AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Tv9 मराठी स्पेशल रिपोर्ट : अजितदादा उत्पन्नाचा हिशेब देणार का? पाहा Video

सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानियांनी त्यांच्या उत्पन्नाचे कागदपत्रं दाखवत आता अजित पवारांना त्यांच्या उतप्न्नाचा हिशेब देण्याचं आव्हान दिलंय. अजित पवारांसोबतच कोणत्या नेत्यांचं वर्षाला किती उत्प्न आहे., याचीही एक आकडेवारी दमानियांनी मांडली. हा सारा वाद का आणि कुठून सुरु झाला. पाहूयात.

Tv9 मराठी स्पेशल रिपोर्ट : अजितदादा उत्पन्नाचा हिशेब देणार का? पाहा Video
| Updated on: Aug 18, 2024 | 12:10 AM
Share

अंजली दमानिया आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीत ट्विटरवरचा आव्हान-प्रतिआव्हानांचा सामना आता पत्रकार परिषदांपर्यंत आलाय. राष्ट्रवादीच्या सूरज चव्हाणांनी केलेल्या आरोपांनंतर दमानियांनी थेट अजित पवार-सुनेत्रा पवारांच्या वार्षिक उत्पन्नाची आकडेवारी दिली.

आपण कुणाच्या तरी रिचार्जवर बोलतो या आरोपांवर दमानियांनी पत्रकार परिषद घेवून त्यांची संपत्ती, प्रवासखर्चासह साऱ्यांचा तपशील दिला. त्यामुळे आता आव्हानाप्रमाणे अजित पवार गटाचे सूरज चव्हाण कधी उत्तर देणार याची प्रतीक्षा आहे.  याबद्दल आम्ही संध्याकाळी 7 पर्यंत सूरज चव्हाणांशी संपर्क साधला असता आपण प्रवासात असून लवरकरच यावर पत्रकार परिषद घेणार असल्याचं चव्हाण यांनी सांगितलंय.

या वादाची सुरुवात अजित पवारांवरच्या आरोपांवरुन झाली होती. त्यात चव्हाणांनी दमानियांसाठी रिचार्ज शब्द वापरल्यानं हा वाद चिघळला. त्यानंतर काल-परवा पुन्हा ट्विटरवर दोघांमध्ये वॉर रंगलं. दमानियांनी म्हटलं की., अजित पवारांचे राम आणि श्याम ( मिटकरी/ चव्हाण ) मी मुंबईत परत आले आहे. तुमच्या मालकांना (अजित पवारांना ) निरोप द्या, उद्या माझा पासपोर्ट आणि उत्पन्नाचा स्रोत व इनकम टैक्स रिटर्न्स घेऊन येते, कुठे व कधी दाखवू ते कळवा. येताना आपल्या दहावी पास अर्थमंत्र्यांनी त्यांचे उत्पन्न कुठून येते त्याचाही तपशील आणायला सांगा. वेळ कळवली नाहीत तर दुपारी 4 वाजता मी माझ्या राहत्या घरून प्रेस काँफ्रेंस घेईन.

पाहा व्हिडीओ:-

यावर राष्ट्रवादीच्या चव्हाण यांनी उत्तर दिलं होतं की, स्वयंघोषित समाजसेविका रिचार्जवर चालणाऱ्या ताई “कष्टाच्या” पैश्याने परदेशातून फिरून भारतात आल्याबद्दल आपले स्वागत आहे. नुसता पासपोर्ट घेऊन येऊ नका पाच वर्षात कष्टाच्या पैश्याने किती परदेश दौरे केले ते जनतेला दाखवा. तुमच्या पत्रकार परिषेदेनंतर तुमचे “कारनामे” महाराष्ट्राच्या जनतेसमोर मांडणार. आता दमानियांनी तर त्यांचा संपत्तीचा तपशील, त्याचा स्त्रोत. त्यावर भरलेला कराचा तपशील मांडलाय. आता सूरज चव्हाण अजित पवारांच्या संपत्तीचा तपशील कधी मांडतात, याची प्रतीक्षा आहे.

डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.