पीएमसी बँक घोटाळ्याप्रकरणी बडे मासे सापडले, वाधवान बिल्डर्सला अटक, 3500 कोटींची संपत्ती जप्त

पीएमसी बँक घोटाळ्याप्रकरणी (PMC Bank Scam) आज (गुरुवारी) पहिली अटक करण्यात आली. मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हेशाखेने (EOW Mumbai Police) पीएमसी बँकेचं कर्ज बुडवणाऱ्या सारंग वाधवान (Sarang Wadhwan) आणि राकेश वाधवान (Rakesh Wadhwan) यांना अटक केली आहे.

पीएमसी बँक घोटाळ्याप्रकरणी बडे मासे सापडले, वाधवान बिल्डर्सला अटक, 3500 कोटींची संपत्ती जप्त
Follow us
| Updated on: Oct 03, 2019 | 6:16 PM

मुंबई : पीएमसी बँक घोटाळ्याप्रकरणी (PMC Bank Scam) आज (गुरुवारी) पहिली अटक करण्यात आली. मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हेशाखेने (EOW Mumbai Police) पीएमसी बँकेचं कर्ज बुडवणाऱ्या सारंग वाधवान (Sarang Wadhwan) आणि राकेश वाधवान (Rakesh Wadhwan) यांना अटक केली आहे. हे दोघे एचडीआयएल (HDIL) कंपनीचे संचालक आहेत. पीएमसी बँकेचं कर्ज घेऊन बुडवणाऱ्या एकूण 44 मोठ्या खात्यांपैकी 10 खाती ही एचडीआयएल (HDIL) आणि वाधवा यांच्याशी संबंधित आहेत. त्यामुळे ही कारवाई महत्त्वाची मानली जात आहे.

संबंधित 10 खात्यांपैकी एक खाते सारंग वाधवा यांचे तर दुसरे राकेश वाधवा यांचे खासगी खाते आहे. पोलिसांनी आज दोघांनाही चौकशीसाठी बोलावले होते. मात्र, तपासात सहकार्य करत नसल्याने पोलिसांनी दोघांनाही अटक केली. अटक करण्यात आलेल्या दोन्ही आरोपींची जवळपास 3 हजार 500 कोटी रुपयांच्या संपत्तीवरही जप्तीची कारवाई करण्यात आली आहे.

“पीएमसी बँक घोटाळ्यात आरबीआयच्या अधिकाऱ्यांचाही समावेश”

मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हेशाखेने केलेल्या या कारवाईचं किरीट सोमय्या यांनी स्वागत केलं आहे. पीएमसी बँक घोटाळ्यात आरबीआयच्या अधिकाऱ्यांचाही समावेश असल्याचा आरोप सोमय्या यांनी केला आहे.

सोमय्या म्हणाले, “याप्रकरणी आता फसवणूक आणि 420 असे कलम लावले जातील. जॉय थॉमस आणि वार्याम सिंग यांनाही अटक होऊ शकते. मी ईडीला या प्रकरणाची माहिती दिली आहे. पुढची चौकशी ईडी करेल असा मला विश्वास आहे.”

दरम्यान, रिझर्व्ह बँकेने (RBI) मुंबईतील पंजाब आणि महाराष्ट्र बँकेवर (PMC Bank) 6 महिन्यांसाठी आर्थिक निर्बंध लादले आहेत. बँकेने (PMC Bank) तसे एसएमएस ग्राहकांना पाठवले आहेत. या मेसेजेसनंतर पीएमसी बँकेबाहेर ग्राहकांच्या पैसे काढण्यासाठी रांगा लागल्या आहेत. सुरुवातीला आरबीआयने ग्राहकांना महिन्यातून केवळ 1 हजार रुपये काढण्याचे निर्बंध लादले होते. मात्र, ग्राहकांचा असंतोष पाहता ही मर्यादा वाढवून 6 महिन्यात 10 हजारांवर नेली. हे 10 हजार एकावेळी काढू शकता किंवा टप्प्याटप्प्यानी काढू शकता. पण 6 महिन्यातून केवळ 10 हजार रुपयेच काढता येतील. मात्र, तरिही दैनंदिन खर्च, आजार, शिक्षण आणि इतर गोष्टींवरील खर्चासाठी ही रक्कम तोकडी असल्याची ग्राहकांची तक्रार आहे.

मॅनेजिंग डायरेक्टर निलंबित

दरम्यान, पंजाब आणि महाराष्ट्र को आप बँकेचे मॅनेजिंग डायरेकटर जॉय थॉमस यांना बँकेने निलंबित केलं आहे.  रिझर्व्ह बँकेमार्फत नियुक्त प्रशासकांनी थॉमस यांना निलंबित केलं.

खातेदारांवर निर्बंध काय?

  • एका खातेधारकाला एका खात्यातून केवळ 1 हजार रुपयेच काढता येत होते, ते आता 10 हजार रुपये करण्यात आले आहेत.
  • तुमच्या खात्यात कितीही रक्कम असली तरी 6 महिन्यातून केवळ 10 हजार रुपयेच काढता येतील.
  • जर तुम्ही पीएमसी बँकेचं कर्ज घेतलं असेल, तर तुमच्या हप्त्याची रक्कम खात्यात वळती होईल
  • कर्ज फेडण्यासाठी कर्जदार त्यांच्या ठेवींचा वापर करू शकतात.

बँकेवर कोणकोणते निर्बंध?

  • रिझर्व्ह बँकेच्या मान्यतेशिवाय कोणतेही नवे कर्ज देता येणार नाही
  • जुन्या कर्जांचे नूतनीकरण करता येणार नाही
  • बँकेला कोणतीही गुंतवणूक करता येणार नाही
  • नव्या ठेवी स्वीकारता येणार नाहीत
  • बँकेची देणी फेडण्यासाठी देयक अदा करता येणार नाही
  • कर्मचाऱ्यांचे पगार, जागेचे भाडे, कर, विज बिल, प्रिंटिंग, स्टेशनरी, कायदेशीर खर्च यासाठी खर्च करता येईल
  • वकिलांना प्रत्येक खटल्यामध्ये पाच हजारापेक्षा अधिक रक्कम देता येणार नाही

संबंधित बातम्या 

पीएमसी बँकेवर आरबीआयचे निर्बंध, खातेदारांना महिन्याला 1 हजार रुपयेच काढता येणार  

पीएमसी बँकेवर आर्थिक निर्बंध, वयोवृद्ध दाम्पत्य औषधालाही महाग 

या 9 बँका बंद होणार असल्याचा मेसेज खोटा, आरबीआयचं स्पष्टीकरण 

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.