TV9 special:मुख्यमंत्र्यांचे नीकटवर्तीय आणि शिवसेनेचे ‘हे’ 8 चेहरे केंद्रीय तपास यंत्रणांच्या रडारवर, ‘या’ 10 प्रश्नांची उत्तरे कोण देणार?

हे आठ शिवसेनेचे नीकटवर्तीय केंद्रीय यंत्रणांच्या रडारवर असले तरी याबाबत शिवसेना-भाजपा १० प्रश्नांची उत्तर देणार का. हा प्रश्न आहे. 

TV9 special:मुख्यमंत्र्यांचे नीकटवर्तीय आणि शिवसेनेचे 'हे' 8 चेहरे केंद्रीय तपास यंत्रणांच्या रडारवर, 'या' 10 प्रश्नांची उत्तरे कोण देणार?
8 faces 10 questionsImage Credit source: TV 9 marathi
Follow us
| Updated on: May 26, 2022 | 3:57 PM

मुंबई – राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब (Anil Parab)यांच्या निवासस्थानैासह सात ठिकाणी ईडीचे छापे (ED raids)आज पडले. हा शिवसेनेसाठी मोठा धक्का मानण्यात येतो आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray)यांच्या मंत्रिमंडळातील दोन मंत्री अनिल देशमुख आणि नवाब मलिक हे केंद्रीय यंत्रणांच्या तपासात आधीच जेलमध्ये आहेत. यातच आता परब यांच्यावर केलेल्या कारवाईनंतर त्यांनाही ईडीकडून अटक करण्यात येईल, अशी शक्यता वर्तवण्यात येते आहे. गेल्या दोन ते तीन वर्षांत शिवसेना नेत्यांवर केंद्रीय तपास यंत्रणाची करडी नजर आहे. आत्तापर्यंत मुख्यमंत्र्यांशी नीकटवर्तीय असलेल्या आणि शिवसेनेचे नेते असलेल्या आठ जणांवर केंद्रीय तपास यंत्रणांनी कारवाई केलेली आहे. तसेच ठाकरे कुटुंबातील रश्मी ठाकरे आणि आदित्य ठाकरेंवरही भाजपा नेते किरिट सोमय्या यांनी घोटाळ्याचे आरोप केलेले आहेत. आत्तापर्यंत ज्या आठ जणांवर कारवाई झाली आहे, त्यावर एक नजर

1. प्रताप सरनाईक – ठाण्यातील शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांच्या घरासह मुंबई, ठाण्यातील १० ठिकाणी २४ नोव्हेंबर २०२० रोजी छापेमारी केली होती. त्यानंतर त्यांचा मुलगा विहंग यांनाही समन्स पाठवण्यात आले होते. त्यानंतर डिसेंबरमध्ये ईडीच्या चौकशीला सामोरे जाणार असल्याचे सरनाईक यांनी सांगितले होते. २०२१ साली त्यांच्या खंडाळ्याच्या फार्महाऊसवरही सीबीआयने छापा टाकण्यात आला होता. तर २२ मार्च २०२२ रोजी सरनाईक यांनी ११ कोटी ३५ लाखांची संपत्ती ईडीने जप्त केली होती. एनएसईएल आर्थिक घोटाळा प्रकरणात ही कारवाई करण्यात आल्याचे ईडीकडून सांगण्यात आले होते. या प्रकरणात २५ हून अधिक जणांना अटक करण्यात आली असून आत्तापर्यंत ३२४५ कोटींची मालमत्ता जप्त केल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यानच्या काळआत उद्धव ठाकरेंना सरनाईक यांनी पत्र पाठवून भाजपाशी जुळवून घ्यावे असा सल्लाही दिला होता.

2. आनंदराव अडसूळ – सप्टेंबर २०२१ साली शिवसेनेचे अमरावतीचे माजी खासदार आनंदराव अडसूळ यांच्यासह त्यांचा मुलगा आणि जावयाच्या घरी आणि कार्यालयावर ईडीने धाडी घातल्या होत्या. एकूण सहा ठिकाणी ही कारवाई करण्यात आली. मुंबईतीलस सिटी बँकेतील ९०० कोटींच्या घोटाळ्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आल्याचे ईडीकडून सांगण्यात आले. या दरम्यान काही कागदपत्रे जप्त करण्यात आली. त्यानंतचर सप्टेंबर २०२१ मध्ये पुन्हा त्यांना या प्रकरणात ईडीचे समन्स पाठवण्यात आल्यानंतर, त्यांच्या मुंबईच्या घरी छापेमारी करण्यात आली, त्यावेळी अडसूळ रुग्णालयात दाखल झाले होते. त्यानंतर अटकपूर्व जामिनासाठी अडसूळ प्रयत्नरत आहेत.

हे सुद्धा वाचा

3. भावना गवळी स्वीय सहाय्यकामुळे अडचणीत आलेल्या भावना गवळी यांच्यावर ईडीने कारवाई केली आहे. २०२० साली भावना गवळी यांनी स्वीय सहाय्यकाने संस्थेत कोट्यवधींचा भ्रष्टाचार केला, असा आरोप केला होता. त्या आधारावर किरीट सोमय्या यांनी गवळींना लक्ष्य केले होते. भावना गवळींकडे एवढे पैसे आले कुठून हा प्रश्न त्यांनी विचारला होता. त्यानंतर ईडीने चौकशी केली, त्यात गवळी व सईद यांच्याविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. ईडीने सप्टेंबर २०२१ मध्ये गवळींच्या संबंधइतांवर छापे घातले होते. त्यात सईद खानला अटक केली होती. उत्कर्ष ही विश्वस्त संस्था नंतर कंपनी करण्यात आली. त्यात भावना गवळी यांच्या आई आणि सईद हे संचालक आहेत. बनावट कागदपत्रे सादर करुन पैशांचा अपहार केल्याचा आरोप आहे. चार समन्स या प्रकरणात भावना गवळी यांना पाठवण्यात आली आहेत. त्या अद्यापही या प्रकरणाच चौकशीला आलेल्या नाहीत. त्यांना अटक होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

4. सचिन वाझे एन्काऊंटर स्पेशालिस्ट आणि निवडणुकीपूर्वी शिवसेनेत प्रवेश केलेले बडतर्फ सचिन वाझे यांच्यामुळेही शिवसेनेची अडचण वाढली आहे. कोरोना काळात २०२० साली त्यांना पुन्हा नोकरीवर घेण्यात आले. त्य़ांच्याकडे गुन्हे शाखेची जबाबदारी देण्यात आली होती. याच काळात अंबानी यांच्या निवासस्थानाबाहेर स्फोटकांनी भरलेली कार सापडली. ती एसयूव्ही आणि ठाण्यातील मनसुख हिरेन हत्येप्रकरणी वाझेंनाच एनआयएकडून अटक करण्यात आली होती. याच दरम्यान मुंबईचे माजी पोलीस आय़ुक्त परमबीर सिंग यांनी राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सचिन वाझेमार्फत मुंबईतून १०० कोटींची खंडणी जमा करण्याचे आदेश दिले होते, असा आरोप केला होता. त्यानंतर या प्रकरणात माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनाही अटक करण्यात आलेली आहे.

5. श्रीधर पाटणकर – उद्धव ठाकरे यांचे मेव्हणे श्रीधर पाटणकर यांच्या श्री साईबाबा गृहनिर्मिती प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीवर २२ मार्च २०२२ रोजी ईडीने कारवाई केली. या कंपनीचे ११ फ्लॅट्स ईडीने जप्त केले, ही मालमत्ता ६.५ कोटींची आहे. त्यानंतर लगेचच ठाण्यातील पाचपाखआडी भागातील पाटणकर यांची मालमत्ताही ईडीच्या रडारवर असल्याची माहिती समोर आली होती. यासंबंधांतील व्यवहार ईडीला संशयास्पद वाटलेले आहेत.

6. यशवंत जाधव – मुंबई महापालिकेचे स्थायी समितीचे अध्यक्ष यशवंत जाधव आणि त्यांच्या पत्नी आमदार यामिनी जाधव यांच्यावरही आयकर विभागाने फेब्रुवारी २०२२ मध्ये कारवाई केली होती. त्यांच्या ५ कोटींच्या फ्लॅटसह ४१ मालमत्ता जप्त करण्यात आल्या आहेत. यात भायखळ्यातील बिलकहाडी चेंबर्समधील ३१ फ्लॅट्स, वांद्र्यातील ५ कोटी रुपये आणि भायखळ्यातील हॉटेल क्राऊन इम्पिरियल यांचा समावेश आहे. २०१८ ते २०२२ या काळात त्यांनी स्थायी समितीचे अध्यक्ष असताना काळा पैशांतून या मालमत्ता खरेदी केल्याचा आरोप आहे. त्यांच्या काही नातेवाईकांचीही चौकशी यात करण्यात आली आहे. दरम्यान फेमा कायद्याअंतर्गतही त्यांना नुकतेच समन्स बजावण्यात आले आहेय. हवालाच्या मार्फत काही व्यवहार केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे.

