Sanjay Raut : सचिन अहिरांनी ठाकरेंची साथ सोडताच संजय राऊत यांची चारओळीची प्रतिक्रिया, म्हणाले, बेईमानीचा कीडा…

Sanjay Raut on Sahcin Ahir: 6 खासदार फुटल्यानंतर त्यांच्या मतदारसंघात उद्धव ठाकरे यांचा दौरा झाला. हा दौरा आटपून ते मुंबईत दाखल होत नाही तोच शिंदे सेनेने त्यांना अजून एक मोठा धक्का दिला. त्यावर आता खासदार संजय राऊत यांनी मोठी प्रतिक्रिया दिली आहे.

Sanjay Raut : सचिन अहिरांनी ठाकरेंची साथ सोडताच संजय राऊत यांची चारओळीची प्रतिक्रिया, म्हणाले, बेईमानीचा कीडा...
संजय राऊत, सचिन अहिर, एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, सुनेत्रा पवार
Image Credit source: एजन्सी
| Updated on: Jun 30, 2026 | 2:17 PM

Sanjay Raut on Sahcin Ahir: ऑपरेशन टायगरचे धक्के अजूनही बसत आहे. आज उद्धव ठाकरे यांना आज एकनाथ शिंदे यांनी मोठा धक्का दिला. सहा खासदार फुटल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या मतदारसंघ पिंजून काढला. तिथे कार्यकर्ता मेळावा घेतला आणि खासदारांवर टीकेची झोड उठवली. ते दौरा आटपून परत येत नाही तोच आज ठाकरे सेनेला त्यांनी मुंबईत मोठा धक्का दिला. आदित्य ठाकरे यांच्या मतदारसंघातील खंदे समर्थक सचिन अहिर यांनी विधान परिषद उपसभापती पदासाठी अर्ज दाखल केला. त्यावर आता खासदार संजय राऊत यांनी खरमरीत प्रतिक्रिया दिली आहे. सोशल मीडिया एक्सवर त्यांनी एक पोस्ट शेअर केली आहे.

संजय राऊत यांची विखारी टीका

सचिन अहिर हे उद्धव ठाकरे यांच्या जवळचे मानले जात होते. राष्ट्रवादीतून ते शिवसेनेत दाखल झाले होते. वरळी मतदारसंघात त्यांचा प्रभाव आहे. याच मतदारसंघातून आदित्य ठाकरे हे विधानसभेवर निवडून आले आहेत. त्यामुळे मुंबईत ठाकरे सेनेला हा मोठा झटका मानल्या जात आहे. सचिन अहिर यांनी शिंदे सेना जवळ करताच संजय राऊत यांनी एक्स हँडलवर चार ओळींची प्रतिक्रिया दिली.

“आम्ही चार किरणांचीही आस का धरावी? जे कधीच नव्हते आमचे त्याची वाट का पहावी?” अशा चार ओळी राऊतांनी शेअर केल्या आहेत. पक्षात येतानाच जे स्वार्थ आणि बेईमानीचा कीडा घेऊन येतात त्यांच्या जाण्याचे दुःख का करावे अशी विखारी टीका संजय राऊत यांनी केली. त्यांनी अहिर गेल्याने जणू काहीच फरक पडत नाही असा इशारा दिला आहे.

सहा खासदारांना आमदारही जाणार?

याच महिन्याच्या अखेरच्या टप्प्यात सहा खासदारांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला. हा धक्का अजून ताजा असतानाच अवघ्या आठ दिवसात शिंदेंनी धक्कातंत्र वापरले. विधान परिषद उपसभापती पदासाठी नीलम गोऱ्हे, चंद्रकांत रघुवंशी आणि कृपाल तुमाने यांच्या नावाची चर्चा सुरू असतानाच शिंदेंनी मोठी खेळी खेळली. सचिन अहिर हे थेट उपसभापती पदाचा अर्ज भरून तो सादर करताना दिसले. त्यांच्यासोबत यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, मंत्री चंद्रकांत पाटील आणि इतर मान्यवर उपस्थित होते.

तर गेल्या आठवडाभरापासून ऑपरेशन टायगरमध्ये ठाकरे सेनेतील 14 आमदार फुटणार असल्याचा दावा करण्यात येत आहे. मुंबई महापालिकेतीलच नाही तर इतर ठिकाणचे नगरसेवकही शिंदे सेनेत दाखल होणार असल्याचा दावा करण्यात येत आहे. नगरसेवक आणि आमदार संपर्कात असल्याचे सांगत राज्यात मोठा राजकीय स्फोट होण्याचा दावा करण्यात येत असल्याने एकच खळबळ उडाली आहे.

Follow Us