Local Body Election : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे पडघम; संभाव्य वेळापत्रक जाणून घ्या सर्वात अगोदर

Local Body Election : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे पडघम वाजायला सुरुवात झाली आहे. आज संध्याकाळी चार वाजता राज्य निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद होणार आहे. त्यात जिल्हा परिषदेपासून ते महापालिका, नगरपालिका निवडणुकीची घोषणा होण्याची शक्यता आहे.

Local Body Election : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे पडघम; संभाव्य वेळापत्रक जाणून घ्या सर्वात अगोदर
स्थानिक स्वराज्य संस्था
Updated on: Nov 04, 2025 | 1:37 PM

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा आज बिगूल वाजण्याची दाट शक्यता आहे. आज संध्याकाळी चार वाजता राज्य निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद होणार आहे. त्यावेळी मिनी मंत्रालयासह महानगरपालिका,नगरपालिका, पंचाय समित्या यांचा निवडणूक कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता आहे. मतदार याद्यांतील घोळावरून राजकारण तापलेले असले तरी निवडणुकीचे वेळापत्रकाची राज्यभरातील कार्यकर्ते, नेते आणि पक्षांना उत्सुकता आहे.

आज संध्याकाळी निवडणूक आयोगाची पत्र परिषद

आज दुपारी ४ वाजेनंतर राज्यातील शहरी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीची घोषणा होण्याची शक्यता आहे.निवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषदेत निवडणूक कार्यक्रम घोषित होण्याची शक्यता आहे. पहिल्या टप्प्यात राज्यातील नगरपालिका आणि नगर परिषदेच्या निवडणूका घेतल्या जातील. पहिल्या टप्प्यातील 246 नगरपालिका आणि 42 नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा होणार आहे.

डिसेंबरमधील हिवाळी अधिवेशनानंतर ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्था अर्थात जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूक घेतल्या जातील. त्यासाठी डिसेंबर मध्ये स्वतंत्र निवडणूक कार्यक्रम घोषित केला जाईल. जानेवारीत महापालिका निवडणूक घेतल्या जातील.

प्रत्येक निवडणूक प्रकिया २१ दिवसात पूर्ण करण्याचे आयोगाचे नियोजन आहे. त्यानुसार नामांकन भरणे ते प्रत्यक्ष मतदान आणि मतमोजणी हे २१ दिवसाचे शेड्यूल जाहीर केले जाण्याची शक्यता आहे. राज्यातील महानगरपालिका, नगरपालिका, नगरपंचायती, जिल्हा परिषदा व पंचायत समित्यांच्या निवडणुका तीन टप्प्यांत घेण्याचे नियोजन केलं आहे.

प्रलंबित निवडणूका:

महापालिका – 29

नगरपंचायती – 246

जिल्हा परिषद – 42

पंचायत समिती – 32

एकूण – 336

आज या स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीची घोषणा होण्याची शक्यता

नगर पालिका

नगर पंचायत

नगर परिषदा

पहिल्याटप्प्याच्या निवडणुका नोव्हेंबरमध्ये होतील त्याची घोषणा आज होण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे.

दुसऱ्या टप्पा

जिल्हा परिषद

पंचायत समित्या

हा दुसरा टप्पा – डिसेंबरमध्ये होईल

तिसरा टप्पा

तर तिसऱ्या टप्प्यात – महापालिका निवडणुका होतील. या निवडणुका जानेवारीत होतील

आयोगाविरोधात विरोधक मैदानात

दरम्यान जोपर्यंत मतदारांची सुधारीत यादी तयार होत नाही. तोपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेऊ नये, अशी उद्धव सेना, मनसे, काँग्रेस, शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेससह विरोधी पक्षांची मागणी आहे. आज दिल्लीतही विरोधकांचे शिष्टमंडळ केंद्रीय निवडणूक आयोगाच्या भेटीला पोहचले आहे. त्यामुळे आज जर निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला तर त्यावर तीव्र प्रतिक्रिया येण्याची शक्यता आहे. आता आज कोणत्या विषयावर काय निर्णय होईल हे चार वाजेनंतर समोर येईल. त्यानंतर राजकारणातील घडामोडींना वेग येईल.