AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

टीव्ही 9 मराठीचा स्पेशल रिपोर्ट | इर्शाळवाडीची भयंकर दुर्घटना… राज ठाकरे आधीच बोललेले, पाहा Video

इर्शाळवाडीवर दरड दुर्घटनेत मृतांचा आकडा 22 वर पोहोचलाय तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी इथल्या स्थानिकांना मोठा दिलासा देणारी घोषणा केलीय. दुसरीकडे मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी 11 जूनचं एक वक्तव्य व्हायरल होतेय. 11 जूनच्या भाषणात राज ठाकरेंनी दरडी कोसळू शकतात, असा इशारा प्रशासनाला दिला होता.

टीव्ही 9 मराठीचा स्पेशल रिपोर्ट | इर्शाळवाडीची भयंकर दुर्घटना... राज ठाकरे आधीच बोललेले, पाहा Video
| Updated on: Jul 21, 2023 | 11:01 PM
Share

मुंबई : इर्शाळवाडीत दुसऱ्या दिवशीही मदतकार्य सुरुच होता. आतापर्यंत 22 जणांचे मृतदेह सापडले असून119 जणांना वाचवण्यात यश आलंय. तर दुसरीकडे अमित ठाकरेंनी सरकारवर हल्लाबोल केलाय. सरकार, आमदार फोडण्यात व्यस्त होतं, असं अमित ठाकरे म्हणालेत. तर राज ठाकरेंनी 11जूनलाच दरडीसंदर्भात संभाव्य धोका व्यक्त केला होता. ती क्लीपही आता व्हायरल होतेय.

इर्शाळवाडीवर दरड दुर्घटनेत मृतांचा आकडा 22 वर पोहोचलाय तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी इथल्या स्थानिकांना मोठा दिलासा देणारी घोषणा केलीय. इर्शाळवाडीतील नागरिकांसाठी सिडकोद्वारे कायमस्वरुपी घरं बांधून दिली जाणार आहेत. या दुर्घटनेवरुन अमित ठाकरेंनी सरकारवर निशाणा साधलाय. आमदार फोडण्यात व्यस्त नसते तर दुर्घटना टाळता आली असती, असं अमित ठाकरे म्हणाले. तर अमित ठाकरेंची सध्या ट्रेनिंग सुरु असून त्यांना संधी दिली पाहिजे, असा टोला नितेश राणेंनी लगावला. दुसरीकडे मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी 11 जूनचं एक वक्तव्य व्हायरल होतेय. 11 जूनच्या भाषणात राज ठाकरेंनी दरडी कोसळू शकतात, असा इशारा प्रशासनाला दिला होता.

इर्शाळवाडीतल्या दरड दुर्घटनेत अनेकांचे जीव गेले. पण जे जीव वाचवून सुरक्षित स्थळी पोहोचले होते…ते परत आपल्या घरांच्या शोधात आलेत. बुधवारी रात्री 11 वाजता, दरड कशी काळ बनून कोसळली, याचे हे प्रत्यक्षदर्शीही आहेत. हे आहेत बुधाजी पारधी. मृत्यूच्या दरडीतून बुधाजी पारधी आणि त्यांच्या घरातले तर सर्व जण वाचले. पण त्यांच्या मेहुणे आणि भाच्याकडचे 8 जण बेपत्ता आहेत.

पाहा व्हिडीओ:-

इर्शाळवाडीतल्या शाळेत आश्रयाला आलेले हे आजोबा आहेत, रामा पारधी दरड कोसळली त्यावेळी त्यांच्या घरी 8 जण होते. त्याचं घर पूर्णपणे उद्ववस्त झालं. दरडीमुळं त्या ढिगाऱ्याखाली कुटुंबातले 4 जण आले होते.पण त्यांना तात्काळ कुटुंबीयांनीच ढिगाऱ्याखालून काढलं. त्यामुळं कुटुंबातले सर्व सुखरुप आहेत. इर्शाळवाडीत अशा अनेक घटना कानावर पडतायत.

कोणाचं कुटुंबच्या कुटुंब ढिगाऱ्याखाली गेलं..तर नातेवाईक, आपल्यांच्या शोधात आहेत. मंगळा लचका यांच्या दीराच्या कुटुंबीयातील 7 जण अजूनही ढिगाऱ्याखाली आहेत. इर्शाळवाडीत जाण्यासाठी फक्त पायी, हाच एक मार्ग आहे…त्यामुळं ज्यांची वाहनं होती, ते गावापासून दीड तासांवर असलेल्या नंबराची वाडी इथं गाड्या लावायचे.

या 3 गाड्या भगवान तिरकड, दिनेश तिरकड आणि कृष्णा तिरकड या 3 भावंडांच्या आहेत. तिन्ही भाऊ होमगार्ड असल्यानं, इर्वाळवाडीतून ते नंबराची वाडी इथं याचचे आणि इथूनच गाड्या घेऊन ड्युटीवर जायचे. पण इर्शाळवाडीतल्या दरड दुर्घटनेच्या संकटात हे तिघेही भाऊ अडकले आणि अजून त्यांचा शोध सुरु आहे. या ढिगाऱ्याखाली एक एक जीव शोधण्यासाठी NDRF आणि इतर कामगारांचे शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत. मात्र या शोधकार्यातही पाऊस अडथळा ठरतोय.

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.