Tv9 मराठी स्पेशलल रिपोर्ट : पुणे अपघात प्रकरणात बिल्डरचा मुलगा नाहीतर अडकणार होता ड्रायव्हर, पाहा Video

पुणे अपघातामध्ये अल्पवयीन आरोपीऐवजी ड्रायव्हरलाच अडकवण्याचा डाव होता. अपघातानंतर आरोपीच्या वडिलानं ड्रायव्हरला स्वत:वर आरोप घेण्यास सांगितलं होतं, अशी धक्कादायक माहिती समोर आलीय.

Tv9 मराठी स्पेशलल रिपोर्ट : पुणे अपघात प्रकरणात बिल्डरचा मुलगा नाहीतर अडकणार होता ड्रायव्हर, पाहा Video
Follow us
| Updated on: May 24, 2024 | 10:34 PM

पुण्याच्या अपघात प्रकरणात, रोज नवनवी धक्कादायक माहिती समोर येतेय. रविवारी पहाटे अडीच वाजता, दारु पिवून 200च्या स्पीडनं वेदांत अग्रवालनं दोघांना उडवलं. अनिस अवधिया आणि अश्विनी कोस्टा जागीच ठार झाले. मात्र एवढी मोठी घटना घडवूनही, येरवडा पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांनी माहिती वरिष्ठांना माहिती दिलीच नाही.

अपघाताची माहिती येरवडा पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांनी कंट्रोल रुमला दिलीच नाही. अल्पवयीन आरोपी वेदांत अग्रवालला वेळेत मेडिकलसाठी नेलं नाही, जवळपास 11 तासांनी ब्लड सॅम्पल घेण्यात आल्याची माहिती तपासात समोर आली. अल्पवयीन आरोपीच्या वडिलांवर येरवडा पोलीस ठाण्यात पुरावा नष्ट करण्याचं कलम 201, आणि फसवणुकीचं कलम 420 लावण्यात आलं.

पाहा व्हिडीओ:-

तसंच येरवडा पोलीस स्टेशनमध्ये वेदांतला पिझ्झा आणि बर्गर दिल्याचा आरोपात तथ्य नाही पण अधिकाऱ्यांनी निष्काळजीपणा केला आणि ते दोषी आढळतात हे खुद्द पोलीस आयुक्त अमितेश कुमारांनी सांगितलं.वेदांत आधी कोझी पब मध्ये 10-12मित्रांसोबत दारु प्यायला. त्यानंतर तो ब्लॅक पबमध्ये आला. इथं पुन्हा दारुचे पेग घेतले..आणि अडीच कोटींच्या पोर्शे कारनं 200च्या स्पीडनं भेदरकारपणे अनिस अवधिया आणि अश्विनी कोस्टाला चिरडलं. मात्र त्यानंतर, वेदातंच्या वडिलांनी पुन्हा मुलाला वाचवण्याचा प्रयत्न केला.

सूत्रांच्या माहितीनुसार पब मधून वेदांत बाहेर पडल्यानंतर ड्रायव्हरने त्याचे वडील विशाल अग्रवालला फोन केला. ड्रायव्हरनं सांगितलं की, वेदांत जास्त दारु प्यायला असून कार चालवण्याठी मागतोय, त्यावर विशाल अग्रवालांनी कार चालवू दे असं सांगितलं त्यानुसार ड्रायव्हरने, लूट दारु प्यायलेल्या वेदांतला भरधाव वेगानं धावणाऱ्या पोर्शे कारचं स्टेअरिंग सोपवलं आणि काही मिनिटांमध्ये कल्याणी नगर परिसरात येताच बाईकला जोरदार धडक दिली, त्यात दोघांचा मृत्यू झाला. अपघात झाल्यानंतर पुन्हा ड्रायव्हरनं विशाल अग्रवालांना फोन केला आणि अपघाताची माहिती दिली. त्यावर विशाल अग्रवालांनी गाडी तू चालवत होता असं सांग बक्षिस देतो असं विशाल अग्रवालने ड्रायव्हरला सांगितलं.

कलम 304वरुन जे राजकीय वातावरण तापलंय, त्यावरुनही अमितेश कुमारांनी स्पष्टीकरण दिलंय..पहिल्या FIRमध्ये सकाळी 8 च्या सुमारास कलम 304 अ हे लावण्यात आलं पण 3 तासांनी कलम 304 लावण्यात आलं, असं पोलीस आयुक्त सांगतायत. दुसऱ्या FIRमध्ये नाही तर पहिल्याच FIRमध्ये असल्याचंही अमितेश कुमारांचं म्हणणंय. विशेष म्हणजे कलम 304 हे अजूनही दुसऱ्याच FIRमध्ये दिसतेय. पहिल्या FIRमध्ये कलम 304 अ हेच आहे.

पुण्यात अपघाताच्या घटनेपासून, काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर आक्रमक आहेत. आता पुन्हा त्यांनी पुण्याच्या पोलीस आयुक्त कार्यालयाबाहेर ठिय्या आंदोलन केलं अपघात प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवावं आणि तपास अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करुन चौकशी करा अशी मागणी धंगेकरांनी केली. तर दुसरीकडे पुण्यातले बार मालक, चालक आणि कर्मचाऱ्यांनीही आंदोलन केलं. पुण्यात प्रशासनानं पब आणि बारवर कारवाया सुरु केल्यात. बार कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ आल्याचं सांगत कारवाई विरोधात बार मालक आणि कर्मचारी रस्त्यावर उतरले. तर भाजपच्या नितेश राणेंनी पुन्हा बिल्डर विशाल अग्रवालवरुन, शरद पवारांकडे मोर्चा वळवला. धंगेकरांनी पवारांच्या सिल्व्हर ओक बाहेर आंदोलन करणार तिथं खरे सूत्रधार आहेत, असा सनसनाटी आरोप नितेश राणेंनी केला. याआधीही पवार आणि अग्रवाल कुटुंबीयांचे काय संबंध आहेत, अग्रवालांनी दिलेला वकील पवारांचा निकटवर्तीय आहे, त्यामुळं वाचवण्याचा प्रयत्न होतोय का?, असा आरोप नितेश राणेंनी शरद पवारांवर केला. त्यावर पवारांनी उत्तर दिलंय.

पुण्याच्या अपघात प्रकरणात आरोपी फक्त अल्पवयीन वेदांत अग्रवाल किंवा त्याचे वडील विशाल अग्रवालच नाही. तर अपघातानंतर येरवडा पोलीस स्टेशनमध्ये जे घडलं. ज्या प्रकरणाची ब्लड सॅम्पल घेण्यातही दिरंगाई झाली. त्यावरुन पोलीस अधिकारी जबाबदार आहेत, हे आयुक्तांनीच मान्य केलंय. अर्थात त्यांच्यावर काय कारवाई होते, हे दिसेलच.

Non Stop LIVE Update
नवा पक्ष स्थापन करणार, निवडणूकही लढवणार, संजय पांडे यांचा कुणाशी सामना
नवा पक्ष स्थापन करणार, निवडणूकही लढवणार, संजय पांडे यांचा कुणाशी सामना.
इतक्या हिऱ्यांनी साकरले बाळासाहेब, ठाकरेंना वाढदिवसानिमित्त अनोखी भेट
इतक्या हिऱ्यांनी साकरले बाळासाहेब, ठाकरेंना वाढदिवसानिमित्त अनोखी भेट.
... तर तुम्हाला तोंड दाखवता येणार नाही, मनोज जरांगेंचा शेलारांना इशारा
... तर तुम्हाला तोंड दाखवता येणार नाही, मनोज जरांगेंचा शेलारांना इशारा.
एक माणूस आला नाही..., मुरलीधर मोहोळ यांच्यासमोर युवकानं फोडला टाहो
एक माणूस आला नाही..., मुरलीधर मोहोळ यांच्यासमोर युवकानं फोडला टाहो.
उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंचे पाय धुवायला हवे, कुणी लगावला खोचक टोला?
उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंचे पाय धुवायला हवे, कुणी लगावला खोचक टोला?.
विठुरायाची थकवा जाण्यासाठी गरम पाण्यानं स्नान अन् आयुर्वेदिक काढा
विठुरायाची थकवा जाण्यासाठी गरम पाण्यानं स्नान अन् आयुर्वेदिक काढा.
भाजपने बेवकूफ बनवल यार... घरवापसी होताच माजी आमदाराची मातोश्रीतून टीका
भाजपने बेवकूफ बनवल यार... घरवापसी होताच माजी आमदाराची मातोश्रीतून टीका.
'ते परदेशात होते...',राज ठाकरेंच्या स्वबळाच्या घोषणेवरून राऊतांची टीका
'ते परदेशात होते...',राज ठाकरेंच्या स्वबळाच्या घोषणेवरून राऊतांची टीका.
पावसाचा रेल्वे वाहतुकीला फटका, ट्रॅकवर मातीचा गाळ अन् मालगाडी थांबली
पावसाचा रेल्वे वाहतुकीला फटका, ट्रॅकवर मातीचा गाळ अन् मालगाडी थांबली.
पावसाचा जोर कमी, पूरही ओसरला, पुणे जिल्ह्यातील बंद असलेले मार्ग कोणते?
पावसाचा जोर कमी, पूरही ओसरला, पुणे जिल्ह्यातील बंद असलेले मार्ग कोणते?.