Mumbai fire : धक्कादायक! आगीत होरपळलेल्यांना तीन रुग्णलयांनी उपचार नाकारले! महापौरांचे चौकशीचे आदेश

Mumbai fire : धक्कादायक! आगीत होरपळलेल्यांना तीन रुग्णलयांनी उपचार नाकारले! महापौरांचे चौकशीचे आदेश
kishori pednekar

आगीत होरपळलेल्यांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आले होते, मात्र तीन रुग्णालयांनी उपचार करण्यास नकार दिल्याची धक्कादायक माहिती मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर (Kishori pednekar) यांनी दिली आहे.

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: दादासाहेब कारंडे

Jan 22, 2022 | 6:32 PM

मुंबई : मुंबईत आज लागलेल्या आगीत (Mumbai fire) सहा जणांचा मृत्यू झाला आहे. नाना चौक गवालिया टँक येथील भाटिया रुग्णालयाजवळील कमला (Kamla building Fire) इमारतीला ही आग लागली होती. या आगीत होरपळलेल्यांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आले होते, मात्र तीन रुग्णालयांनी उपचार करण्यास नकार दिल्याची धक्कादायक माहिती मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर (Kishori pednekar) यांनी दिली आहे. मसिना, व्होकहार्ड, रिलायन्स या रुग्णालयांनी उपचार नाकारले अशी नावंही किशोरी पडणेकर यांनी सांगितली आहेत. या रुग्णलयांनी अशा आणिबाणीच्या वेळेला उपचार का नाकारले? याबाबत चौकशीचे आदेश मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिले आहेत. चौकशीनंतर योग्य ती कारवाई केली जाईल असेही महापौर म्हणाल्या आहेत. या रुग्णालयाकडून उपचार का नाकारले याबाबत महापौरांनी स्पष्टीकरण मागवले आहे. ते स्पष्टीकरण आल्यानंतर समाधानकारक उत्तर नसेल तर या रुग्णलयांना कारवाईला सामोरे जावे लागणार आहे.

आदित्य ठाकरे काय म्हणाले?

मुंबईच्या महापौरांनी सांगितल्याप्रमाणे या प्रकरणाची चौकशी केली जाईल. कोणताही रुग्ण आल्यानंतर त्याला अॅडमिट करून घेऊन, त्याला स्थिर करणे हे रुग्णलायचे प्रथम कर्तव्य असते, ते या रुग्णलयांनी का केलं नाही? याची पडताळणी करून निर्णय घेतला जाईल, असे आदित्य ठाकरे म्हणाले आहेत. तसेच घटनास्थळी असलेल्या उपकरणांचा वेळीच योग्य वापर केल्यास अशा दुर्घटनांवर मात केली जाऊ शकते असेही ते म्हणाले आहे. मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर आणि आदित्य ठाकरे यांनी घटनास्थळाला भेट देऊन पाहणी केली आहे.

आगीची घटना दुर्देवी असून आग लागल्यानंतर तात्काळ घटनास्थळावर महापालिकेचे अग्निशमन दल पोहोचले होते. जितक्या लोकांना बाहेर काढणे शक्य झाले तितक्या सगळ्या लोकांना बाहेर काढण्याचा प्रयत्न अग्निशमन दलाने केला आहे. त्यासोबतच माजी नगरसेवक अरुण दुधवडकर यांच्या टीमने सुद्धा बऱ्याच नागरिकांना इमारतीबाहेर काढण्याचे काम केले. नायर व कस्तुरबा रुग्णालयात जाऊन जखमींची विचारपूस केली त्यांना धीर दिला, असं महापौर किशोरी पेडणेकर यांनी सांगितलं. आगीच्या वाढत्या घटना लक्षात घेता, वीजपुरवठा करणारी यंत्रणा ही सहा महिन्यातून एकदा तपासली गेली पाहिजे. त्यासोबतच आठवड्यातून शनिवार व रविवारला उंच इमारतीमधील नागरिकांचे विविध गट तयार करून त्यांना अग्निशमन यंत्राद्वारे आग विझवण्याचे प्रात्यक्षिक व प्रशिक्षण देणे गरजेचे आहे. याबाबत महापालिका स्तरावर योग्य ती कार्यवाही तातडीने करण्यात येणार असल्याचे महापौरांनी सांगितले.

Fire Audit : मुंबईतील किती इमारतींचं फायर ऑडिट झालंय? माहिती देण्यास अग्निशमन दलाची टाळाटाळ

Mumbai Fire: आग कशी विझवायची? मुंबई महापालिका देणार धडे; बीएमसीचे वरातीमागून घोडे

Mumbai Fire : कमला इमारतीच्या आगीत 6 जणांचा मृत्यू, 23 जखमी, संपूर्ण यादी एका क्लिकवर

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें