काँग्रेस नेते राहुल गांधींचं ट्विटर अकाऊंट तात्त्पुरतं सस्पेंड होण्यामागे नेमकं कारण काय?

एका वकिलाने पीडितेच्या कुटुंबाची ओळख जगजाहीर होत असल्यानं या फोटोला आक्षेप घेत दिल्ली पोलिसांकडे तक्रार केली होती. त्यानंतर ट्विटरनं राहुल गांधी यांचं ते ट्वीट हटवलं होतं. मात्र, आता त्यांचं ट्विटर अकाऊंट तात्त्पुरतं सस्पेंड करण्यात आलं.

काँग्रेस नेते राहुल गांधींचं ट्विटर अकाऊंट तात्त्पुरतं सस्पेंड होण्यामागे नेमकं कारण काय?
Rahul Gandhi
Follow us
| Updated on: Aug 07, 2021 | 8:30 PM

नवी दिल्ली : काँग्रेस नेते राहुल गांधी यांचं ट्विटर अकाऊंट तात्त्पुरतं सस्पेंड करण्यात आलं आहे. राहुल गांधी यांनी दिल्लीतील बलात्कार पीडितेच्या कुटुंबियांची भेट घेतली होती. त्यानंतर त्यांनी पीडितेच्या आई-वडिलांचा फोटो ट्वीट केला होता. त्याला भाजपकडूनही आक्षेप घेण्यात आला होता. तर एका वकिलाने पीडितेच्या कुटुंबाची ओळख जगजाहीर होत असल्यानं या फोटोला आक्षेप घेत दिल्ली पोलिसांकडे तक्रार केली होती. त्यानंतर ट्विटरनं राहुल गांधी यांचं ते ट्वीट हटवलं होतं. मात्र, आता त्यांचं ट्विटर अकाऊंट तात्त्पुरतं सस्पेंड करण्यात आलं. (Congress leader Rahul Gandhi’s Twitter account has been temporarily suspended)

दरम्यान, ट्विटर उकाऊंट सस्पेंड केल्यानंतर राहुल गांधी इन्स्टाग्रामवर अॅक्टिव्ह झाल्याचं पाहायला मिळालं. दरम्यान, ट्विटर उकाऊंट तात्त्पुरतं सस्पेंड केल्यानंतर ट्विटरने राहुल गांधींना त्यांचं मत ठेवण्यास सांगितलं होतं. त्यानंतर काँग्रेसकडून ट्विटरला उत्तर पाठवण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे.

वकिलाचा आक्षेप

नांगल येथे एका मुलीवर बलात्कार झाला होता. या कुटुंबीयांची भेट घेतल्यानंतर राहुल गांधी यांनी त्यांचा फोटो ट्विट केला होता. विनीत जिंदल या वकिलाने त्याला आक्षेप घेत दिल्ली पोलिसांकडे तक्रार केली होती. राहुल गांधी यांनी त्यांच्या ट्विटर हँडलवरून मुलीच्या आईवडिलांचा फोटो शेअर केला आहे. त्यामुळे पीडितेच्या कुटुंबीयांची ओळख पटली आहे. त्यामुळे या प्रकरणी गुन्हे दाखल करून कठोर कारवाई करण्यात यावी, असं जिंदल यांनी तक्रारीत म्हटलं आहे.

कठोर कारवाई करा

राहुल यांनी केलेलं कृत्य हे पोक्सो कायद्यांतर्गत येतं. तसेच भादंविच्या कलम 228अच्या कलम 23 अंतर्गत हा गुन्हा आहे, असंही या तक्रारीत म्हटलं आहे. या प्रकरमी राष्ट्रीय बाल अधिकार संरक्षण आयोगाने ट्विटर इंडियाला नोटीस देऊन हे ट्विट हटवण्यास सांगितलं होतं. तसेच या प्रकरणी पोक्सो कायद्यांतर्गत कारवाई करण्यासही सांगितलं होतं.

संबंधित बातम्या :

राहुल गांधी यांचं ‘ते’ ट्विट ट्विटरने हटवले; वकिलाच्या तक्रारीनंतर कारवाई

राहुल गांधीसह विरोधी पक्षनेते थेट ‘किसान संसद’ला, कृषी कायद्यांविरोधात एकजूट

Congress leader Rahul Gandhi’s Twitter account has been temporarily suspended

Non Stop LIVE Update
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.