AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मुंबईकरांनो थर्टी फस्टला करा रात्रभर भटकंती, तुमच्यासाठी मध्यरात्री विशेष लोकल

mumbai railway mega block | सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी आणि नववर्षाचे उत्साहात स्वागत करण्यासाठी मुंबईकर सज्ज झाले आहेत. मुंबईकरांसाठी रेल्वेने चांगला निर्णय घेतला आहे. आज मध्यरात्री विशेष लोकल फेऱ्या चालवणार आहे. यामुळे मुंबईकरांना रात्रभर भटकंतीचा आनंद घेता येणार आहे.

मुंबईकरांनो थर्टी फस्टला करा रात्रभर भटकंती, तुमच्यासाठी मध्यरात्री विशेष लोकल
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Dec 31, 2023 | 10:51 AM
Share

मुंबई, दि. 31 डिसेंबर 2023 | रविवार आला म्हणजे मेगा ब्लॉकची सवय मुंबईकरांना झाली आहे. मध्य, पश्चिम आणि हर्बर मार्गावर विविध तांत्रिक आणि देखभाल दुरुस्तीच्या कामांकरीता मेगा ब्लॉक घेतला जातो. मेगा ब्लॉकमुळे लोकल कमी धावतात. त्यामुळे सुट्टीच्या दिवशी बाहेर फिरताना अनेकांना मेगा ब्लॉकचा फटका बसतो. यंदा वर्षाअखेर रविवारी आला आहे. ३१ डिसेंबर रोजी मेगा ब्लॉक असता तर अनेकांना थर्टी फस्ट साजरा करताना अडचणी आल्या असत्या. यामुळे आज मेगा ब्लॉक रद्द करुन काही विशेष फेऱ्या चालवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे मुंबईकरांना रात्रभर भटकंती करता येणार आहे.

मध्य रेल्वेकडून असा असणार बदल

वर्षातील शेवटचा रविवार असल्यामुळे कामांसाठी मध्य आणि हार्बरवर मार्गावर ब्लॉक असणार आहे. यावेळी काही फेऱ्या रद्द केल्या आहेत. परंतु ३१ डिसेंबर पाहता मध्य रेल्वेने रात्री विशेष लोकल चालवण्याचा निर्णय घेतला आहे. यंदाच्या वर्षातील शेवटच्या दिवस रविवार आल्यामुळे हा निर्णय घेण्यात आहे.

पश्चिम रेल्वेचा मेगा ब्लॉक रद्द

३१ डिसेंबरमुळे प्रवाशांची होणारी गर्दी पाहता पश्चिम रेल्वेने आजचा ब्लॉक रद्द केला आहे. मध्य रेल्वेने मात्र माटुंगा ते मुलुंड आणि पनवेल ते वाशीदरम्यान आज मेगाब्लॉक घोषित केला आहे. या ब्लॉकमुळे काही लोकल फेऱ्या रद्द राहणार असून काही लोकल फेऱ्या विलंबाने धावणार आहेत. प्रवाशांची गर्दी रात्रीच होणार असल्यामुळे रात्री विशेष फेऱ्या सुरु राहणार आहे.

विशेष लोकल धावणार

आज मध्यरात्रीनंतर चर्चगेट ते विरार दरम्यान 8 विशेष लोकल धावणार आहे. तसेच पनवेल ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस दरम्यान 12 विशेष गाड्या सोडण्यात येणार आहेत. मध्य रेल्वेही विशेष लोकल सोडणार आहे. यामुळे मुंबईकरांना थर्टी फस्ट आणि नववर्षाचा आनंद घेता येणार आहे. लोकल प्रमाणे बेस्टची सेवा रात्री सुरु राहणार आहे.

बेस्टची सेवा

बेस्टकडून विशेष बसेस रविवारी असणार आहे. गेटवे ऑफ इंडिया, जुहू बीच आणि गोराई बीच या पर्यटन स्थळांसह नऊ वेगवेगळ्या मार्गांवर बेस्टची बसेस रात्री असणार आहे. विशेष बसेससाठी 8 Ltd, 66 Ltd, A-116, A-112, 203, 231, A-247, A-294 आणि 272 असे नियुक्त मार्ग आहेत.

कुलाब्यातून नार्वेकरांचे 3 नातेवाईक बीएमसी निवडणुकीच्या रिंगणात
कुलाब्यातून नार्वेकरांचे 3 नातेवाईक बीएमसी निवडणुकीच्या रिंगणात.
नाशकात शिंदेंची सेना अन दादांची NCP एकत्र, भाजप स्वबळावर निवडणूक लढणार
नाशकात शिंदेंची सेना अन दादांची NCP एकत्र, भाजप स्वबळावर निवडणूक लढणार.
मुंबईत चौरंगी लढत, ठाकरेंना टेंशन? बदलत्या राजकीय समीकरणांचे चित्र
मुंबईत चौरंगी लढत, ठाकरेंना टेंशन? बदलत्या राजकीय समीकरणांचे चित्र.
मोदी, ईव्हीएममुळे भाजपचा माज; राज ठाकरेंचा हल्लाबोल, कशाववरून निशाणा?
मोदी, ईव्हीएममुळे भाजपचा माज; राज ठाकरेंचा हल्लाबोल, कशाववरून निशाणा?.
पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही NCP एकत्र, जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला
पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही NCP एकत्र, जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला.
घड्याळ्याशी घरोबा, तुतारीचा खेळखंडोबा? नेत्यांची पक्षाला सोडचिठ्ठी
घड्याळ्याशी घरोबा, तुतारीचा खेळखंडोबा? नेत्यांची पक्षाला सोडचिठ्ठी.
तिकीट वाटपावरून निष्ठावंतांचा उद्रेक, उपऱ्यांना उमेदवारी अन्....
तिकीट वाटपावरून निष्ठावंतांचा उद्रेक, उपऱ्यांना उमेदवारी अन्.....
शिवसेनेला मत देणारे स्वर्गात जाणार, शहाजीबापू पाटलांचे अजब वक्तव्य
शिवसेनेला मत देणारे स्वर्गात जाणार, शहाजीबापू पाटलांचे अजब वक्तव्य.
कोकणी मतांसाठी भाजपकडून नारायण राणेंवर मोठी जबाबदारी
कोकणी मतांसाठी भाजपकडून नारायण राणेंवर मोठी जबाबदारी.
दिनकर पाटलांना विजयाची खात्री, उमेदवारी अर्ज भरल्यावर म्हणाले...
दिनकर पाटलांना विजयाची खात्री, उमेदवारी अर्ज भरल्यावर म्हणाले....