AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मध्य आणि पश्चिम रेल्वेवर आज मेगाब्लॉक

मुंबई : रेल्वेच्या तिन्ही मार्गावर आज (12 मे) मेगाब्लॉक घेण्यात आला आहे. मध्य, पश्चिम आणि हार्बर रेल्वेच्या मार्गावरील पायाभूत सुविधा, सिग्नल यंत्रणा, रेल्वे रुळ आणि इतर कामासाठी हा ब्लॉक असेल. आज पश्चिम रेल्वेच्या सांताक्रुझ ते माहिम रेल्वे स्टेशन दरम्यान जम्बोब्लॉक घेण्यात आला आहे. मध्य रेल्वेच्या ठाणे ते कल्याण स्टेशन दरम्यानही ब्लॉक घेण्यात आला असून हार्बर मार्गावर […]

मध्य आणि पश्चिम रेल्वेवर आज मेगाब्लॉक
लोकल ट्रेन
| Edited By: | Updated on: Jul 05, 2019 | 3:38 PM
Share

मुंबई : रेल्वेच्या तिन्ही मार्गावर आज (12 मे) मेगाब्लॉक घेण्यात आला आहे. मध्य, पश्चिम आणि हार्बर रेल्वेच्या मार्गावरील पायाभूत सुविधा, सिग्नल यंत्रणा, रेल्वे रुळ आणि इतर कामासाठी हा ब्लॉक असेल. आज पश्चिम रेल्वेच्या सांताक्रुझ ते माहिम रेल्वे स्टेशन दरम्यान जम्बोब्लॉक घेण्यात आला आहे. मध्य रेल्वेच्या ठाणे ते कल्याण स्टेशन दरम्यानही ब्लॉक घेण्यात आला असून हार्बर मार्गावर आज कोणताही ब्लॉक घेण्यात आला नाही. ब्लॉक दरम्यान सर्व लोकल 20 ते 25 मिनिटे उशिराने धावतील.

मध्य रेल्वे

मध्य रेल्वेवर ठाणे ते कल्याण दरम्यान ब्लॉक घेण्यात आला आहे. ओव्हरहेड वायर आणि सिग्नलसह इतर अन्य इतर कामांसाठी हा ब्लॉक घेण्यात आलाय. यामुळे धिम्या मार्गावरील लोकल या जलद मार्गावर वळवल्या जाणार आहेत. सकाळी 11 ते दुपारी 4 वाजेपर्यंत हा ब्लॉक असेल. ब्लॉक दरम्यान डाऊन लोकल जलद मार्गावर वळवल्या जातील. यासोबतच कळवा, मुंब्रा आणि ठाणे स्टेशनवर लोकल थांबणार नाही.

ठाणे ते दिवा दरम्यानही अप धिम्या मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात आला आहे. हा ब्लॉक सकाळी 11 ते दुपारी 2 पर्यंत असेल.

पश्चिम रेल्वे

पश्चिम रेल्वेवर अप आणि डाऊन दोन्ही मार्गावर ब्लॉक घेण्यात आला आहे. सकाळी 10.35 ते 3.35 दरम्यान हा ब्लॉक आहे. ब्लॉक दरम्यान सर्व लोकल अप डाऊन मार्गावर वळवल्या जातील. महालक्ष्मी, प्रभादेवी, माटुंगा रोड या स्थानकावर एकही लोकल थांबणार नाही.

Follow Us
शरद पवार यांना ब्रीच कँडी रुग्णालयातून डिस्चार्ज, पवारांची प्रकृती....
शरद पवार यांना ब्रीच कँडी रुग्णालयातून डिस्चार्ज, पवारांची प्रकृती.....
गिधाड धमक्या देऊ नका, तुम्ही संप पुकारलात तर आम्हीही रस्त्यावर उतरू...
गिधाड धमक्या देऊ नका, तुम्ही संप पुकारलात तर आम्हीही रस्त्यावर उतरू....
बीड कारागृहातून धक्कादायक माहिती, आणखी एक ऑडिओ क्लिप समोर
बीड कारागृहातून धक्कादायक माहिती, आणखी एक ऑडिओ क्लिप समोर.
गांधी हत्येचं मुनींकडून समर्थन, हर्षवर्धन सपकाळ भयंकर संतापले....
गांधी हत्येचं मुनींकडून समर्थन, हर्षवर्धन सपकाळ भयंकर संतापले.....
सदावर्ते यांच्या मराठी विरोधातील भूमिकेला मनसे कार्यकर्त्यांचा विरोध
सदावर्ते यांच्या मराठी विरोधातील भूमिकेला मनसे कार्यकर्त्यांचा विरोध.
सहानुभूतीची लाट की राजकीय गणित?; पवार कुटुंबातील सदस्याचं विधान चर्चेत
सहानुभूतीची लाट की राजकीय गणित?; पवार कुटुंबातील सदस्याचं विधान चर्चेत.
लिंगपिसाट खरातला घाम फोडणारी बातमी, बडा मासा ईडीच्या जाळ्यात; थेट धाड
लिंगपिसाट खरातला घाम फोडणारी बातमी, बडा मासा ईडीच्या जाळ्यात; थेट धाड.
बारामती पोटनिवडणूक: काटेवाडीत सुनेत्रा पवारांसह पवार कुटुंबाचे मतदान
बारामती पोटनिवडणूक: काटेवाडीत सुनेत्रा पवारांसह पवार कुटुंबाचे मतदान.
रिक्षा-टॅक्सी चालकांचा सरकारविरोधात आक्रमक पवित्रा
रिक्षा-टॅक्सी चालकांचा सरकारविरोधात आक्रमक पवित्रा.
सकाळी 9 वाजेपर्यंत तामिळनाडू आणि पश्चिम बंगालमध्ये किती टक्के मतदान?
सकाळी 9 वाजेपर्यंत तामिळनाडू आणि पश्चिम बंगालमध्ये किती टक्के मतदान?.