‘लय भारी’ व्हिडीओ : अमेरिकन दूतावासातील कर्मचाऱ्यांची मराठीतून डायलॉगबाजी

Namrata Patil

|

Updated on: Jul 05, 2019 | 3:56 PM

मुंबई : मंगल देशा, पवित्र देशा, महाराष्ट्र देशा… असे वर्णन जगभरात महाराष्ट्राचे केले जाते. आज 1 मे म्हणजेच महाराष्ट्र दिन. या निमित्ताने मुंबईतील अमेरिकन दूतावासाने मराठी चित्रपटातील डायलॉगबाजी करत अनोख्या पद्धतीने महाराष्ट्र दिनाच्या सर्वांना शुभेच्छा दिल्या आहेत. या शुभेच्छा देताना अमेरिकन दूतावासात काम करणाऱ्या अधिकाऱ्यांनी एक व्हिडीओ तयार केला आहे. हा व्हिडीओ भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक दादासाहेब फाळके […]

'लय भारी' व्हिडीओ : अमेरिकन दूतावासातील कर्मचाऱ्यांची मराठीतून डायलॉगबाजी

Follow us on

मुंबई : मंगल देशा, पवित्र देशा, महाराष्ट्र देशा… असे वर्णन जगभरात महाराष्ट्राचे केले जाते. आज 1 मे म्हणजेच महाराष्ट्र दिन. या निमित्ताने मुंबईतील अमेरिकन दूतावासाने मराठी चित्रपटातील डायलॉगबाजी करत अनोख्या पद्धतीने महाराष्ट्र दिनाच्या सर्वांना शुभेच्छा दिल्या आहेत. या शुभेच्छा देताना अमेरिकन दूतावासात काम करणाऱ्या अधिकाऱ्यांनी एक व्हिडीओ तयार केला आहे. हा व्हिडीओ भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक दादासाहेब फाळके यांच्या जयंतीदिवशी म्हणजेच काल अपलोड केला आहे.

मुंबईती0ल अमेरिकन दूतावासात काम करणाऱ्या अधिकाऱ्यांनी एक व्हिडीओ तयार केला आहे. या व्हिडीओत दूतावासात काम करणारे जेन, निक, लीन आणि रॉब या चौघांनी यात गाजलेल्या मराठी चित्रपटाचे डायलॉग म्हटले आहेत.

त्यात जेन या तरुणीने ‘’चहात बुडवून ठेवल्यावर बिस्कीट जसं तुटतं ना, तसं तुटलंय माझं हृदय’’ हा अभिनेत्री सई ताम्हणकरच्या तु ही रे चित्रपटातील डायलॉग म्हटला आहे. तर निक या तरुणाने अभिनेता रितेश देशमुखाचा लय भारी चित्रपटातील गाजलेला ”आपला हात भारी, लाथ भारी, सगळंच लय भारी”! हा डायलॉग म्हटला आहे.

यानंतर मराठीसह इतर भाषिकांनी डोक्यावर घेतलेला चित्रपट सैराट चित्रपटातील ”ए मंग्या, सोड त्याला, तुला मराठी सांगितलेलं कळत नाय का? का इंग्लिशमध्ये सांगू”? हा डायलॉग लिन या तरुणीने म्हटला आहे.

ऐवढं कमी की काय, तर त्यानंतर अमेरिकन दूतावासात काम करणाऱ्या रॉब या तरुणाने डॉ. काशीनाथ घाणेकर या मराठी चित्रपटातील ”आपलं नाणं एकदम खणखणीत वाजतंय, इंटरव्ह्यू एकदम टॉप, एकदम कडक” हा डायलॉग म्हटला आहे.

अमेरिकन दूतावासाने तयार केलेल्या हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. यात अमेरिकेतील दूतावसातील नागरिकांचा मराठी भाषा, मराठी संस्कृती जपण्याचा प्रयत्न दिसत आहेत. विशेष म्हणजे हा व्हिडीओ काल भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक दादासाहेब फाळके यांच्या 148 व्या जयंतीनिमित्ताने तयार केला आहे. यात जेन, निक, लीन आणि रॉब या अमेरिकन अधिकाऱ्यांनी ज्याप्रकारे मराठी भाषेतील संवाद म्हटले आहेत, ते पाहून अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. तसेच स्थानिक संस्कृतीशी एकरुप होण्याच्या त्यांच्या प्रयत्नाचेही अनेकांकडून कौतुक केलं जात आहे.

पाहा व्हिडीओ : 

Non Stop LIVE Update

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI