अखेर 6 महिन्यांच्या तीराला 16 कोटींचं ‘ते’ औषध मिळालं

अखेर 6 महिन्यांच्या तीराला 16 कोटींचं 'ते' औषध मिळालं

दुर्धर आजाराने ग्रासलेल्या 6 महिन्यांच्या तीरा कामत या चिमुरडीला अखेर तिला बरं करु शकणारं औषध मिळालंय.

प्रविण शिंदे, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

|

Feb 26, 2021 | 7:38 PM

मुंबई : दुर्धर आजाराने ग्रासलेल्या 6 महिन्यांच्या तीरा कामत या चिमुरडीला अखेर तिला बरं करु शकणारं औषध मिळालंय. जीन रिप्लेसमेंट उपचारांमध्ये महत्त्वाचं ठरणारं हे ‘झोलजेन्स्मा’ औषध मागवण्यासाठी तीराच्या पालकांनी शर्तीचे प्रयत्न केले. हे औषध अमेरिकेतून मागवण्यात आले आहे. डॉक्टरांनी आज तीराला औषध दिलं. तिला माहिमच्या पी. डी. हिंदुजा रुग्णालयात डॉक्टरांच्या देखरेखीत ठेवण्यात आलंय. तीराला शनिवारी (27 फेब्रुवारी) रुग्णालयातून घरी सोडण्यात येणार आहे (Teera Kamat get her medicine of crore of rupees in Mumbai).

मागील काही महिन्यांपासून तीरावर उपचार व्हावेत म्हणून तिच्या पालकांनी शर्तीचे प्रयत्न केले होते. अखेर तिला हे औषध मिळाल्याने ती लवकरच बरी होईल अशी आशा डॉक्टरांनी व्यक्त केलीय. तीराच्या औषधासाठीचा संघर्ष पोहचलेल्या अनेकांनी तिची तब्येत लवकर बरी व्हावी म्हणून सदिच्छा व्यक्त केल्यात.

तीराचं औषध गुरुवारी (25 फेब्रुवारी) अमेरिकेतून मुंबईतील रुग्णालयात पोहचलं. हे औषध देण्याचा परवाना हिंदुजा रुग्णालयाकडे आहे. त्यामुळे तेथून परवाना मिळाल्यानंतरच हे औषध तीराला सलाईनमधून देण्यात आलं. आता एक दिवस तिला रुग्णालयात डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवण्यात येणार आहे. शनिवारी तिला रुग्णालयातून सोडण्यात येणार आहे.

हे औषध मिळणारी तीरा मुंबईतील दुसरी

या दुर्मिळ आजारावर औषध मिळणारी तीरा मुंबईतील दुसरं मूल आहे. याआधी काही महिन्यांपूर्वी अशाच प्रकारचे इंजेक्शन एका बाळाला देण्यात आलं होतं. देशात आतापर्यंत 11 बाळांना हे औषध देण्यात आलंय.

काय आहे तीराचा ‘स्पायनल मस्क्युलर अॅट्रॉफी’ आजार?

स्पायनल मस्क्युलर अॅट्रॉफी या आजाराला मेडिकल टर्ममध्ये SMA म्हणतात. हा आजार एकप्रकारे जेनेटिक डिसिज अर्थात जनुकीय बदलांमुळे होणारा आजार असल्याचं तज्ज्ञ सांगतात. या आजारात शरीरातील स्नायू कमकुवत होतात. सुरुवातीला हात, पाय आणि पुढे फुफ्फुसांच्या स्नायुंची शक्ती कमी होत जाते. त्याचबरोबर चेहरा आणि मानेच्या स्नायुंचं काम कमी होऊन गिळताना अडचण निर्माण होते. त्यामुळे रुग्णाला हालचाल करणंही कठीण बनतं. रुग्ण एकप्रकारे रेस्पिरेटरी पॅरलेलिससमध्ये जातो. हा आजार दिवसेंदिवस वाढत जातो.

हेही वाचा :

Teera Kamat : कामत कुटुंबियांना मोठा दिलासा, तीराच्या औषधांच्या करमाफीबाबत राज्य सरकारचं पत्र

Teera kamat : चिमुकल्या तीराला वाचवण्यासाठी 16 कोटी उभारले! सीमा शुल्कामुळे उपचाराला उशीर, आई-वडिलांची धडपड सुरुच

व्हिडीओ पाहा :

Teera Kamat get her medicine of crore of rupees in Mumbai

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें