Eknath Shinde: उद्धव ठाकरेंचं आवाहन मनापासून, चर्चेनंच प्रश्न सुटतील, सुप्रिया सुळेंचंही बंडखोर आमदारांना आवाहन

बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेचा आणि आपला उत्तराधिकार म्हणूनही उद्धठ ठाकरे यांच्यावर जबाबदारी दिली असल्याचेही त्यांनी सांगितले. त्यांच्या स्वभावाविषयी सांगताना उद्धव ठाकरे यांच्यावर त्यांच्या आईचा कसा प्रभाव राहिला आहे. त्याच मायेने आणि प्रेमाने ते सांगत आहेत असंही त्यांनी सांगितले.

Eknath Shinde: उद्धव ठाकरेंचं आवाहन मनापासून, चर्चेनंच प्रश्न सुटतील, सुप्रिया सुळेंचंही बंडखोर आमदारांना आवाहन
महादेव कांबळे

|

Jun 28, 2022 | 5:45 PM

मुंबईः बंडखोर आमदारांमुळे (Rebel MLA) आता राज्यातील राजकारण ढवळून निघाले असले आणि सरकार अस्थिर होण्याच्या परिस्थिती असतानाही आता आणखी या वेगवेगळ्या घटना घडत आहेत. या सगळ्या घटना घडामोडीमध्ये राष्ट्रवादीच्या सुप्रिया सुळेंनी (NCP Leader Supriya Sule) माध्यमांशी बोलताना सांगितले आहे की, बंडखोर आमदारांना जर कुटुंबप्रमुखे म्हणून उद्धव ठाकरे (Sivsena Leader Uddhav Thackeray) आवाहन करत असतील तर त्या बंडखोर आमदारांना येणं गरजेचे आहे असंही त्यांनी यावेळी सांगितले. समोरासमोर बसून चर्चेतून त्यावर तोडगा काढायला हवा असं मत सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केले आहे.

यावेळी उद्धव ठाकरे यांच्या कामाचे, त्यांच्या स्वभावाचे कौतुक करताना सुप्रिया सुळे यांनी सांगितले की, माँ यांच्या स्वभावाचा उद्धव ठाकरे यांच्या मनावर प्रचंड प्रभाव असल्याचे सांगितले.

उत्तराधिकार म्हणूनही उद्धठ ठाकरे

बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेचा आणि आपला उत्तराधिकार म्हणूनही उद्धठ ठाकरे यांच्यावर जबाबदारी दिली असल्याचेही त्यांनी सांगितले. त्यांच्या स्वभावाविषयी सांगताना उद्धव ठाकरे यांच्यावर त्यांच्या आईचा कसा प्रभाव राहिला आहे. त्याच मायेने आणि प्रेमाने ते सांगत आहेत असंही त्यांनी सांगितले.

भांड्याला भांड लागतं

त्या बरोबरच आज खूप प्रेमाच्या, विश्वासाच्या नात्याने जर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आव्हान करत असतील तर ते एक खूप मोठं भावनिक आव्हान असल्याचे सांगत राजकारण म्हटले की, भांड्याला भांड लागतं, तर एखादा आपला मुलगा किंवा मुलगी ही रुसून गेली तर आई-वडील हे सगळं पोटात घेऊन प्रश्न सोडवतात त्या प्रमाणे उद्धव ठाकरे आपली जबाबदारी पार पाडत असल्याचे सांगत उद्धव ठाकरे यांच्या आवाहनाला प्रतिसाद देऊन समोरासमोर बसून चर्चा करून हा प्रश्न सोडवला पाहिजे असंही त्यांनी यावेळी सांगितले.

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें