AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Tukaram Munde: सिंघमची पुन्हा बदली; तुकाराम मुंढे ऑन मिशन! 21 वर्षांच्या कारकि‍र्दीतील 25 वी बदली, कुणावर कोसळणार ‘आपत्ती’?

Tukaram Munde Transfer: प्रशासनातील सिंघम म्हणून ख्याती असलेले तुकाराम मुंढे यांची पुन्हा एकदा बदली झाली आहे. तुकाराम मुंढे हे नेहमी ऑन मिशन असल्याचे म्हटले जाते. आता त्यांना या खात्याची जबाबदारी मिळाली आहे. त्यामुळे कुणावर आपत्ती ओढवणार याची कुजबुज ते येण्यापूर्वीच या खात्यात सुरू झाली आहे.

Tukaram Munde: सिंघमची पुन्हा बदली; तुकाराम मुंढे ऑन मिशन! 21 वर्षांच्या कारकि‍र्दीतील 25 वी बदली, कुणावर कोसळणार 'आपत्ती'?
तुकाराम मुंढे यांची बदली Image Credit source: गुगल
| Updated on: Apr 01, 2026 | 1:01 PM
Share

Tukaram Munde Transfer: डॅशिंग आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे यांची पुन्हा एकदा बदली करण्यात आली. 21 वर्षांच्या कारकि‍र्दीतील ही त्यांची 25 वी बदली आहे. मुंढे आणि बदली हे समीकरण तसं जुनंच आहे. मुंढे नेहमी ऑन मिशनच असतात. त्यामुळे त्यांना कोणत्याही खात्यात पाठवले तरी ते ऑपरेशन करूनच बाहेर पडतात असा कर्मचार्‍यांचा दांडगा अनुभव आहे. राज्य सरकारने बुधवारी राज्यातील 10 सनदी अधिकाऱ्यांच्या बदलीचे आदेश काढले. त्यात मुंढे यांचाही समावेश होता. आता तर तुकाराम मुंढे यांना आपत्ती व्यवस्थापन खात्याची धुरा देण्यात आली आहे. त्यामुळे कुणावर आपत्ती कोसळणार याची कुजबुज या विभागात सुरू झाली आहे.

मुंढे यांची 25 वी बदली

गेल्या 21 वर्षांतील तुकाराम मुंढे यांची ही 25 वी बदली आहे. त्यांच्याकडे आता आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन विभागाचे सचिव म्हणून जबाबदारी असेल. ते या पदावर किती काळ राहतील हे महत्त्वाचे नाही तर ते या काळात काय धडाडीचे निर्णय घेतात याची मोठी चर्चा असते. ते जे काही निर्णय घेतात, त्यामुळे प्रशासन, अधिकारी आणि मंत्र्यांची पण धाबे दणाणते. त्यामुळे मुंढेंना आमच्या विभागात पाठवू नका यासाठी अनेक कर्मचारी देव पाण्यात ठेवतात. तर मुंढेंसारखा अधिकारी कामचुकार विभागात पाठवा अशी जनतेची मागणी असते.

दिव्यांग विभाग मुंढे येताच धावला

तुकाराम मुंढे यांच्याकडे यापूर्वी दिव्यांग विभागाची जबाबदारी होती. दिव्यांग विभागाची मरगळ त्यांनी झटकलीच पण अर्थपूर्ण कृत्यांनाही आळा घातला. दिव्यांगाची बोगस प्रमाणपत्र जोडून नोकऱ्या मिळवणारे कर्मचारी, अधिकाऱ्यांना एकामागून एक दणके दिले. बोगस दिव्यांग संस्थांची नोंदणी रद्द केली. बोगस प्रमाणपत्र वाटपातील कर्मचारी, अधिकारी यांच्याविरोधात कारवाईचा धडाकाच लावला. त्यामुळे संपूर्ण दिव्यांग खातंच नाही तर इतर खात्यातील अधिकारीही धास्तावले. दबाव वाढल्यानंतर मुंढे यांची बदली करण्यात आल्याचा आरोप करण्यात येत आहे.

