Mumbai Rains | मुंबईसह कोकणात रेड अलर्ट, ताशी 70 किमी वाऱ्यासह पावसाचा जोर कायम राहणार

Mumbai Rains | मुंबईसह कोकणात रेड अलर्ट, ताशी 70 किमी वाऱ्यासह पावसाचा जोर कायम राहणार

मुंबई आणि कोकण किनारपट्टीवर रात्रभर 70 किमी प्रतितास वेगाने सोसाट्याचे वारे वाहण्याची शक्यता आहे (Strong winds with speed reaching 70 Kmph at Mumbai and adjoining Konkan coast).

चेतन पाटील

|

Aug 05, 2020 | 9:33 PM

मुंबई : मुंबई आणि कोकण किनारपट्टीच्या दिशेला 70 किमी प्रतितास वेगाने वारे वाहत आहेत. हे वारे 6 ऑगस्टपर्यंत सुरु राहतील, अशी माहिती हवामान विभागाकडून देण्यात आली आहे. त्यामुळे मुंबई आणि कोकण किनारपट्टीवर रात्रभर 70 किमी प्रतितास वेगाने सोसाट्याचे वारे वाहण्याची शक्यता आहे (Strong winds with speed reaching 70 Kmph at Mumbai and adjoining Konkan coast). मुंबई, ठाणे, रायगड आणि पालघरसह उत्तर कोकणात आज रात्रभर मुसळधार पाऊस पडण्याशी शक्यता, हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे. हवामान विभागाकडून या जिल्ह्यांमध्ये रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.

दरम्यान, मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांनी नागरिकांना घराबाहेर न पडण्याचं आवाहन केलं आहे. गरज असेल तरच घराबाहेर पडा. काही आपत्तीजन्य परिस्थिती उद्भवल्यास 100 क्रमांकावर फोन करा, असं आवाहन मुंबई पोलिसांकडून करण्यात आलं आहे.

TOP 9 | लोकल ते ग्लोबल, सर्व बातम्या एकत्र, पाहा टॉप 9 न्यूज!

मुंबईत सुरु असलेल्या पावसाच्या पार्श्वभूमीवर महापौर किशोरी पेडणेकर यांनीदेखील नागरिकांना घरातच राहण्याचं आवाहन केलं आहे. मुसळधार पावसामुळे मुंबईतील सखल भागांमध्ये पाणी साचलं आहे. पावसासह वेगवान वाऱ्यामुळे मुंबईतील अनेक झाडे उन्मळून पडली आहेत. काही ठिकाणी रस्त्यांवर झाडे पडल्यामुळे वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे. त्याचबरोबर काही ठिकाणी रस्त्यांवर पाणी साचल्याने वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे (Strong winds with speed reaching 70 Kmph at Mumbai and adjoining Konkan coast).

दरम्यान, मुंबईत विविध भागांमध्ये अडकलेल्या नागरिकांची महापालिका प्रशासनाकडून व्यवस्था केली असल्याची माहिती महापौर किशोरी पेडणेकर यांनी ‘टीव्ही 9 मराठी’सोबत बोलताना दिली. “निसर्गाच्या बदलानुसार आपल्याला सतर्क राहावं लागेल. त्याप्रमाणे प्रशासनाकडून काळजी घेतली जात आहे. सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर सर्व पथक तैनात करण्यात आले आहेत”, असं किशोरी पेडणेकर यांनी सांगितलं.

“आम्ही जीर्ण झालेल्या इमारतींची आज भेट घेणार होतो. मात्र, दुपारपासून धो धो पाऊस सुरु झाला. चारही बाजूंनी वाहतूक कोंडी निर्माण झाली. मला मिळालेल्या माहितीनुसार सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर एनडीआरएफचं पथक तैनात करण्यात आलं आहे”, असं किशोरी पेडणेकर म्हणाले.

“ट्रेन, बस किंवा इतर ठिकाणी अडकलेल्या नागरिकांची व्यवस्था केली जात आहे. त्यांना जेवण आणि इतर सेवा पुरवण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. मुंबईतील विविध भागांमध्ये अडकलेल्या नागरिकांची शाळांमध्ये सोय करण्याबाबत अधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या आहेत”, असं किशोरी पेडणेकर यांनी सांगितलं.

“जिथे झाडं पडलेली आहेत तिथे महापालिका प्रशासन पोहोचण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र, काही भागांमध्ये वाहतूक कोंडी आणि रस्त्यांवर साचलेल्या पाण्यामुळे महापालिका प्रशासन अजूनही पोहोचू शकलेलं नाही. महापौर बंगला परिसरातील एका झाडाची मोठी फांदी तुटून पडली. सुदैवाने तिथे कुणी नव्हतं. अशाचप्रकारचा सामना सर्वांना करावा लागत आहे”, असं किशोरी पेडणेकर यांनी सांगितलं.

संबंधित बातम्या :  

मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह तुफान पाऊस, 5 तासात 300 मिमी पावसाची नोंद

कोकणात मुसळधार पाऊस, रायगडमध्ये कुडंलिका नदीने धोक्याची पातळी ओलांडली

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें