सुनील पाटील यांचं बदल्यांचं रॅकेट, गृहमंत्र्यांशी कनेक्शन कसे?, संपूर्ण प्रकरणाची चौकशी करा: मोहित कंबोज

| Updated on: Nov 06, 2021 | 12:25 PM

राष्ट्रवादीचा सुनील पाटील बदल्यांचं रॅकेट चालवत होता. तोच पैसा घ्यायचा आणि संबंधित मंत्र्यांना द्यायचा. त्याचं आणि गृहमंत्र्यांचं कनेक्शन काय आहे, याची संपूर्ण प्रकरणाची चौकशी व्हावी, अशी मागणी भाजप पदाधिकारी मोहित कंभोज यांनी केला आहे.

सुनील पाटील यांचं बदल्यांचं रॅकेट, गृहमंत्र्यांशी कनेक्शन कसे?, संपूर्ण प्रकरणाची चौकशी करा: मोहित कंबोज
Mohit Kamboj
Follow us on

मुंबई : आर्यन खानसह क्रुझवरील अन्य लोकांना एनसीबीच्या जाळ्यात अडकवण्यात सुनील पाटील या व्यक्तीने मास्टरमाईंडची भूमिका पार पाडली आहे. सुनील पाटील हा राष्ट्रवादी काँग्रेसचाच कार्यकर्ता असून तो माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचे पूत्र ऋषिकेश देशमुख यांचा अत्यंत जवळचा मित्र आहे. अनिल देशमुखांच्या ईडी प्रकरणातही पाटीलचं नाव आहे. त्याचं खूप मोठं रॅकेट आहे. सुनील पाटील बदल्यांचं रॅकेट चालवत होता. तोच पैसा घ्यायचा आणि संबंधित मंत्र्यांना द्यायचा. त्याचं आणि गृहमंत्र्यांचं कनेक्शन काय आहे, याची संपूर्ण प्रकरणाची चौकशी व्हावी, अशी मागणी भाजप पदाधिकारी मोहित कंभोज यांनी केला आहे.

सुनील पाटील यांचं बदल्यांचं रॅकेट, गृहमंत्र्यांशी कनेक्शन कसे?

सुनील पाटील हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेपासून पक्षाचा कार्यकर्ता आहे. अनिल देशमुखांच्या मुलाशी आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांशी त्याचे जवळचे संबंध आहेत, असा दावा मोहित कंबोज यांनी केला. सुनील पाटील बदल्यांचं रॅकेट चालवत होता. तोच पैसा घ्यायचा आणि संबंधित मंत्र्यांना द्यायचा. त्यांचं राज्यभरात रॅकेट होतं. सरकार बदलल्यानंतर ते भूमिगत झाले. सरकार आल्यानंतर पुन्हा सक्रिय झाले. मोठमोठ्या हॉटेलमध्ये त्यांच्या पार्ट्या चालायच्या, असे एक ना अनेक आरोप मोहित कुंभोज यांनी केले आहेत.

राष्ट्रवादीचा सुनील पाटीलच आर्यन खान प्रकरणाचा मास्टरमाइंड

आर्यन खान प्रकरणाचा मास्टरमाइंड सुनील पाटील आहेत. सुनील पाटील हे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते असून ते धुळ्याचे आहेत. गेल्या 20 वर्षापासून त्यांचा राष्ट्रवादीशी संबंध राहिला आहे. केवळ संबंधच राहिले नाही तर माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचे चिरंजीव ऋषिकेश देशमुख यांचे जिगरी दोस्त आहेत. आर आर पाटील यांचे निकटवर्तीय होते. राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांशी सुनील पाटील यांचे घरगुती संबंध आहेत, असा दावा कंबोज यांनी केला. अनिल देशमुखांच्या ईडी प्रकरणातही पाटीलचं नाव आहे, असंही त्यांनी सांगितलं.

मोहित कुंभोज काय म्हणाले?

आर्यन खान प्रकरणात याच सुनील पाटीलने महत्त्वाची भूमिका बजावली. त्याने 1 ऑक्टोबरला सॅम डिसोझाला फोन केला होता. मुंबईत क्रुझ पार्टी होणार असून त्यामध्ये सहभागी होणाऱ्या 27 लोकांची माहिती माझ्याकडे असल्याचे सुनील पाटीलने सॅम डिसोझाला सांगितले. तसेच मला एनसीबीच्या अधिकाऱ्याशी बोलायचे आहे, असेही सुनील पाटीलने सांगितले. देशाच्या भल्याचे काम करण्याच्या हेतूने सॅम डिसोझाने सुनील पाटीलचा एनसीबीचे अधिकारी व्ही.व्ही. सिंग यांच्याशी संपर्क साधून देण्याचे मान्य केले.

त्यावेळी एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी तुमच्याकडे कोणती माहिती आहे, अशी विचारणा केली. तेव्हा सुनील पाटील याने त्याचा सहकारी के.पी. गोसावी याच्याकडे क्रुझ पार्टीशी संबंधित माहिती असल्याचे सांगितले. पाटीलने सॅमला गोसावीचा नंबरही पाठवला आणि किरण गोसावीच सर्व कारवाई करणार असल्याचं सांगितलं. त्यामुळे हा सगळा कट सुनील पाटील यानेच रचला होता. सुनील पाटील हा महाराष्ट्रातील कोणत्या मंत्र्याच्या इशाऱ्यावर हे सगळे काम करत होता, असा सवाल मोहित कंबोज यांनी उपस्थित केला.

(Sunil Patil transfer racket, how to connect with Home Minister, investigate the whole case demand BJP Mohit Kamboj)

हे ही वाचा :

राष्ट्रवादीचा कार्यकर्ता सुनील पाटील हाच आर्यन खान प्रकरणाचा मास्टरमाइंड; मोहित कंबोज यांचा खळबळजनक आरोप

किरण गोसावी हाच राष्ट्रवादीच्या सुनील पाटीलचा पंटर, मोहित कंबोज यांचा मोठा गौप्यस्फोट; ड्रग्जप्रकरणात ट्विस्ट?