AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

टीव्ही9 मराठीचा स्पेशल रिपोर्ट : 2024 ची लढाई फिक्स, NDA vs INDIA, पाहा Video

TV9 Marathi Special Report : विरोधकांनी आपल्या एकजुटीला INDIA असं नाव दिलंय. इंडियन नॅशनल डेव्हलपमेंट इन्क्लुसिव्ह अलायन्स. त्यामुळं भाजप प्रणित NDAची लढाई आता विरोधकांच्या INDIA शी होणार आहे.

टीव्ही9 मराठीचा स्पेशल रिपोर्ट : 2024 ची लढाई फिक्स, NDA vs INDIA, पाहा Video
| Updated on: Jul 18, 2023 | 11:29 PM
Share

मुंबई : 2024ला काँग्रेसच्या किंवा UPAच्या बॅनरखाली लढण्याऐवजी विरोधकांनी एकजुटीसाठी खास मार्ग काढलाय. विरोधकांनी आपल्या एकजुटीला इंडिया असं नाव दिलंय. त्यामुळं मोदींविरोधातली लोकसभेसाठी लढाई NDA विरुद्ध INDIA अशी असेल. पंतप्रधान नरेंद्र मोदींना आणि सत्ताधारी NDAला रोखण्यासाठी 26 विरोधकांनी INDIA चा पर्याय शोधलाय…होय, INDIA.

विरोधक काँग्रेस प्रणित संयुक्त पुरोगामी आघाडी अर्थात UPAच्या छत्राखाली लढणार नाही. तर विरोधकांनी आपल्या एकजुटीला INDIA असं नाव दिलंय. इंडियन नॅशनल डेव्हलपमेंट इन्क्लुसिव्ह अलायन्स. त्यामुळं भाजप प्रणित NDAची लढाई आता विरोधकांच्या INDIA शी होणार आहे.

विशेष म्हणजे एकाच दिवशी सत्ताधारी आणि विरोधक आपआपली रणनीती ठरवण्यासाठी एकवटले. पाटण्यानंतर बंगळुरुमध्ये विरोधक एकवटले आणि पुन्हा एकदा एकजुटीनं लढण्यावर शिक्कामोर्तब झालं. तर इकडे दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उपस्थितीत NDA अर्थात राष्ट्रीय लोकशाही आघाडीची बैठक झाली.

NDAच्या बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी महाराष्ट्रात 48 पैकी 45 जागा जिंकू असा विश्वास व्यक्त केलाय. तर लोकसभा निवडणुकीत एकत्रच असू असं उपमुख्यमंत्री अजित पवारांनी म्हटलंय. महाराष्ट्राच्या दृष्टीकोनातून, या बैठकांकडे पाहायचं झालं तर, राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर अजित पवार एनडीएच्या बैठकीला हजर राहिले. तर शरद पवार विरोधकांच्या बैठकीसाठी बंगळुरुला आले. त्यामुळं अजित पवार गटाच्या आमदारांनी भेटीगाठी घेतल्यानंतर निर्माण झालेल्या उलटसुलट चर्चांना शरद पवारांनी पूर्णविराम दिलाय.

पाहा व्हिडीओ:-

पंतप्रधान मोदींना रोखायचं असेल तर, विरोधकांमध्ये होणारी मतविभागणी रोखणं आवश्यक आहे. हे विरोधकांना चांगलंच समजलंय. त्यामुळं पाटण्याच्या बैठकीत जी विरोधकांच्या पक्षांची संख्या 15 होती ती आता बंगळुरुत 26 वर आलीय. ज्यात काँग्रेस, शिवसेना (ठाकरे गट),राष्ट्रवादी (पवार गट), डीएमके, टीएमसी, जेडीयू, आरजेडी, समाजवादी पार्टी, सीपीआयएम, इंडियन युनियन मुस्लीम लिग, सीपीआय, सीपीआय ML, नॅशनल कॉन्फरन्स, पीडीपी, आम आदमी पार्टी, झारखंड मुक्ती मोर्चा, केरळ काँग्रेस , केरळ काँग्रेस M, आरएलडी, एमएमके, एमडीएमके, वीसीके, केएमडीके, आरएसपी, अपना दल कमेरावादी, एआयएफबी

NDAच्या बैठकीला देशभरातील जवळपास 38 पक्ष हजर राहिलेत ज्यात भाजप, शिवसेना (शिंदे गट), AIADMK, आरपीआय (आठवले गट), जनसुराज्य पार्टी, प्रहार, एलजेपी (पारस ), एलजेपी (रामविलास पासवान), अपना दल (सोनेलाल), एनपीपीस, एनडीपीपी, एसकेएम, आयएमकेएमके, एजेएसयू, एमएनएफ, एनपीएफ, जेजेपी, आयपीएफटी (त्रिपुरा), बीपीपी, पीएमके, एमजीपी, निषाद पार्टी, यूपीपीएल, एआयआरएनसी, शिरोमणी अकाली दल (संयुक्त), जनसेना, हिंदुस्तानी आवाम मोर्चा, रालोसपा, सुभासपा, बीडीजेएस (केरळ), केरळ काँग्रेस (थॉमस), गोरखा नॅशनल लिबरेशन फ्रंट, जनातीतथ्य राष्ट्रीय सभा, यूडीपी, एचएसडीपी.

विरोधकांच्या बैठकींचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे स्वत: सोनिया गांधी हजर राहिल्यात. पुन्हा एकदा सक्रीय झाल्याचं सोनिया गांधींनी आपल्या हजेरीतून दाखवून दिलंय..म्हणजेच NDA विरुद्धची INDIAची लढाई सोनिया गांधीही लढतील.

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.