स्पुतनिक लसीच्या वितरकांशी चर्चा, जुलै किंवा ऑगस्ट महिन्यात मोठा साठा उपलब्ध होणार : राजेश टोपे

जुलै किंवा ऑगस्ट महिन्यात स्पुतनिक लसींचा मोठा साठा उपलब्ध होणार आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. (Sputnik Vaccine Large stocks available Rajesh tope)

स्पुतनिक लसीच्या वितरकांशी चर्चा, जुलै किंवा ऑगस्ट महिन्यात मोठा साठा उपलब्ध होणार : राजेश टोपे
राजेश टोपे, आरोग्यमंत्री

मुंबई : “राज्यात सध्या 18 वर्षांवरील नागरिकांचं लसीकरण करायचं आहे. मात्र सध्या लस उपलब्ध होत नाही. त्यामुळे स्पुतनिक लसीच्या वितरकांशी चर्चा झाली आहे. येत्या जुलै किंवा ऑगस्ट महिन्यात स्पुतनिक लसींचा मोठा साठा उपलब्ध होणार आहे,” अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. (Sputnik Vaccine Large stocks available in Next two month said Health minister Rajesh tope)

स्पुतनिक लसींचा मोठा साठा उपलब्ध होणार

महाराष्ट्रात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस कमी होत चालला आहे. तर दुसरीकडे राज्यात कोरोना लसीकरण मोहिम सुरु आहे. मात्र सध्या कोरोना लसींचा तुटवडा भासत आहे. याच पार्श्वभूमीवर स्पुतनिक लसीच्या वितरकांशी चर्चा सुरु आहे. काही दिवसांपूर्वी ही चर्चा पूर्ण झाली आहे. त्यानुसार येत्या जुलै किंवा ऑगस्टमध्ये स्पुतनिक लसींचा मोठा साठा उपलब्ध होणार आहे, असे राजेश टोपे म्हणाले.

सोशल डिस्टन्सिंगचे पालन करणे गरजेचे

केंद्र सरकारने यात हस्तक्षेप करून व्हॅक्सीन इंपोर्टचं एक स्पष्ट धोरण ठरवावं. तसेच याला इतर राज्यांना मदत करावी. तसेच ज्यांनी दोन लस घेतल्या असतील तरी मास्क घालणे आणि सोशल डिस्टन्सिंगचे पालन करणे गरजेचे आहे. सध्या तरी तोंडावरचा मास्क हटणार नाही, असेही राजेश टोपे म्हणाले.

तसेच दोन्ही लसी घेतल्यानंतर मोठ्या प्रमाणावर अँटिबॉडीज तयार होत असतात. त्याशिवाय जर तुम्ही अँटीबॉडीज चेक केल्या असतील आणि शरीरात जर भरपूर अँटीबॉडीज असतील तर त्या व्यक्तीला कुठलाही काही प्रॉब्लेम नसतो. पण शास्त्रीय पद्धतीने लस घेणाऱ्या व्यक्तीकडून इतरांना संसर्ग होत नसला तरी मास्क आणि सोशल डिस्टंसिंग राखणे ही महत्त्वाची गरज आहे, असेही राजेश टोपेंनी सांगितले.

भारतात किती कोरोना लस उपलब्ध?

भारतात सध्या 3 लसी आहेत. भारत बायोटेकची कोव्हॅक्सीन राज्य सरकारांना 400 रुपयांना मिळते. सीरम इन्स्टिट्युटची कोव्हिशील्ड राज्य सरकारला 300 रुपयात मिळतेय. स्पुतनिक मात्र 995 रुपयांना मिळणार आहे. रशियाची स्पुतनिक महाग आहे, पण भारतात लसीचं उत्पादन सुरु झाल्यानंतर स्पुतनिक लसीची किंमतही कमी होईल, असं सांगितलं जातंय. जुलैपासून भारतात स्पुतनिकचं उत्पादन होईल अशी घोषणा नीती आयोगानं केलेली आहे. सध्या रशियाहून 1 मे रोजी भारतात दीड लाख स्पुतनिकचे डोस आलेत, अशी माहिती नीती आयोगाच्या डॉ. व्ही. के. पॉल यांनी दिलीय. (Sputnik Vaccine Large stocks available in Next two month said Health minister Rajesh tope)

संबंधित बातम्या : 

Photo : बँकेत नोकरी करुन 4000 रुपये कमवायचा, आता कर्तृत्वाने घराघरात मिळालीय बाघाला ओळख

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI