AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Uddhav Thackeray : ‘होय आम्ही गधाधारी होतो, पण अडीच वर्षापूर्वीच त्या गाढवाला लाथ मारली’, उद्धव ठाकरेंचा फडणवीसांना जोरदार टोला

आमचं हिंदुत्व होतं हे गधाधारी होतं पण आम्ही अडीच वर्षापूर्वी तुम्हाला सोडलं. जी गाढवं घोड्याच्या आवेषात होती त्यांनी लाथ मारायच्या ऐवजी आम्ही त्याला लाथ मारली', अशा शब्दात उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीसांना जोरदार टोला लगावला.

Uddhav Thackeray : 'होय आम्ही गधाधारी होतो, पण अडीच वर्षापूर्वीच त्या गाढवाला लाथ मारली', उद्धव ठाकरेंचा फडणवीसांना जोरदार टोला
उद्धव ठाकरे, शिवसेना पक्षप्रमुखImage Credit source: TV9
| Updated on: May 14, 2022 | 8:50 PM
Share

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी मुंबईतील बीकेसी मैदानावरुन भाजप आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार पलटवार केलाय. उद्धव ठाकरे यांनी यापूर्वी आमचं हिंदुत्व (Hindutva) हे गदाधारी हिंदुत्व आहे घंटाधारी नाही, असं वक्तव्य केलं होतं. त्यावर देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी त्यांचं हिंदुत्व आता गदाधारी नाही तर गधाधारी झाल्याची जोरदार टीका केली होती. त्यावर आता उद्धव ठाकरे यांनीही पलटवार केलाय. ‘आमचं हिंदुत्व हे गदाधारी आहे आणि बाकीच्यांचं घंटाधारी असं मी म्हणालो होतो. त्यावर फडणवीस बोलले. आमचं हिंदुत्व होतं हे गधाधारी होतं पण आम्ही अडीच वर्षापूर्वी तुम्हाला सोडलं. जी गाढवं घोड्याच्या आवेषात होती त्यांनी लाथ मारायच्या ऐवजी आम्ही त्याला लाथ मारली’, अशा शब्दात उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीसांना जोरदार टोला लगावला.

‘अडीच वर्षापूर्वीच आम्ही गाढवाला लाथ मारली’

उद्धव ठाकरे म्हणाले की, ‘तुमच्याप्रमाणे मलाही आज मोकळं वाटतंय. बऱ्याच दिवसानंतर मैदानात उतरलो आहे. मोकळा श्वास घेत आहे. अनेक विषयावर बोलायचं आहे. छत्रपती संभाजी महाराज म्हटल्यावर आणखी काही बोलण्याची गरज नाही. ज्यांना महाराष्ट्र म्हणजे काय हे महाराष्ट्रात राहून कळलं नाही. त्यांच्यासाठी मध्येमध्ये बोलावं लागतं. विषय बरेच आहेत. त्यातही खोटा हिंदुत्वाचा बुरखा घेतलेला पक्ष सोबत होता. तो देशाची दिशा भरकटवत आहे. तुम्ही मला गदा दिली. मध्ये बोललो होतो आमचं हिंदुत्व कसं आहे. मला देवळात घंटा बडवणारा हिंदू नको तर अतिरेक्यांना बडवणारा हिंदू पाहिजे. आपलं हिंदुत्व गदाधारी तर इतरांची घंटा धारी. बसवा हलवत घंटा. गदा पेलवायला ताकद हवी. हनुमान भीमसारखे. आमचं हिंदुत्व गधाधारी असं फडणवीस म्हणाले. तो गधा आम्ही अडीच वर्षापूर्वी सोडून दिला. आम्ही गाढव सोडून दिलं. घोड्याच्या आवेशात होते, त्या गाढवाने लाथ मारण्यापूर्वीच आम्ही सोडून दिलं. बसा बोंबलत, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी भाजपवर आणि फडणवीसांवर केलीय.

‘हिंदुत्वावर घाला घालण्याची कुणाची बिशाद आहे पाहतो’

‘आवेश आणला जातो हिंदुत्वाचे रक्षक ते आहेत. मग समोर बसलेले कोण आहे. यांच्या धमन्यात शिवसेनाप्रमुखांनी हिंदुत्वाचं रक्त पेरलं आहे. हा हिंदु् मेलेल्या आईचं दूध प्यायलेला नाही. कुणाची बिशाद आहे हिंदुत्वावार घाला घालण्याची बघतो ना मी. एक दोन मुद्दे महत्त्वाचे आहेत त्यावर बोललं पाहिजे. स्लीप ऑफ टंग म्हणून सोडणार नाही. 1 मे आपण साजरा करत होतो. तेव्हा फडणवीस चुकून बोलले. ते बोलून गेले मुंबई स्वतंत्र करणार. मालकाची इच्छा बोलून गेले. तुमच्या मालकासकट तुमच्या सतराशे साठ पिढ्या जरी आल्या ना हा जिवंतपणा या मर्द मावळ्यात आहे. मुंबई मराठी माणसाने रक्त सांडून मिळवली आहे. आंदण म्हणून मिळाली नाही. मुंबईला वेगळं करण्याचा जो कोणी प्रयत्न करेल त्याचे तुकडे तुकडे केल्याशिवाय मराठी माणूस राहणार नाही, असा इशाराही उद्धव ठाकरे यांनी भाजपला दिलाय.

फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा.
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?.
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका.
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण.
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?.
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी.
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.