AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

दररोज 15 लाख लसीकरणाची तयारी, नागरिकांना कोणतीही उणीव भासू देणार नाही : उद्धव ठाकरे

राज्य सरकारची दररोज 15 लाख लसीकरणाची तयारी असल्याचं सांगत नागरिकांना कोणतीही उणीव भासू देणार नाही, असं आश्वासन उद्धव ठाकरे यांनी दिलंय.

दररोज 15 लाख लसीकरणाची तयारी, नागरिकांना कोणतीही उणीव भासू देणार नाही : उद्धव ठाकरे
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
| Edited By: | Updated on: Jun 28, 2021 | 8:31 PM
Share

मुंबई : तिसऱ्या संभाव्य लाटेची शक्यता असताना आपल्याला अधिक सावध राहिले पाहिजे ,जगात इतरत्र कोरोनाच्या डेल्टा प्लसचा संसर्ग परत वाढत असून आपल्याकडे सध्या रुग्ण संख्या घटत असली तरी आरोग्याचे नियम काटेकोरपणे पाळणे अतिशय महत्वाचे आहे असे सांगून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शासनाची दररोज 15 लाख लसीकरणाची तयारी असल्याचे स्पष्ट केले. एमएमआरडीएने मालाड येथे आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करीत उभारलेल्या समर्पित कोविड रुग्णालयाचे हस्तांतरण आज मुंबई महानगरपालिकेला करण्यात आले त्यावेळी मुख्यमंत्री बोलत होते (Uddhav Thackeray inform Maharashtra health department ready to daily 15 lakh vaccination).

सह्याद्री अतिथीगृह येथे झालेल्या कार्यक्रमात नगर विकास मंत्री श्री.एकनाथ शिंदे, महसूल मंत्री श्री. बाळासाहेब थोरात, अल्पसंख्यांक विकास मंत्री नवाब मलिक, परिवहन मंत्री ॲड. अनिल परब, मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख, मुंबई उपनगरचे पालकमंत्री आदित्य ठाकरे, महापौर किशोरी पेडणेकर, मुंबई महानगरपालिका आयुक्त इकबालसिंह चहल, महानगर आयुक्त एस के श्रीनिवासन उपस्थित होते.

पुढच्यास ठेच , मागचा शहाणा

मुख्यमंत्री म्हणाले की,कोरोनाची दुसरी लाट ओसरली नसून सध्या जरी बेडस रिकामे दिसत असले तरी दुसरी लाट परत उलटू नये म्हणून आपल्याला गर्दी टाळणे, मास्क घालणे हे नियम कटाक्षाने पाळावे लागतील. पुढच्यास ठेच , मागचा शहाणा या म्हणीप्रमाणे आपण जगभर कोरोनाची लाट परत उसळत आहे ते पाहून सावध राहावे लागेल पहिल्या लाटेच्या वेळेस आपण बीकेसी येथे देशातले पहिले फिल्ड रुग्णालय विक्रमी वेळेत उभारले. आपण आरोग्य सुविधांच्या उभारणीत आणि नागरिकांच्या आरोग्याचे हित जोपासताना कोणतीही उणीव भासू देणार नाही असे सांगून मुख्यमंत्र्यांनी दररोज 15 लाख लसी देण्याची तयारी असल्याचे स्पष्ट केले प्रारंभी महानगर आयुक्त श्रीनिवासन यांनी प्रास्ताविक केले.

मालाडच्या कोविड जम्बो कोविड सेंटर व इतर माहिती

• या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर सध्याच्या कोविड सेंटर्समधील बेडची संख्या वाढवण्यासोबतच 4 नवीन कोविड सेंटरही सुरु करणार.

• त्यापैकीच एक म्हणजे मालाड जम्बो कोविड सेंटर होय. या सेंटरमध्ये 2170 बेडस् आहेत. त्यात जवळपास 70 टक्के म्हणजे 1536 ऑक्सिजन बेड तर 190 आयसीयू बेड आहेत. लहान मुलांसाठी 200 ऑक्सिजन पेडियाट्रिक बेड आणि 50 पेडियाट्रिक आयसीयू बेड आहेत.

• मालाड जम्बोसह दुसऱया टप्प्यामध्ये कांजूरमार्ग, सायन, वरळी रेसकोर्स हे नवीन जम्बो सेंटर देखील आपण सुरु करत आहोत. तर नेस्को, रिचर्डसन ऍण्ड क्रूडास भायखळा आणि एनएससीआय मधील बेडची संख्या वाढवली जात आहे.

• जम्बो कोविड सेंटर्सच्या दुसऱया टप्प्यामध्ये पहिल्या टप्प्यापेक्षाही अधिक म्हणजे 8320 इतके बेड उपलब्ध होत आहेत. यात 70 टक्के म्हणजे 5,986 ऑक्सिजन बेड तर 1140 आयसीयू बेड आहेत. लहान मुलांसाठी स्वतंत्र असे 600 ऑक्सिजन व 150 आयसीयू बेड आहेत.

