Voter List : राज्यातील सर्वच मतदार यादी स्क्रॅप करण्याची गरज, विरोधकांच्या सूरात भाजपचा सूर, बड्या नेत्याचे मत काय?
State Election Commission Press Conference : मतदार यादीवरून सध्या राज्यात धुमशान सुरू आहे. आज विरोधकांचे शिष्टमंडळ केंद्रीय निवडणूक आयोगाच्या भेटीला गेले आहे. तर दुसरीकडे आज राज्य निवडणूक आयोग आज स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीविषयी मोठी घोषणा करण्याची शक्यता आहे.

Chandrashekhar Bawankule on Voter list Scrap : मतदार यादीवरून सध्या राज्यात धुमशान सुरू आहे. मनसे आणि महाविकास आघाडीसह विरोधकांनी याविरोधात एल्गार पुकारला आहे. मतदार याद्या सदोष असल्याचा आरोप करत अनेक पुरावे पण त्यांनी समोर आणल्याचा दावा केला आहे. अजितदादांच्या राष्ट्रवादीचे मंत्री हसन मुश्रीफ आणि शिंदे सेनेचे मंत्री संजय शिरसाट यांनी असाच सूर आळवला. त्यातच आता कालपासून भाजपच्या गोटातून काही मतदारसंघात मुस्लीम दुबार मतदारांविषयी ओरड सुरू आहे. तर आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत महसलूमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मोठे वक्तव्य केले आहे.
मतदार यादीवरून राज्यात रणकंदन सुरू आहे. मनसे महाआघडीने काल परवा मुंबईत एल्गार पुकारला. बोगस मतदानाचा हुंकार भरला. मतदार याद्या स्वच्छ केल्याशिवाय निवडणुका घेऊ देणार नाही असा असा इशाराही देण्यात आला. त्यानंतर आज दोन मोठ्या घडामोडी घडल्या. विरोधकांच्या शिष्टमंडळाने दिल्लीत केंद्रीय निवडणूक आयोगात ठिय्या दिला आहे. तर दुसरीकडे आज संध्याकाळी चार वाजता राज्य निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद होत आहे. यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची घोषणा होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यातच विरोधकांनी आज निवडणूक आयोगावर टीकेची झोड उठवली असतानाच महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी महत्त्वाचे वक्तव्य केले आहे.
मतदार यादी स्क्रॅप करा
विरोधकांनी लोकसभेच्या निवडणुका झाल्या झाल्या दुसऱ्या दिवशी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी निवडणूक आयोगाची भेट घ्यायला हवी होती. आमच्या जागा जरी निवडून आल्या तरी यादी चुकलेली आहे. मतदार यादीत दुबार, तिबार नावं आहेत, अशी तक्रार करणं अपेक्षित होतं. पण पहिला आक्षेप विरोधकांनी नाही तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नोंदवला. हायकोर्टात पहिली याचिका दाखल केली होती. तर मी, आशिष शेलार, किरीट सोमय्या केंद्रीय निवडणूक आयोगाला भेटलो होतो. त्यावेळी मतदार याद्यांमध्ये डिलिशन होत नाही तर ॲडिशन होत आहे असे म्हटले होते. कामठी, मालेगाव, सिल्लोड यासह अनेक ठिकाणी एकाच ठिकाणी व्यक्तीचे नाव चार -चार, पाच-पाच वेळा आले आहे. हिंदूंच्या नावावर आक्षेप घेण्यात आला. मुस्लीम बुथवर सुद्धा अशीच वारंवार नावे आली आहेत. या भागात भाजपला एक मत, तर काँग्रेसला 500 मतं मिळाली आहेत, असे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.
त्यांनी यावेळी काँग्रेससह विरोधकांवर निशाणा साधला. ज्या भागात मुस्लीम मतदार वाढलेत. त्याठिकाणच्या याद्यांमध्ये दुबार, तिबार नावं येत आहेत. तिथे विरोधक आक्षेप घेत नसल्याचा आरोप त्यांनी केला. त्यामुळे या राज्यातील सर्वच मतदार याद्या स्क्रॅप करण्याची गरज असल्याचे ते म्हणाले. तर सर्वच मतदार याद्यांना एसआरएमध्ये घेण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.
