बीडीडी चाळींच्या पुनर्विकासातून म्हाडाला विक्रीसाठी 8 हजार 120 घरे उपलब्ध होणार

दुसरीकडे म्हाडाला विक्रीसाठी 8 हजार 120 घरे उपलब्ध होणार आहेत. ही सर्व घरे केवळ मध्यम आणि उच्च गटासाठीच आहेत. तीन टप्प्यात पुनर्विकास होणार आहे.

बीडीडी चाळींच्या पुनर्विकासातून म्हाडाला विक्रीसाठी 8 हजार 120 घरे उपलब्ध होणार
बीडीडी चाळींच्या पुनर्विकासातून म्हाडाला विक्रीसाठी 8 हजार 120 घरे उपलब्ध होणार

मुंबई : बीडीडी चाळीच्या पुनर्विकासाच्या प्रत्यक्ष कामाला अखेर आज सुरवात झाली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते वरळी बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पांतर्गत पुनर्वसन इमारतीच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला. या प्रकल्पातून फक्त बीडीडी चाळवासियांना घर मिळणारच आहे, पण त्याचबरोबर सोडतीसाठी देखील उपलब्ध होणार आहे. वरळी, नायगाव आणि ना. म. जोशी मार्ग येथील बीडीडी चाळींतील 15 हजार 593 रहिवाशांचे पुनर्वसन केले जाणार आहे. हे रहिवासी 160 चौरस फुटांच्या घरातून 500 चौरस फुटांच्या घरात जातील. (The redevelopment of BDD plots will provide 8,120 houses for sale to MHADA)

काय म्हणाले म्हाडाचे अधिकारी?

दुसरीकडे म्हाडाला विक्रीसाठी 8 हजार 120 घरे उपलब्ध होणार आहेत. ही सर्व घरे केवळ मध्यम आणि उच्च गटासाठीच आहेत. तीन टप्प्यात पुनर्विकास होणार आहे. ट्रान्झिट कॅम्पमध्ये जाण्यास रहिवाशांचा विरोध होता. त्यामुळे तीन टप्प्यात पुनर्विकास होणार असे म्हाडाचे मुख्य अधिकारी योगेश मसे यांनी सांगितले. ना.म. जोशी मार्ग आणि नायगाव बीडीडी चाळ प्रकल्प पुनर्विकासाचे कामही यासोबतच होणार, असे मसे यांनी नमूद केले.

पुनर्वसनातून 500 चौरस फुटाची सदनिका विनामूल्य मिळणार

शतकपूर्ती झालेल्या या चाळी आज अत्यंत जर्जर अवस्थेत आहेत म्हणूनच शासनाने बीडीडी चाळींच्या पुनर्विकास प्रकल्पाचे नियोजन आखले आहे. पिढ्यानपिढ्या 160 चौरस फुटाच्या एका बहुपयोगी खोलीत संसार थाटणाऱ्या हजारो रहिवाशांना या पुनर्वसनातून 500 चौरस फुटाची अत्याधुनिक सोयीसुविधा असलेली सदनिका विनामूल्य मिळणार आहे. येथील रहिवाशांच्या जीवनमानाचा दर्जा उंचावणार आहे. त्याचबरोबर सर्व सोयीसुविधांनी युक्त एक टाऊनशिप निर्माण होणार आहे. यामुळे नागरी सुविधांचे नियोजन उत्कृष्ट होण्यास मदत होणार आहे.

पुनर्विकास प्रकल्पात 9 हजार 689 पुनर्वसन सदनिका

वरळी येथे 121 चाळी असून वरळी बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पात पुनर्वसनातून 9 हजार 689 पुनर्वसन सदनिका (निवासी 9394 + अनिवासी 295) बांधण्यात येणार आहेत. या प्रकल्पात तळ + 40 मजल्यांच्या 33 पुनर्वसन इमारती बांधल्या जाणार आहे. रुग्णालय, वसतिगृह, शाळा, जिमखाना इत्यादी सुविधांकरिता स्वतंत्र इमारतींची उभारणी केली जाणार आहे. नमुना सदनिकेचे बांधकाम पूर्ण झाले आहे. प्रत्येक सदनिकांमध्ये 800 बाय 800 मिलिमीटरच्या व्हिट्रिफाईड टाईल्स बसविण्यात येणार आहे. (The redevelopment of BDD plots will provide 8,120 houses for sale to MHADA)

इतर बातम्या

बीडीडी पुनर्विकासाचं काम कुणाच्या काळातलं? फडणवीस म्हणतात भूमिपूजन सुद्धा झाले होते !

VIDEO : पब्लिक मार, ICICI बँकेत दरोडा, पळून जाणाऱ्या नराधमाला पकडला, लोकांनी लाथा-बुक्क्यांनी तुडवला

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI