AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

“शक्ती कायदा धूळ खात पडलाय, त्यावरील धूळ झटका अन्…”, उद्धव ठाकरेंचा सरकाराला सल्ला

ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुंबईतील शिवसेना भवनाजवळ निषेध आंदोलन केले. या आंदोलनावेळी उद्धव ठाकरेंनी भाषण करताना शिंदे सरकारवर जोरदार निशाणा साधला.

शक्ती कायदा धूळ खात पडलाय, त्यावरील धूळ झटका अन्..., उद्धव ठाकरेंचा सरकाराला सल्ला
| Updated on: Aug 24, 2024 | 12:30 PM
Share

Uddhav Thackeray On Shakti Act : बदलापूरला दोन शाळकरी मुलींवर झालेल्या लैंगिक अत्याचारानंतर संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली आहे. आज महाविकासाआघाडीकडून मूक आंदोलन करण्यात येत आहे. राज्यभरात ठिकठिकाणी महाविकासआघाडीच्या नेत्यांनी तोंडावर काळी पट्टी बांधत निषेध आंदोलन केले आहे. ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुंबईतील शिवसेना भवनाजवळ निषेध आंदोलन केले. या आंदोलनावेळी उद्धव ठाकरेंनी भाषण करताना शिंदे सरकारवर जोरदार निशाणा साधला.

कंस मामा भाचीला न्याय कधी देतोय?

“गेल्या काही दिवसांचा मी काल घटनांचा क्रम वाचून दाखवला. रोजा काही ना काही घडत आहे. मुंबईत घडतंय, बदलापूर , सोलापूर आणि सांगलीत घडतंय. कंस मामा भाचीला न्याय कधी देतोय, कंस मामा सर्व राख्या बांधत फिरत आहेत. बहिणीवर अत्याचार होत आहे आणि निर्लज्ज राख्या बांधत आहेत. राखी बांधण्यात आडकाठी येऊ नये म्हणून आमच्या आंदोलनात आडकाठी करत आहात. एवढं निर्लज्ज सरकार महाराष्ट्राने कधी पाहिलं नव्हतं”, असा घणाघात उद्धव ठाकरेंनी केला.

“हा महाराष्ट्र साधूसंताचा आहे. फुले शाहू शिवाजी महाराज आणि आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे. ही नावे तोंडी लावायला घेत नाही. हा संस्कारीत महाराष्ट्र आहे. एका बाजूला विकृत आणि नराधम आहे. त्यावर पांघरून घालणारं विकृत सरकार आहे. त्यांच्याविरोधातील हा लढा आहे. आजपासून गावात मुख्य चौकात स्वाक्षरी घ्या. जेवढ्या स्वाक्षऱ्या गोळया करून सर्वोच्च न्यायालयाला पाठवत आहोत. बंद का करत आहोत. हे दाखवायचं आहे”, असेही उद्धव ठाकरे म्हणाले.

शक्ती कायद्यावरील धूळ झटका अन्…

“तुम्ही बंद केला तरी आमचा आवाज कुणीही बंद करू शकत नाही. सरकार माताभगिनींचं रक्षण करण्यास असमर्थ असेल अत्याचार करत असेल तर आम्ही आमच्या माताभगिनींचं रक्षण करायला आम्ही सज्ज आहोत. जो शक्ती कायदा आपण केला होता. तो राष्ट्रपतींकडे पाठवला आहे. त्यांनाही आवाहन करत आहोत की शक्ती कायदा धुळखात पडला आहे. त्यावरील धुळ झटका आणि तो अंमलात आणा”, असे आवाहनही उद्धव ठाकरेंनी केले.

असंख्य शिवसैनिक सहभागी

बदलापूर घटनेच्या निषेध नोंदवण्यासाठी राज्यभरात महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून शांततापूर्वक आंदोलन केलं जात आहे. मुंबईच्या शिवसेना भवन परिसरात ठाकरे गटाकडून आंदोलनाला सुरुवात करण्यात आली आहे. ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे हे आंदोलनस्थळी दाखल झाले आहेत. उद्धव ठाकरे हातात काळा झेंडा हातात घेऊन शिवसेना भवन परिसरात आंदोलन करताना दिसत आहेत. यावेळी उद्धव ठाकरेंनी तोंडावर काळा मास्क लावला आहे. तर त्यांच्या दंडावर काळी रिबीनही बांधल्याचे दिसत आहे.

सध्या मुंबईत मुसळधार पाऊस कोसळत आहे. या भर पावसातही ठाकरे गटाचे हे निषेध आंदोलन सुरु असल्याचे पाहायला मिळत आहे. ठाकरे गटाच्या या निषेध आंदोलनात स्वत: उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरे आणि आदित्य ठाकरे असे संपूर्ण कुटुंब सहभागी झाले आहे. त्यासोबतच संजय राऊत, अनिल देसाई यांच्यासह हजारो शिवसैनिक निषेध आंदोलनात सहभागी झाले आहेत. सध्या शिवसेना भवन परिसरात असंख्य शिवसैनिक या आंदोलनात सहभागी झाल्याचे दिसत आहेत.

Follow Us
महाएल्गार आंदोलनावरून सेना-राष्ट्रवादीत पुन्हा रणसंग्राम!
Mahendra Thorave | महाएल्गार आंदोलनावरून सेना-राष्ट्रवादीत पुन्हा रणसंग्राम! महेंद्र थोरावेंचा राष्ट्रवादीवर जोरदार हल्लाबोल
हिरव्यागार भातशेतीतून लाडक्या बाप्पाचं कोकणात आगमन, मनोरम दृश्य
Ratnagiri Ganeshotsav | हिरव्यागार भातशेतीतून लाडक्या बाप्पाचं कोकणात आगमन, मनोरम दृश्य
राजापूरमध्ये प्रवाशांनी भरलेला टेम्पो ट्रॅव्हलर भिंतीवर आदळला
Rajapur | राजापूरमध्ये प्रवाशांनी भरलेला टेम्पो ट्रॅव्हलर भिंतीवर आदळला; अपघातात 8 ते 10 जण गंभीर जखमी, नेमकं घडलं काय?
साताऱ्यातून लष्कर-ए-तोयबा कनेक्शनचा संशय; मुंबई व्यावसायिकाला धमकी...
साताऱ्यातून लष्कर-ए-तोयबा कनेक्शनचा संशय; मुंबई व्यावसायिकाला धमकी प्रकरणात एकाला अटक
भोपाळहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचं आपत्कालीन लँडिंग, नेमकं काय घडलं?
Bhopal | भोपाळहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचं आपत्कालीन लँडिंग, नेमकं काय घडलं?
मराठ्यांच्या मतांशिवाय निवडणूक जिंकून दाखवा! जरांगेंचं भाजपला आव्हान
Manoj Jarange Patil | मराठ्यांच्या मतांशिवाय निवडणूक जिंकून दाखवा! मनोज जरांगेंचं भाजपला थेट आव्हान; बावनकुळेंवरही केले गंभीर आरोप
अमित शाह यांची एशियाटिक सोसायटीला भेट, सांस्कृतिक वारसा जतन करण्याचे..
अमित शाह यांची एशियाटिक सोसायटीला भेट, सांस्कृतिक वारसा जतन करण्याचे आश्वासन
संजय गायकवाड अडचणीत! महालेंवर आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी...
Sanjay Gaikwad | आमदार संजय गायकवाड अडचणीत! श्वेता महालेंवर आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी बुलढाणा पोलिसांत गुन्हा दाखल
खाडकन उघडले धरणाचे 10 दरवाजे, पावसाचं कमबॅक होताच पाण्याची पातळी...
खाडकन उघडले धरणाचे 10 दरवाजे, पावसाचं कमबॅक होताच पाण्याची पातळी तुफान वाढली
मुंबईच्या दादरमध्ये पावसाची हजेरी! रिमझिम सरींनी मुंबईकरांना दिलासा
Mumbai Rain Updates | मुंबईच्या दादरमध्ये पावसाची हजेरी! रिमझिम सरींनी मुंबईकरांना दिलासा