मुंबई: केंद्र सरकारने समाजवादी पार्टीचे दिवंगत नेते मुलायम सिंह यादव यांना पद्मविभूषण पुरस्कार दिला आहे. त्यावरून दैनिक ‘सामना’च्या अग्रलेखातून केंद्र सरकारवर जोरदार टीका करण्यात आली आहे. ज्या मुलायमसिंह यादव यांनी कारसेवकांना गोळया घालून ठार केलं, ज्या मुलायमसिंह यांना भाजपने ‘मौलाना मुलायम’ म्हणून हिणवलं त्याच मुलायमसिंह यादव यांना पद्मविभूषण पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं. मात्र, स्वातंत्र्यवीर सावरकर आणि शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे या दोन हिंदुहृदय सम्राटांना पुरस्कार देण्यात आला नाही. त्यांना मोदी सरकार विसरले. सावरकरांना पुरस्कार देण्यापासून मोदी सरकारला कोणी रोखले होते? असा संतप्त सवाल दैनिक सामनाच्या अग्रलेखातून करण्यात आला आहे.