Uddhav Thackeray : तुमच्या हिंदुत्वाचा अर्थ काय? मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा भाजपाला सवाल हे हिंदुत्व घरातली चूल पेटवणारं आहे का?

Uddhav Thackeray : तुमच्या हिंदुत्वाचा अर्थ काय? मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा भाजपाला सवाल हे हिंदुत्व घरातली चूल पेटवणारं आहे का?
तुमच्या हिंदुत्वाचा अर्थ काय? मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा भाजपाला सवाल हे हिंदुत्व घरातली चूल पेटवणारं आहे का?

आम्ही काँग्रेससोबत गेलो उघड गेलो, तुमच्यासारखा सकाळचा शपथविधी नाही केला असा टोला माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही लगावण्यात आला. एनडीएमधील 30 ते 35 सहकारी होते. त्यातील किती लोकं हिंदुत्ववादी म्हणून तुमच्यासोबत आले अशी जोरदार हल्ला त्यांनी भाजपवर केला.

महादेव कांबळे

|

May 14, 2022 | 10:08 PM

मुंबईः हृदया राम आणि हाताला काम हे आमचं हिंदुत्व आहे,.तुमच्या हिंदुत्वाचा अर्थ काय आहे असा सवाल उपस्थित करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackrey) यांनी भाजपाला थेट सवाल केला आहे. केवळ घंटा आणि थाळ्या वाजवणारं हिंदुत्व नको आहे, हाताला काम देणारं आणि घरातली चूल पेटवणारं हिंदुत्व (Hindutv) शिवसेनेचं आहे, असं सांगत त्यांनी हिंदुत्वाबद्दल भाजपा आणि संघपरिवाला (RSS) लक्ष्य करण्यात आले.


आमच्या हिंदुत्वाचं मोजमाप घेणारे तुम्ही कोण, असा सवालही त्यांनी भाजपला विचारला, ‘काँग्रेससोबत गेलो, हो गेलो ना. का गेलो तुम्ही ढकललं आम्हाला. काँग्रेससोबत गेलो तरी हातातला आणि हृदयातला भगवा सोडला नाही. हे विधानसभेतही बोललो असल्याचे त्यांनी सांगितले.

हिंदुत्व ही नेसण्याची आणि सोडण्याची गोष्ट नाही

काँग्रेससोबत गेलो म्हणून हिंदुत्व सोडलं, हिंदुत्व म्हणजे काय धोतर आहे, कधीही सोडलं कधी नेसलं. नेसायचं ठिक आहे. पण सोडायची लाज तुम्हाला नसेल वाटत पण हिंदुत्व ही नेसण्याची आणि सोडण्याची गोष्ट नाही असे सांगत त्यांनी भाजपच्या हिंदुत्वाच्याच मुद्यावर प्रश्न उपस्थित केला.

काँग्रेससोबत गेलो उघड गेलो

आम्ही काँग्रेससोबत गेलो उघड गेलो, तुमच्यासारखा सकाळचा शपथविधी नाही केला असा टोला माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही लगावण्यात आला. एनडीएमधील 30 ते 35 सहकारी होते. त्यातील किती लोकं हिंदुत्ववादी म्हणून तुमच्यासोबत आले अशी जोरदार हल्ला त्यांनी भाजपवर केला.

संघमुक्त भारत करायचा

संघमुक्त भारत करायचा असं नितीश कुमार बोलेले होते, ते हिंदुत्वावादी होते का. काल परवा त्यांनी भोंग्यावर टीका केली. घातलं त्यांनी भोंग्यात पाणी, यावेळी त्यांनी भाजपची हिम्मत काढत ते म्हणाले की, काय हिंमत आहे का त्यांच्याशी बोलायची. आज काश्मीर सोबत जे चालू आहे. त्यावेळीही त्यांनी हेच केलं आहे. त्यावेळी मेहबुबा मुफ्तींसोबत युती केली. त्यावेळी तुमचे ते हिंदुत्व होतं का’, असा सवाल उद्धव ठाकरेंनी उपस्थित केला.

बाबरी तुम्ही पाडली नाहीच

उद्धव ठाकरे म्हणाले- ती मशीद नव्हती ढाचा होता असं तुम्ही म्हणता. मग त्यावेळी एवढं टिपेला का गेलं होतं. मंदिर पाडलं अन् मशीद बांधली. मला आठवतंय. मी साक्ष आहे. सर्वांना अयोध्येला बोलावलं होतं. शिवसैनिक होते. अडवाणींचा व्हिडिओ आहे. जे लोकं बोलत होते ते मराठी बोलत होती. मी प्रमोदला पाठवलं. ते त्यांचं ही ऐकत नव्हतं. हे न ऐकणारे कोण होते मग?, असा प्रश्न उपस्थित करुन त्यांनी शिवसैनिकांनीच बाबरी पाडली, याचा पुनरुच्चार केला.

असं पुचाट नेतृत्व नको

उद्धव ठाकरे पुढे म्हणाले मला तो दिवस आजही आठवतो. मी बाळासाहेबांना सांगितलं साहेब बाबरी पडली. तेवढ्यात बेल वाजली. इंटरकॉमचा कॉल होता. ते एवढेच म्हणाले मग, आणि शिवसैनिकांनी बाबरी पाडली असेल तर मला त्याचा अभिमान आहे असं साहेब म्हणाले. त्यानंतर मला म्हणाले ही कसली याची औलाद आहे. लोकांना बोलावत आहे कार सेवा करा. कार सेवा म्हणजे गाड्या धुवायच्या का. हे कसलं पुचाट नेतृत्व आहे. भाजपने हेच काम केलं. जबाबदारी झटकणारं नेतृत्व नको. सुंदर सिंग भंडारी म्हणाले होते, शिवसैनिकांनी हे काम केलं. तेव्हा भोंगा का वाजवला नाही. सांगायचं ना. असाही त्यांनी भाजपला टोला लगावला.

विकृतपणा नव्हे तर सुसंस्कृतपणा म्हणजे हिंदुत्व

तुमचं विकृत हिंदुत्व आम्हाला मान्य नाही. शिवसेनाप्रमुखांनी हिंदुत्वाचा विचार दिला हे विखार देत आहेत. ही विखारी माणसं देशाचा कारभार काय करणार. हे मनोरुग्ण आहेत अशी टीकाही त्यांनी त्यांच्यावर केली. सुसंस्कृतपणा आहे तो आपल्या देशातून राज्यातून जात आहे. ते जपायचं आहे. ते खरं हिंदुत्व आहे. श्लोक म्हणायचे आणि तिकडे वाटेल ते करायचं. म्हणजे करून करून भागले आणि देवपुजेला लागले हे हिंदुत्व. या सगळ्या चित्रविचित्रं गोष्टी टाळल्या गेल्या पाहिजे. हे सांगणारं आज कोणी दिसत नाही. ते आपल्याला करायचं आहे असंही त्यांनी यावेळी सांगितले.

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें