राज्यात बेरोजगारांच्या संख्येत घट, सहा महिन्यात 78 हजारांहून अधिक गरजूंना नोकऱ्या

राज्यात जून 2021 मध्ये 15 हजार 336 बेरोजगारांना रोजगार मिळवून देण्यात आला असल्याची माहिती कौशल्य विकासमंत्री नवाब मलिक यांनी दिली.

राज्यात बेरोजगारांच्या संख्येत घट, सहा महिन्यात 78 हजारांहून अधिक गरजूंना नोकऱ्या
नवाब मलिक
टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: अक्षय चोरगे

Jul 07, 2021 | 10:04 PM

मुंबई : कोरोनाच्या संकटामुळे बेरोजगारीची समस्या निर्माण झाली असताना कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या विविध उपक्रमांद्वारे राज्यात जून 2021 मध्ये 15 हजार 336 बेरोजगारांना रोजगार मिळवून देण्यात आला असल्याची माहिती कौशल्य विकासमंत्री नवाब मलिक यांनी दिली. (state govt employed 15,336 unemployed in June 2021, says Nawab Malik)

महास्वयंम वेबपोर्टल, ऑनलाईन रोजगार मेळावे आदी विविध उपक्रमांद्वारे राज्यात नोकरी इच्छूक उमेदवार आणि विविध कंपन्या, कॉर्पोरेट संस्था, उद्योग यांची सांगड घालून रोजगार उपलब्ध करुन देण्यात येतो. अशा विविध उपक्रमांमधून मागील वर्षी 2020 मध्ये राज्यात 1 लाख 99 हजार 486 उमेदवारांना रोजगार मिळवून देण्यात यश आले, तर चालू वर्षात जानेवारी ते जूनअखेर 78 हजार 391 बेरोजगारांना रोजगार मिळवून देण्यात आला आहे, असेही मंत्री नवाब मलिक यांनी सांगितले.

बेरोजगार उमेदवार आणि उद्योजक यांच्यामध्ये सांगड घालण्यासाठी कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता विभागाने https://rojgar.mahaswayam.gov.in हे वेबपोर्टल सुरु केले आहे. या वेबपोर्टलवर बेरोजगार उमेदवार आपले शिक्षण, कौशल्ये, अनुभव आदी माहितीसह नोंदणी करतात. त्याचबरोबर कुशल उमेदवारांच्या शोधात असलेल्या कंपन्या, उद्योजक, कॉर्पोरेट्स हे सुद्धा या वेबपोर्टलवर नोंदणी करुन त्यांना हवे असलेले कुशल उमेदवार शोधू शकतात. नोकरी इच्छूक उमेदवारांनी या वेबपोर्टलवर नोंदणी करणे आवश्यक आहे. विभागामार्फत जिल्ह्यांमध्ये वेळोवेळी ऑनलाईन रोजगार मेळाव्यांचेही आयोजन करण्यात येते.

विभागाकडे, महास्वयंम वेबपोर्टलवर आतापर्यंत 90 हजार 260 इतक्या सार्वजनिक व खाजगी उद्योजकांनी नोंदणी केली आहे. यापैकी अनेक उद्योजक आवश्यकतेनुसार त्यांच्याकडील रिक्त पदांची भरती महास्वयंम वेबपोर्टल तसेच कौशल्य विकास विभागाचे ऑनलाईन मेळावे आदी उपक्रमांमधून वेळोवेळी करतात. त्यामुळे नोकरी इच्छूक उमेदवारांना कौशल्य विकास विभागाच्या उपक्रमांमधून नोकरी मिळविण्यासाठी चांगले व्यासपीठ उपलब्ध झाले आहे, असे मंत्री नवाब मलिक यांनी सांगितले.

माहे जून 2021 मध्ये विभागाकडे 33 हजार 329 इतक्या नोकरी इच्छूक उमेदवारांनी नवीन नोंदणी किंवा पुनर्नोंदणी केली आहे. यात मुंबई विभागात 9 हजार 109, नाशिक विभागात 6 हजार 594, पुणे विभागात 9 हजार 604, औरंगाबाद विभागात 5 हजार 141, अमरावती विभागात 1 हजार 294 तर नागपूर विभागात 1 हजार 587 बेरोजगार उमेदवारांनी नोंदणी केली.

माहे जूनमध्ये कौशल्य विकास विभागाच्या विविध उपक्रमांद्वारे 15 हजार 336 उमेदवार नोकरीस लागले. यामध्ये मुंबई विभागात सर्वाधिक 6 हजार 330, नाशिक विभागात 3 हजार 111, पुणे विभागात 4 हजार 78, औरंगाबाद विभागात 1 हजार 652, अमरावती विभागात 79 तर नागपूर विभागात 86 इतके बेरोजगार उमेदवार नोकरीस लागले.

इतर बातम्या

Monsoon Session : “भाजपला विधान सभेत गुंडगिरी करायची असेल तर…”-Nawab Malik

‘कोण कुणाला अंगावर घेतं बघू’, नारायण राणेंना केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान मिळाल्यावर शिवसेनेचं आव्हान

(state govt employed 15,336 unemployed in June 2021, says Nawab Malik)

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें