तीन नेते म्हणजे शिवसेना नाही, ईडीच्या कारवायांमागे राजकारण नाही; सुधीर मुनगंटीवार यांचा टोला

शिवसेना नेते आनंदराव अडसूळ, परिवहन मंत्री अनिल परब आणि खासदार भावना गवळी यांच्यामागे ईडीचा ससेमिरा लागला आहे. त्यावर भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. (sudhir mungantiwar)

तीन नेते म्हणजे शिवसेना नाही, ईडीच्या कारवायांमागे राजकारण नाही; सुधीर मुनगंटीवार यांचा टोला
सुधीर मुनगंटीवार, भाजप नेते
समीर भिसे

| Edited By: भीमराव गवळी

Sep 28, 2021 | 3:04 PM

मुंबई: शिवसेना नेते आनंदराव अडसूळ, परिवहन मंत्री अनिल परब आणि खासदार भावना गवळी यांच्यामागे ईडीचा ससेमिरा लागला आहे. त्यावर भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. तीन नेते म्हणजे शिवसेना नाही. ईडीच्या कारवायांमागे राजकारण नाही, असं सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटलं आहे. (three leaders means not whole shiv sena says sudhir mungantiwar)

सुधीर मुनगंटीवार यांनी टीव्ही9 मराठीशी संवाद साधला. यावेळी त्यांनी ही प्रतिक्रिया व्यक्त केली. शिवसेनेच्या मंत्र्यांवर, नेत्यांवर ईडीची होणारी कारवाई हा यंत्रणेच्या तपासाचा भाग आहे. यामध्ये कुठलेही राजकारण नाही, असे भाजप नेते सुधीर मुनगंटीवार म्हणाले. यापूर्वीही अनेक नेत्यांवर ईडीच्या कारवाया झाल्या आहेत. तेव्हा का ओरड केली नाही? असा सवाल करतानाच तीन नेते म्हणजे शिवसेना नाही, असा चिमटाही त्यांनी काढला.

अन्य राज्यांचे पॅनल का?

यावेळी त्यांनी आरोग्य विभागाच्या भरती प्रक्रियेवरही टीका केली. राज्यसरकरच्या आरोग्य भरती प्रक्रियेतील गोंधळ सुरू असताना आता राज्यातील भरती परीक्षा घेणाऱ्यांचे पॅनल हे अन्य राज्यांचे का? यामुळे राज्यातील विद्यार्थ्यांवर अन्याय होतोय. परीक्षांमध्ये घोळ होतोय, अशी टीका मुनगंटीवार यांनी केली आहे. महाराष्ट्र बंगळुरुपेक्षा IT आणि शिक्षण क्षेत्रात नंबर वन म्हणता मग येथील IT कंपन्यांना भरती परीक्षेत वाव का देत नाही? असा सवालही त्यांनी केला.

पूरग्रस्तांना तातडीने मदत करा

मराठवाडा, विदर्भातील महापुराची परिस्थिती पाहता सरकारने शेतकऱ्यांना तत्काळ मदत करावी. केवळ केंद्र सरकार मदत करत नाही अशी टीका करत फिरू नये, तर सरकारने आधी मदतीचा हात पुढे करावा, असा सल्ला त्यांनी दिला. शेजाऱ्यांना रडणारे नाही तर लढणारे सरकार हवे आहे, असा चिमटाही त्यांनी काढला.

अजितदादांच्या समितीला देशाला फायदा होईल

यावेळी जीएसटीच्या मुद्द्यावरून त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. जीएसटीमधील त्रुटी दूर करून उपाय सुचविण्यासाठी मंत्र्यांची जी उपसमिती केंद्राने बनवली आहे. त्या समितीचे अध्यक्ष अजित पवार आहेत. या समितीचा फायदा फक्त महाराष्ट्रालाच नव्हे तर देशाला सुद्धा होईल, असं ते म्हणाले.

शिवसेनेचे 5 नेते ईडीच्या रडारवर

दरम्यान, शिवसेनेचे पाच  बडे नेते ईडीच्या रडारवर असल्याचं दिसतंय. परिवहन मंत्री अनिल परब हे 100 कोटी वसुलीप्रकरणात ईडीच्या निशाण्यावर आहेत. तर माजी खासदार आनंदराव अडसूळ सिटी को ऑपरेटिव्ह बँकेतील 900 कोटींच्या अफरातफरीचे आहेत. दुसरीकडे यवतमाळ-वाशिमच्या खासदार भावना गवळी या सुद्धा ईडीच्या रडारवर आहेत. भावना गवळी यांनीही मनी लाँडरिंग केल्याचा आरोप आहे. याप्रकरणात भावना गवळी यांच्या कंपनीतील संचालकाला ईडीने अटक केली आहे. ईडीने सईद खान याला अटक करुन आज कोर्टात हजर केलं जाणार आहे. (three leaders means not whole shiv sena says sudhir mungantiwar)

संबंधित बातम्या:

Video: उद्धव ठाकरेंनी सत्तेत घेतलं म्हणून हे जिवंत, अन्यथा मेले असते, शिवसेना समर्थक आमदाराची जीभ घसरली

ठाण्यातील खड्डे हे भ्रष्टाचाराचे अड्डे; कल्याण-डोंबिवलीपाठोपाठ ठाण्यातील भाजपचे दोन आमदारही आक्रमक

अतिवृष्टीनं प्रचंड नुकसान; महाराष्ट्राला 7 हजार कोटी मदत द्या, विजय वडेट्टीवारांची मागणी

(three leaders means not whole shiv sena says sudhir mungantiwar)

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें