AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Barge P305 | मी जहाजावरुन परत आलो की बोलू, पण…, दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेल्या कुटुंबियांचा हंबरडा

अद्याप समुद्रात बुडालेल्या ‘बार्ज पी- 305’ (Barge P305) या बोटीवर बचावकार्य सुरु आहे. (Tauktae Cyclone Barge P305 off 49 dead body found)

Barge P305 | मी जहाजावरुन परत आलो की बोलू, पण..., दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेल्या कुटुंबियांचा हंबरडा
Barge P305
| Updated on: May 21, 2021 | 8:33 AM
Share

मुंबई : तौत्के चक्रीवादळाच्या (Tauktae Cyclone) तडाख्यामुळे बॉम्बे हाय परिसरात समुद्रात बुडालेल्या ‘बार्ज पी- 305’ (Barge P305) या बोटीवर बचावकार्य सुरु आहे. या बार्जवर एकूण 273 कर्मचारी होते. त्यातील 49 जणांचे मृतदेह नौदलाला मिळाले आहेत. तर अद्याप अनेक लोक हे बेपत्ता आहेत. दरम्यान या दुर्घटनेत पिंपरी-चिंचवडमधील निलेश पिताले (45) यांचा मृत्यू झाला. मी जहाजावर जातोय, परत आल्यावर बोलू, पण आता बोलणं होणार नाही…अशी प्रतिक्रिया देत निलेशचे भाऊ यांनी हंबरडा फोडला. (Tauktae Cyclone Barge P305 off Bombay High area 49 deadbody found)

 49 जणांचे मृतदेह हाती

तौत्के चक्रीवादळामुळे बॉम्बे हाय परिसरात असणारे ‘बार्ज पी- 305’ बुडाले होते. त्यामुळे या बार्जवरील सर्व कर्मचारी समुद्रात पडले होते. 17 तारखेलाच या कर्मचाऱ्यांना वाचवण्यासाठी रेस्क्यू ऑपरेशन सुरु करण्यात आले. तेव्हापासून आतापर्यंत 184 कर्मचाऱ्यांना हेलिकॉप्टरच्या मदतीने समुद्रातून बाहेर काढण्यात आले आहे.

यातील 49 जणांचे मृतदेह नौदलाला मिळाले आहेत. तर काही जण अद्यापही बेपत्ता आहेत. यापैकी एकूण 36 जणांचे मृतदेह जे. जे रुग्णालयात पोस्टमार्टमसाठी पाठवण्यात आले आहे. अद्याप समुद्रात बुडालेल्या ‘बार्ज पी- 305’ (Barge P305) या बोटीवर बचावकार्य सुरु आहे.

137 कर्मचाऱ्यांचीही सुटका

भारतीय नौदलाच्या आयएनएस कोची (INS Kochi) आणि आयएनएस कोलकाता (INS Kolkata) या युद्धनौका, तसंच ग्रेटशिप अहिल्या (Ahilya) आणि ओशन एनर्जी (Ocean Energy) या जहाजांच्या सहाय्याने समुद्रात अडकलेल्या कर्मचाऱ्यांची सुटका करण्यात येत आहे. याशिवाय, भारतीय नौदल आणि तटरक्षक दलाच्या जहाजांनी GAL Constructor बार्जवर अडकलेल्या 137 कर्मचाऱ्यांचीही सुटका केली होती.

“चक्रीवादळ आले आणि होत्याचे नव्हते झाले”

दरम्यान या दुर्घटनेत महाराष्ट्रातील पिंपरी चिंचवड येथे राहणारे निलेश प्रकाश पिताले (45) यांचा दुर्देवी मृत्यू झाला. निलेश हे गेल्या दोन वर्षांपासून एचएसई पर्यवेक्षक होते. पण घडलेल्या दुर्घटनेत त्यांना  जीव गमवावा लागला. मी त्याच्याशी 15 मे रोजी बोललो होतो. त्यावेळी निलेशने सांगितले होते की मी जहाजावर जात आहे. त्यामुळे माझे पुढे बोलणे होणार नाही. म्हणून मी परत आलो की बोलू. यानंतर चक्रीवादळ आले आणि होत्याचे नव्हते झाले. ज्यात बार्ज पी -305 बुडाले, अशी भावूक प्रतिक्रिया मृत निलेश यांचे भाऊ  विश्वनाथ प्रकाश पिताले यांनी दिली. (Tauktae Cyclone Barge P305 off Bombay High area 49 deadbody found)

संबंधित बातम्या : 

Photo : INS कोची जहाजाला ‘तौक्ते’ने घेरलं, समुद्रात रेस्क्यू ऑपरेशन, 14 मृतदेह सापडले; 184 जणांची सुटका

अरबी समुद्रात रेस्क्यू ऑपरेशनचा थरार; ‘बार्ज पी- 305’ वरील 89 कर्मचारी अद्यापही गायब

दादांच्या NCPतून पुण्यातील गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांना संधी
दादांच्या NCPतून पुण्यातील गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांना संधी.
भाजपच्या माजी आमदारांसमोर माजी नगरसेविकेचा गोंधळ, नेमकं घडलं काय?
भाजपच्या माजी आमदारांसमोर माजी नगरसेविकेचा गोंधळ, नेमकं घडलं काय?.
महायुती तुटताच शिंदेंच्या शिवसेनेत तुफान जल्लोष, कार्यकर्त्यांनी थेट..
महायुती तुटताच शिंदेंच्या शिवसेनेत तुफान जल्लोष, कार्यकर्त्यांनी थेट...
मातोश्रीच्या अंगणात बंडखोरी, ठाकरे सेनेतून राजीनामा सत्र अन् अपक्ष...
मातोश्रीच्या अंगणात बंडखोरी, ठाकरे सेनेतून राजीनामा सत्र अन् अपक्ष....
ठाकरेंची सेना मनसेच्या पाठीत खंजीर खुपसणार, कुणी केला मोठा दावा?
ठाकरेंची सेना मनसेच्या पाठीत खंजीर खुपसणार, कुणी केला मोठा दावा?.
ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांचा संताप अनावर, पक्षाचं बॅनरचं फाडलं अन्..
ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांचा संताप अनावर, पक्षाचं बॅनरचं फाडलं अन्...
संभाजीनगरात मोठा ड्रामा, तिकीट नाकराल्यानं भाजप कार्यकर्ते संतप्त
संभाजीनगरात मोठा ड्रामा, तिकीट नाकराल्यानं भाजप कार्यकर्ते संतप्त.
मंदा म्हात्रे संतापल्या, मुलाच्या AB फॉर्मवरून गणेश नाईकांना चॅलेंज
मंदा म्हात्रे संतापल्या, मुलाच्या AB फॉर्मवरून गणेश नाईकांना चॅलेंज.
राज्यातील 'या' 12 महापालिकांमध्ये शिवसेना-भाजप युती तुटली
राज्यातील 'या' 12 महापालिकांमध्ये शिवसेना-भाजप युती तुटली.
मनसेला पहिला मोठा धक्का, भांडुपमध्ये अनिशा माजगावकर अपक्ष लढणार
मनसेला पहिला मोठा धक्का, भांडुपमध्ये अनिशा माजगावकर अपक्ष लढणार.