• पहिला आणि दुसरा असे दोन्ही टप्पे मिळून जम्बो कोविड सेंटर्समधील एकूण बेड संख्या आता 15 हजार 627 होते आहे. त्यात 9139 ऑक्सिजन बेड 1572 आयसीयू बेड आहेत.

• यामध्ये लहान मुलांसाठी एकूण 1200 ऑक्सिजन पेडियाट्रिक बेड आणि 150 पेडियाट्रिक आयसीयू बेड उपलब्ध असतील.

• जम्बो सेंटर्सच्या दुसऱया टप्प्यामध्ये आपण ऑक्सिजन बेड, आयसीयू बेड आणि पेडियाट्रिक बेडची संख्या अधिकाधिक असेल, यावर भर दिला आहे.

• जम्बो सेंटर्सच्या संख्येमध्ये जर आपण महानगरपालिकेची प्रमुख रुग्णालये, उपनगरीय रुग्णालये, सेव्हन हिल्स हॉस्पिटल यांची बेरीज केली तर आता एकूण बेडसची संख्या ही 19 हजार 928 म्हणजे जवळपास 20 हजार इतकी होते आहे.

• पहिल्या व दुसऱ्या लाटेमध्ये मिळून आतापर्यंत सुमारे 77 हजारांपेक्षा अधिक रुग्णांना या जम्बो कोविड सेंटरमध्ये उपचार

• जम्बो कोविड सेंटर्सच्या पहिल्या टप्प्यामध्ये बीकेसी कोविड सेंटर, गोरेगाव नेस्को कोविड सेंटर, वरळी एनएससीआय संकूल, मुलूंड रिचर्डसन ऍण्ड क्रूडास, भायखळा रिचर्डसन ऍण्ड क्रूडास आणि दहिसर जम्बो कोविड सेंटर असे प्रमुख सहा कोविड सेंटर सुरु.

• या 6 जम्बो कोविड सेंटर्समध्ये मिळून 7 हजार 307 बेडस् आहेत. ज्यात 3 हजार 207 ऑक्सिजन बेड तर 432 आयसीयू बेड आहेत. सोबत लहान मुलांसाठी 600 बेडदेखील आहेत.

• संभाव्य तिसऱया लाटेमध्ये लहान मुलांना देखील कोविडची बाधा होवू शकते, हे लक्षात घेऊन लहान मुलांसह नवजात बाळांसाठी स्वतंत्र व जास्तीत जास्त बेड उपलब्ध करणे आवश्यक आहे.

• यामध्ये जवळपास 11 हजार बेड हे ऑक्सिजन सह तर 2348 आयसीयू आहेत.

सोबतच, लहान मुलांसाठी 1500 ऑक्सिजन पेडियाट्रिक बेड आणि 230 पेडियाट्रिक आयसीयू बेड उपलब्ध असतील. नवजात बाळांसाठी 60 बेडदेखील यामध्ये बनविण्यात आले आहेत.

• कोविड-19 विषाणूचा प्रादुर्भाव सुरु झाल्यापासून आतापर्यंत (27 जून 2021) मुंबईत एकूण 7 लाख 20 हजार 356 बाधित रुग्ण आढळले. यापैकी 6 लाख 94 हजार 082 (96.35 टक्के) रुग्ण पूर्णपणे बरे झाले आहेत.

• इतक्या मोठ्या संख्येने रुग्ण बरे होण्यासाठी नियमित रुग्णालयांसोबतच जम्बो कोविड सेंटर्सनीदेखील खऱया अर्थाने मोलाचा हातभार लावला आहे.

• मुंबईत जवळपास 20 हजारावर कोविड बेड उपलब्ध आहेत. म्हणजेच बाधितांवर उपचारांसाठी पुरेशा संख्येने बेड उपलब्ध आहेत.

हेही वाचा :

संजय राऊत आणि शरद पवार भेट व्हाया उद्धव ठाकरे! राजकीय विश्लेषकांच्या मते गाठीभेटीचं कारण काय?

मुख्यमंत्र्यांसोबत तब्बल दीड तास चर्चा, पण 20 मिनिटात पवारांची भेट घेऊन संजय राऊत परतले

दिल्लीतील शेतकरी आंदोलनास 7 महिने पूर्ण, राष्ट्रपतींनी यात लक्ष घालावे, संयुक्त किसान मोर्चाचे शिष्टमंडळाची राज्यपालांकडे मागणी

व्हिडीओ पाहा :

Uddhav Thackeray inform Maharashtra health department ready to daily 15 lakh vaccination

CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?.
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका.
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण.
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?.
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी.
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.