीश एच. एस. सातभाई यांनी देशमुख यांना आधी तुरुंगातील जेवण घ्या, अशा शब्दात फटकारतदेशमुखांचा विनंती अर्ज फेटाळून लावत 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली होती.

ज्या जजनं अनिल देशमुखांचं घरचं जेवण बंद केलं, त्यांची थेट यवतमाळला बदली
अनिल देशमुख
Follow us
| Updated on: Nov 17, 2021 | 12:14 PM

मुंबई: राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी कोठडीत घरचे जेवण देण्याची केलेली मागणी मुंबईतील विशेष सत्र न्यायालयाकडून फेटाळण्यात आली होती. न्यायाधीश एच. एस. सातभाई यांनी देशमुख यांना आधी तुरुंगातील जेवण घ्या, अशा शब्दात फटकारत देशमुखांचा विनंती अर्ज फेटाळून लावत 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली होती. मुंबई उच्च न्यायालयाकडून दुसऱ्याच दिवशी न्यायाधीश एच. एस. सातभाई यांची यवतमाळ जिल्ह्यातील केळापूर तालुका कोर्टात बदली करण्यात आली आहे.

प्रशासकीय कारणांसाठी बदली?

मुंबई हायकोर्टानं 15 नोव्हेंबरला न्यायाधीश एच. एस. सातभाई यांची प्रशासकीय कारणांमुळे तातडीनं बदली करण्यात येत असल्याचा आदेश जारी केला. सातभाई यांची यवतमाळच्या केळापूर तालुक्यातील सत्र न्यायालयात न्यायाधीश म्हणून बदली करण्यात आली आहे. सातभाई यांच्या बदलीला सुप्रीम कोर्टानं देखील 13 नोव्हेंबरला संमती दिली आहे.

मोठ्या राजकीय नेत्यांच्या केसेसची सुनावणी

न्यायाधीश एच. एस. सातभाई यांच्या समोर राज्यातील बड्या राजकीय नेत्यांच्या प्रकरणांची सुनावणी झाली होती. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते मंत्री छगन भुजबळ, एकनाथ खडसे आणि अनिल देशमुख यांच्या प्रकरणाची सुनावणी सातभाई यांच्या समोर झाली. एच. एस. सातभाई यांनी 9 सप्टेंबर 2021 रोजी छगन भुजबळ आणि त्यांचा पुतण्या पंकज भुजबळ यांना महाराष्ट्र सदन घोटाळ्यातून निर्दोष मुक्त केलं होतं. शिवसेनेचे माजी खासदार आनंदराव अडसूळ यांच्याही अटकपूर्व जामिनाची सुनावणी सातभाई यांच्या समोर प्रलंबित आहे.

सातभाई तातडीनं वैद्यकीय रजेवर

मुंबई हायकोर्टाकडून बदलीचा आदेश मिळताच न्यायाधीश एच. एस. सातभाई यांनी वैद्यकीय रजेचा अर्ज दिला असून ते वैद्यकीय रजेवर गेले आहेत.

इतर बातम्या:

आधी तुरुंगातील जेवण घ्या, अनिल देशमुखांना कोर्टाने फटकारले; घरचे जेवण देण्याची मागणी फेटाळली

माजी गृहमंत्री अनिल देशमुखांचा जेलमधील मुक्काम पुन्हा वाढला; 29 नोव्हेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी

अनिल देशमुखांची ईडी कोठडी संपणार, जामीन मिळणार का?

Special court judge H S Satbhai transfer to Yavatmal who told Anil Deshmukh take food of Jail

Non Stop LIVE Update
शिंदेंनी शब्द दिला म्हणून गुवाहाटीला, नाहीतर... बच्चू कडू काय म्हणाले?
शिंदेंनी शब्द दिला म्हणून गुवाहाटीला, नाहीतर... बच्चू कडू काय म्हणाले?.
मस्तीत आलेल्यांना... आमदार बच्चू कडू यांचं भाजप कार्यकर्त्यांना आवाहन
मस्तीत आलेल्यांना... आमदार बच्चू कडू यांचं भाजप कार्यकर्त्यांना आवाहन.
लोकसभेच्या 16 लढती फिक्स, कुठं कोणासोबत होणार थेट फाईट?
लोकसभेच्या 16 लढती फिक्स, कुठं कोणासोबत होणार थेट फाईट?.
धैर्यशील माने यांना हातकणंगलेतून पुन्हा तिकीट मिळणार का? काय म्हणाले
धैर्यशील माने यांना हातकणंगलेतून पुन्हा तिकीट मिळणार का? काय म्हणाले.
प्रकाश आंबेडकर यांची 'मविआ'शी फारकत... जरांगे पाटील यांच्यासोबत आघाडी?
प्रकाश आंबेडकर यांची 'मविआ'शी फारकत... जरांगे पाटील यांच्यासोबत आघाडी?.
साताऱ्यात उदयनराजेंचं पुन्हा कमळ, नाशकात छगन भुजबळ? लोकसभा कोण लढणार?
साताऱ्यात उदयनराजेंचं पुन्हा कमळ, नाशकात छगन भुजबळ? लोकसभा कोण लढणार?.
उद्धव ठाकरेंची यादी जाहीर अन काँग्रेससोबत खटके, या दोन जागेवरून हंगामा
उद्धव ठाकरेंची यादी जाहीर अन काँग्रेससोबत खटके, या दोन जागेवरून हंगामा.
माळशिरसच्या मोहिते पाटलांचं ठरलंय, हाती तुतारी घेणार? पवारांसोबत जमलंय
माळशिरसच्या मोहिते पाटलांचं ठरलंय, हाती तुतारी घेणार? पवारांसोबत जमलंय.
नवनीत राणांचा प्रचार करणार? बच्चू कडू म्हणाले, 'त्यांच्या बापाची...'
नवनीत राणांचा प्रचार करणार? बच्चू कडू म्हणाले, 'त्यांच्या बापाची...'.
'मोदी आणि माझ्यात वाद नाही'; केंद्रीय मंत्री गडकरींची EXCLUSIVE मुलाखत
'मोदी आणि माझ्यात वाद नाही'; केंद्रीय मंत्री गडकरींची EXCLUSIVE मुलाखत.