7. संजय राऊत शिवसेना खासदार आणि मविआ सरकारचे शिल्पकार संजय राऊत यांच्यावरही ईडीने कारवाई केलेली आहे. ५ एप्रिल २०२२ रोजी राऊतांचे अलिबागमधील ८ भूखंड आणि दादरमधील राहता फ्लॅट ईडीने जप्त केला. १ हजार ३४ कोटींच्या पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली. या प्रकरणात राऊत यांचे नीकटवर्तीय प्रवीण राऊत यांना अटक करण्यात आली होती. त्यांच्या चौकशीत आलेल्या माहितीच्या आधारे ईडीने ही कारवाई केल्याचे सांगण्यात आले. पत्रचाळ घोटाळ्यातील काही पैसे राऊतांना मिळाले, त्यातूनच भूखंड घेतल्याचा आरोप आहे. ही कारवाई सूडबुद्धीतून झाल्याचा आरोप राऊतांनी केला होता.

8. अनिल परब – राज्याचे परिवहनमंत्री अनिल परब यांच्यावर ईडीकडून गुनहा दाखल करण्यात आला असून, त्यांच्या मुंबई, पुणे आणि दापोली येथील सात ठिकाणी ईडीने २६ मे २०२२ रोजी छापेमारी केली आहे. त्यांचे सरकारी निवासस्थान शिवालय आणि वांद्रे येथील त्यांच्या घरावर छापे टाकण्यात आलेत. अनिल परब हे उद्धव ठाकरे यांचे नीकटवर्तीय मानले जातात. त्यांच्यावरची ही कारवाई शिवसेनेसाठी धक्का मानण्यात येते आहे.

हे आठ शिवसेनेचे नीकटवर्तीय केंद्रीय यंत्रणांच्या रडारवर असले तरी याबाबत शिवसेनाभाजपा १० प्रश्नांची उत्तर देणार का. हा प्रश्न आहे. 

  1.  केंद्रीय तपास यंत्रणांची कारवाई सूडबुद्धीने, होत असेल तर त्याचे योग्य उत्तर शिवसेना पक्षप्रमुख म्हणून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे का देत नाही ? त्यांचे या सगळ्या प्रकरणांत मौन का ?
  2. राऊत, परबांवर आरोप झाल्यानंतर ईडी जप्तीसारखी कारवाई करत असेल तर शिवसेनेची न्यायालयीन भूमिका काय?
  3. संजय राऊत यांनीही किरीट सोमय्या यांच्यावर आरोप केले, पण त्याचे कागदोपत्री पुरावे का सादर केले नाही ?केवळ शिवराळ भाषा वापरल्याने हे आरोप पुसले जातील किंवा खोटे ठरतील असे वाटते का?
  4. सामान्य माणसाला एवढ्या कोट्यवधींची संपत्ती, मालमत्ता उभ्या करणे शक्य आहे का ?
  5. या जप्तीतील मालमत्तांचे आकडे खोटे आहेत का, याचे स्पष्टीकरण पक्ष देणार का ?
  6. राज्य सरकारची पोलीस यंत्रणा असतानाही, स्वतंत्र आर्थिक गुन्हा शाखा असतानाही भाजपा नेत्यांचे भ्रष्टाचार उघडकीस का येत नाहीत ?
  7. राज्यातील गृहखाते हे सगळे करण्यात अपयशी ठरते आहे का ?
  8.  शिवसेनाभाजपा युती असती तर हे सगळे आरोप झाले असते का, किरीट सोमय्यांनी खरंच इतका पुढाकार घेतला असता का?
  9. भाजपाच्या नेत्यांवर होत असलेल्या आरोपांची केंद्रीय तपास यंत्रणांकडून चौकशी का करण्यात येत नाही?
  10. केवळ राजकीय दबावासाठी आणि सत्तेच्या राजकारणासाठी अशा कारवाया होत आहेत का?
Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान.
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित.
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.