मुंढे हे 2205 च्या बॅचचे आयएएस अधिकारी आहेत. त्यांनी सोलापूरचे उपजिल्हाधिकारी म्हणून ऑगस्ट 2005 मध्ये प्रशासकीय कारकि‍र्दीला सुरुवात केली होती. त्यानंतर विविध जिल्ह्यात जिल्हाधिकारी व महापालिका आयुक्त आणि सचिवपदी त्यांनी धडाडीने काम केले. प्रत्येक ठिकाणी त्यांची कामगिरी वाखणण्याजोगी होती. त्यांनी कर्मचाऱ्यांकडून शिस्तेचे धडे गिरवून घेतले. पाठीवर बिऱ्हाड असणारा अधिकारी म्हणून ते ओळखले जातात. त्यांच्यावर बदलीचा काही एक परिणाम होत नाही.

Follow Us
मविआत ठरलं नाही अन् ठाकरे गटाने उमेदवार उतरवला; काँग्रेस-उबाठा...
Vidhan Parishad Election : मविआत ठरलं नाही अन् ठाकरे गटाने उमेदवार उतरवला; अमरावतीत काँग्रेस-उबाठा आमनेसामने
एल निनोचा धोका, सरकारचा मास्टर प्लॅन नेमका काय?
Maharashtra Drought : एल निनोचा धोका, महाराष्ट्रात पाण्याचं मायक्रो प्लॅनिंग; सरकारचा मास्टर प्लॅन नेमका काय?
कर्जमाफीवर संजय शिरसाटांचं मोठं वक्तव्य; म्हणाले, एकही शेतकरी....
Sanjay Shirsat : कर्जमाफीवर संजय शिरसाटांचं मोठं वक्तव्य; म्हणाले, एकही शेतकरी....
फुटीरवादी नेत्यांमुळे आंबेडकरी चळवळीचं नुकसान; सचिन खरातांचा....
Sachin Kharat On Abhijeet Dipake : फुटीरवादी नेत्यांमुळे आंबेडकरी चळवळीचं नुकसान; सचिन खरातांचा अभिजीत दिपकेंवर थेट निशाणा, पण खरात असं का म्हणाले?
कोल्हापूर अंबाबाई मंदिरात आज दिवसभर देवीच्या मूर्तीचे दर्शन बंद
कोल्हापूर अंबाबाई मंदिरात आज दिवसभर देवीच्या मूर्तीचे दर्शन बंद
जिल्हा बँक निवडणुकीत राम शिंदेंचा मोठा निर्णय; म्हणाले, पदाची निष्पक्ष
Ahilyanagar Election : जिल्हा बँक निवडणुकीत राम शिंदेंचा मोठा निर्णय; म्हणाले, पदाची निष्पक्षता जपण्यासाठी...
राणेंचा उद्धव ठाकरेंवर हल्ला; आदित्य यांच्या पासपोर्ट जप्तीची मागणी
राणेंचा उद्धव ठाकरेंवर हल्ला; आदित्य यांच्या पासपोर्ट जप्तीची मागणी
'राऊतांना मोदींवर टीका करण्याचा अधिकार नाही', परिणय फुकेंचं वक्तव्य
Video :
मंगेश चिवटेंच्या उमेदवारीवर शहाजी बापू पाटलांचा यू-टर्न
मंगेश चिवटेंच्या उमेदवारीवर शहाजी बापू पाटलांचा यू-टर्न, विरोध मागे घेऊन प्रचारात सक्रिय
Video: ट्रिपल इंजिन सरकार विरोधात टोळीयुद्ध सुरू - हर्षवर्धन सपकाळ
Video: ट्रिपल इंजिन सरकार विरोधात टोळीयुद्ध सुरू - हर्षवर्धन सपकाळ