AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मुंबई महापालिकेची निवडणूक कशी लढणार?, सुप्रिया सुळे म्हणतात…

रक्तदान शिबीर आयोजित करणाऱ्या कार्यकर्त्यांचे आणि जनतेचे सुप्रिया सुळेंनी आभार मानले आहेत. Supriya Sule Blood donation

मुंबई महापालिकेची निवडणूक कशी लढणार?, सुप्रिया सुळे म्हणतात...
Supriya Sule
| Updated on: Dec 20, 2020 | 3:50 PM
Share

मुंबई: राज्यात रक्ताचा तुटवडा निर्माण झाला होता. राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने या अडचणीच्या काळात आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी रक्तदान करण्याचे आवाहन केले होते. राज्यात रक्ताचा तुटवडा आहे हे लक्षात घेऊन महाराष्ट्राच्या जनतेसाठी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटलांच्या नेतृत्वाखाली रक्तदान शिबिरांचं आयोजन करण्यात येत आहे. राजेश टोपे यांनी आणि मी स्वतः रक्तदान करून याची सुरुवात केली. संपूर्ण महाराष्ट्राच्या अडचणीच्या काळात कुठेही शरद पवार यांच्या वाढदिवसाचा कार्यक्रम साजरा न करता मोठ्या प्रमाणावर रक्तदान शिबिरांचे आयोजन राज्यात करण्यात आले. त्याबद्दल खासदार सुप्रिया सुळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस आणि राज्यातील जनतेचे आभार मानले आहेत. मुंबई महापालिकेची निवडणूक कशी लढवायची याचा निर्णय तिन्ही पक्षांचे प्रमुख  घेतील, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.(Supriya Sule opinion on BMC Election and Blood Donation)

मराठा आंदोलन

मुंबईत मराठा क्रांती मोर्चाची बैठक चालू आहे. मराठा संघटना सातत्याने राज्यसरकार दिरंगाई करत आहेत, याबाबत विचारले असता सुप्रिया सुळेंनी भूमिका स्पष्ट केली. मराठा संघटनांचे जे आरोप आहेत, त्यांच्या व्यथा आहेत. त्या समजून घेऊन ऐकून घेऊन चर्चा करणे ही आमची नैतिक जबाबदारी आहे, सुप्रिया सुळेंनी सांगितले. मराठा संघटनांशी सातत्याने चर्चा करून काय मार्ग काढता येईल. या चर्चेतून मार्ग काढण्याचा प्रांजळ प्रयत्न महाराष्ट्र सरकार करत आहे, असंही त्यांनी म्हटलं.

मुंबई महापालिका निवडणूक

मुंबई महापालिका निवडणूक शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी एकत्र येऊन लढवण्याबाबतचा निर्णय तिन्ही पक्षांचे वरिष्ठ घेतील. महापालिका निवडणूक कशी लढवायची याचा निर्णय राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार, काँग्रेसच्या प्रमुख सोनिया गांधी आणि शिवसेना पक्षप्रमुख मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घेतील, असं सुप्रिया सुळेंनी स्पष्ट केले.(Supriya Sule opinion on BMC Election and Blood Donation)

शेतकरी आंदोलन

दिल्लीत सुरु असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाचा प्रश्न हाताळण्यात केंद्र सरकार अपयशी ठरलं आहे. केंद्र सरकारने आंदोलन ज्या पद्धतीनं हाताळले ते दुर्दैवी असल्याचा आरोप सुप्रिया सुळेंनी केला. केंद्र सरकार शेतकऱ्यांशी चर्चा करण्यात कमी पडले, हे त्यांचं अपयश असल्याचा आरोप सुप्रिया सुळेंनी केलाय.

राजेश टोपेंचे रक्तदानाचे आवाहन

राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी 8 डिसेंबरला पाच ते सहा दिवस पुरेल एवढाच रक्तसाठा असल्याची माहिती दिली होती. त्यावेळी त्यांनी तरुणांना मोठ्या प्रमाणात रक्तदान करण्याचं आवाहन केलं आहे. यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी ठिकठिकाणी रक्तदान शिबिरांचे आयोजन केले होते.

संबंधित बातम्या:

मराठा आरक्षणावर आता तुम्हीच मार्ग काढा; मराठा आंदोलक शरद पवारांना भेटणार

राज्यात आठवडाभर पुरेसाच रक्तसाठा, मंत्री राजेंद्र शिंगणेंकडून रक्तदानाचे आवाहन

(Supriya Sule opinion on BMC Election and Blood Donation)

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.