AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बाळासाहेब थोरातांसह काँग्रेसच्या 5 बड्या नेत्यांवर ट्विटरची कारवाई, अकाऊंट ‘लॉक’, काँग्रेस नेते म्हणतात, ‘आम्ही लढत राहू!’

गेल्याच आठवड्यात काँग्रेसचे वरिष्ठ नेते राहुल गांधी यांच्या ट्विटर अकाऊंटवर ट्विटर कंपनीने कारवाई केली होती. या प्रकरणावर आणखी पडदा नाही तोपर्यंतच बाळासाहेब थोरात यांच्यासह काँग्रेसच्या 5 बड्या नेत्यांच्याविरोधात ट्विटरने कारवाई केली आहे.

बाळासाहेब थोरातांसह काँग्रेसच्या 5 बड्या नेत्यांवर ट्विटरची कारवाई, अकाऊंट 'लॉक', काँग्रेस नेते म्हणतात, 'आम्ही लढत राहू!'
बाळासाहेब थोरात, महसूलमंत्री
| Edited By: | Updated on: Aug 12, 2021 | 12:44 PM
Share

नवी दिल्ली : गेल्याच आठवड्यात काँग्रेसचे वरिष्ठ नेते राहुल गांधी (Rahul Gandhi Twitter) यांच्या ट्विटर अकाऊंटवर ट्विटर कंपनीने कारवाई केली होती. या प्रकरणावर आणखी पडदा नाही तोपर्यंतच बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांच्यासह काँग्रेसच्या 5 बड्या नेत्यांच्याविरोधात ट्विटरने कारवाई केली आहे.  काँग्रेस पक्षाच्या ट्विटर अकाऊंटसह बड्या काँग्रेस नेत्यांचे ट्विटर अकाऊंट लॉक करण्यात आलेले आहेत.

काँग्रेसच्या कोणत्या नेत्यांवर ट्विटरची कारवाई?

दिल्लीतील बलात्कार पीडित कुटुंबीयांची काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी भेट घेतली होती. त्या भेटीचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते. त्यानंतर त्यांच्यावर ट्विटरने कारवाई केली होती. राष्ट्रीय बालहक्क आयोगाच्या नोटीसीनंतर ट्विटरने ही कारवाई केली होती. त्यानंतर आता बाळासाहेब थोरात, अजय माकन, माणिकम टागोर, जितेंद्र सिंह, सुष्मिता देव यांचं ट्विटर अकाऊंट लॉक करण्यात आलं आहे.

बाळासाहेब थोरात यांच्या ट्विटर अकाऊंटवर कारवाई, थोरात म्हणाले, ‘हम लढेंगे!’

महाराष्ट्राचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी राहुल गांधींच्या भूमिकेला पाठिंबा दर्शवत ‘मैं भी राहुल’, असं ट्विट केलं होतं. राहुल यांनी नियमांचं भंग करणारा फोटो शेअर केला होता, त्याच फोटोला पाठिंबा किंवा भूमिकाला पाठिंबा दर्शवणारं ट्विट बाळासाहेब थोरात यांनी केल्याने त्यांचंही ट्विटर अकाऊंट लॉक करण्यात आलं आहे.

नागरिकांच्या विचारांची गळचेपी करण्याचं काम केंद्र सरकार करत आहे. ट्विटर ही आंतररष्ट्रीय कंपनी असूनही भाजपच्या दाबवाखाली काम करत आहे. आम्ही याचा निषेध करतो. आम्ही आमचा लढा सुरुच ठेऊ, हम लढेंगे, असा आक्रमक पवित्रा बाळासाहेब थोरात यांनी घेतला आहे.

ट्विटर हे एक समाज माध्यम आहे. त्यावर आपलं मत मांडण्याचा पूर्ण अधिकार नागरिकांना आहे. लोकशाहीमध्ये सगळ्यांनाच आपापल्या पद्धतीने मत मांडण्याचा अधिकार हा सर्वांना आहे. समाजाच्या हिताच्या ज्या गोष्टी असतात त्या मांडण्याचा अधिकार राज्य घटनेमध्ये आहे. त्याच गोष्टी मांडण्याचा प्रयत्न आम्ही ट्विटरच्या माध्यमातून करत होतो. मात्र ट्विटरने काँग्रेस नेत्यांच्या ट्विटरवर कारवाई करण्याची भूमिका घेतली. भाजपाच्या दबाव खाली काम करणे योग्य नाही. त्यामुळे एकंदरच कशा पद्धतीने लोकशाहीमध्ये मुस्कटदाबी चाललेली आहे, याचं उदाहरण आपल्याला पाहायला मिळत आहे, अशी संतप्त प्रतिक्रिया थोरात यांनी दिली.

(Twitter action against 5 big Congress leaders including mahatashtra Minister Balasaheb Thorat account locked)

हे ही वाचा :

काँग्रेस नेते राहुल गांधींचं ट्विटर अकाऊंट तात्त्पुरतं सस्पेंड होण्यामागे नेमकं कारण काय?

राहुल गांधी यांचं ‘ते’ ट्विट ट्विटरने हटवले; वकिलाच्या तक्रारीनंतर कारवाई

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.