AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘मध्यावधी निवडणुका होतीलच, कारण…’, पोटनिवडणुकीच्या विजयानंतर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया

अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीच्या निकालानंतर उद्धव ठाकरेंनी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका मांडली. विशेष म्हणजे उद्धव ठाकरेंनी यावेळी राज्यात मध्यावधी निवडणुका नक्कीच होणार असल्याचे संकेत दिले.

'मध्यावधी निवडणुका होतीलच, कारण...', पोटनिवडणुकीच्या विजयानंतर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया
| Updated on: Nov 06, 2022 | 3:35 PM
Share

मुंबई : अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उमेदवार ऋतुजा लटके यांचा विजय जवळपास निश्चित झालाय. ऋतुजा यांचा दणदणीत मतांनी विजय होत असल्याचं निश्चित झाल्यानंतर त्या शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री निवासस्थानी गेल्या. यावेळी उद्धव ठाकरेंनी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका मांडली. विशेष म्हणजे उद्धव ठाकरेंनी यावेळी राज्यात मध्यावधी निवडणुका नक्कीच होणार असल्याचे संकेत दिले.

“मध्यावधी निवडणुका होतील असं मला वाटतंय. कारण मध्यावधी निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन केंद्र सरकार मोठ्या घोषणा करतंय”, असं उद्धव ठाकरे म्हणाले. तसेच “येणारे प्रत्यक्षातले प्रकल्प गुजरातला गेले. जनता उघड्या डोळ्यांनी सगळे बघतेय. जमिनीवरचे प्रकल्प गुजरातेत आणि हवेतील प्रकल्प महाराष्ट्रात”, अशी टीका उद्धव ठाकरेंनी केली.

पोटनिवडणुकीच्या विजयावर उद्धव ठाकरे नेमकं काय म्हणाले?

“मधल्या कपट कारस्थानानंतर पहिली पोटनिवडणूक झाली. आमचं चिन्ह आणि नाव गोठवलं गेलं. मशाल निशाणी घेऊन आम्ही लढलो. मशाल भडकली आणि भगवा फडकला याचा मला आनंद आहे”, अशी प्रतिक्रिया उद्धव ठाकरेंनी दिली.

“या विजयाचं श्रेय शिवसैनिकांना आहेच. पण आमच्यासोबत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, वंचित बहुजन आघाडी, संभाजी ब्रिगेड, कम्युनिस्ट पक्ष आणखी अनेक हितचिंतकांनी मेहनत घेतली. त्या सगळ्यांना मी धन्यवाद देतो”, असं ठाकरे म्हणाले.

“लढाईची सुरुवातच विजयाने झालीय. त्यामुळे मला भविष्यातील लढाईची चिंता राहिलेली नाही. या निवडणुकीत जसं एकजुटीने हा विजय आपण खेचून घेतला तसंच पुढचा सगळा विजय खेचून घेतल्याशिवाय राहणार नाही”, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

“या निवडणुकीत आमचं ज्यांनी चिन्ह गोठवलं, ते तर आमच्या निवडणुकीच्या रिंगणात आजूबाजूला आले नाहीत. मात्र त्यांचे करतेकरवते होते त्यांनी अर्ज भरला. पण त्यांना नंतर अंदाज समजला तेव्हा त्यांनी माघार घेतली. त्यांनी जर अर्ज मागे घेतला नसता तर त्यांच्या पक्षाला नोटाची मतं गेली असती. एकूण या निवडणुकीत नोटाचा वापर झाला हे तुमच्या लक्षात आलं”, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

“भाजपबद्दल मला जास्त काही बोलायचं नाही. कारण त्यांच्याबद्दल चांगल्या गोष्टीची अपेक्षा करणं मुर्खपणाचं ठरेल”, अशी टीका त्यांनी यावेळी केली.

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.