Sussanne Khan | हृतिक रोशनची घटस्फोटित पत्नी सुझान खानविरोधात गुन्हा

ड्रॅगनफ्लाय पबमधील पार्टीत सुझान खान, सुरेश रैना, गुरु रंधवा यांच्यासह अन्य काही सेलेब्रिटीही उपस्थित होते.

Sussanne Khan | हृतिक रोशनची घटस्फोटित पत्नी सुझान खानविरोधात गुन्हा

मुंबई : अभिनेता हृतिक रोशनची घटस्फोटित पत्नी आणि इंटिरिअर डिझायनर सुझान खानच्या (Sussanne Khan) अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. मुंबईतील ड्रॅगनफ्लाय पबमध्ये (Dragonfly Pub) कोरोनासंबंधी नियमाचं उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये सुझॅनसह टीम इंडियाचा माजी क्रिकेटपटू सुरेश रैना (Suresh Raina), पॉप गायक गुरु रंधावा (Guru Randhawa) यांच्यासह 34 जणांचा समावेश आहे. (Sussanne Khan booked for not following COVID norms in Dragonfly Pub)

मुंबई विमानतळाजवळ असलेल्या ड्रॅगनफ्लाय पबमध्ये एका पार्टीचं आयोजन करण्यात आलं होतं. या पार्टीमध्ये सहभागी झालेल्या व्यक्तींनी कोरोनासंबंधी नियमांकडे कानाडोळा केल्याचा आरोप आहे. या पार्टीत अनेकांनी सोशल डिस्टन्सिंगचे नियम पायदळी तुडवलेच, मात्र उपस्थितांपैकी कोणी मास्कही लावले नसल्याचं समोर आलं आहे. विशेष म्हणजे हा पब नियोजित वेळेच्या पलिकडे खुला ठेवण्यात आला होता.

पोलिसांना या प्रकाराची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी मध्यरात्री साडेतीन वाजताच्या सुमारास ड्रॅगनफ्लाय पबवर छापा टाकला. या पब पार्टीत सुझान खान, सुरेश रैना, गुरु रंधवा यांच्यासह अन्य काही सेलेब्रिटीही उपस्थित होते. कोरोनाच्या नियमांचं उल्लंघन केल्यामुळे रैना-सुझानसह पब मालकावरही कारवाई करण्यात आली. मुंबई पोलिसांनी रैनावर कलम 188, 269 आणि 34 अंतर्गत गुन्हा दाखल केला.

कोण आहे सुझान खान?

42 वर्षीय सुझान खान अभिनेता हृतिक रोशनची घटस्फोटित पत्नी
(Sussanne Khan booked for not following COVID norms in Dragonfly Pub)

तेरा वर्षांच्या संसारानंतर 2013 मध्ये विभक्त, वर्षभरानंतर हृतिकसोबत घटस्फोट मिळाला

दिग्गज अभिनेते संजय खान यांची कन्या, तर अभिनेता झायेद खानची बहीण

फॅशन डिझायनर, इंटिरिअर डिझायनर म्हणून सुझान कार्यरत

सुझान आणि हृतिक यांना दोन मुलं, घटस्फोटानंतरही सुझानचे हृतिकसह रोशन कुटुंबाशी सलोख्याचे संबंध

हृतिकसोबत काडीमोड घेतल्यानंतरही हृतिक आणि दोन मुलांसोबत परदेशवारी

संबंधित बातम्या :

Suresh Raina arrested : क्रिकेटपटू सुरेश रैना आणि सुझान खानला अटक

(Sussanne Khan booked for not following COVID norms in Dragonfly Pub)

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI