AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

दुष्काळ जाहीर करण्यापासून विशेष अधिवेशनापर्यंत… उद्धव ठाकरे यांच्या 5 मागण्या… म्हणाले, तात्काळ माहिती द्या

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील गंभीर दुष्काळी परिस्थितीवर भाष्य करत सरकारकडे 5 प्रमुख मागण्या केल्या आहेत. यात शेतकऱ्यांना तात्काळ आर्थिक मदत, कर्जमाफीच्या लाभार्थ्यांची यादी जाहीर करणे, पीक विमा कंपन्यांवर कारवाई, दुष्काळग्रस्त भागांत तातडीने कॅबिनेट बैठक आणि विशेष अधिवेशन बोलावण्याची मागणी समाविष्ट आहे.

दुष्काळ जाहीर करण्यापासून विशेष अधिवेशनापर्यंत... उद्धव ठाकरे यांच्या 5 मागण्या... म्हणाले, तात्काळ माहिती द्या
uddhav thackeray Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Sep 24, 2026 | 1:10 PM
Share

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राज्यातील इतर मंत्री शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पाहणी करत आहेत. शेतकऱ्यांना दिलासा देत आहेत. दुष्काळाचा जीआर येत्या दोन दिवसात काढणार असल्याचं मुख्यमंत्री फडणवीस यांनी जाहीर केलं आहे. या पार्श्वभूमीवर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाच मागण्या केल्या आहेत. शेतकऱ्यांना दिलेल्या कर्जमाफीची यादी देण्यापासून ते विधानसभेचं अधिवेशन तातडीने घेण्याची मागणी उद्धव ठाकरे यांनी केली आहे. केवळ हवाबाण हरडे सोडू नका. तात्काळ अधिवेशन घ्या, असं ठाकरे यांनी म्हटलं आहे.

उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन पाच मागण्या केल्या आहेत. आमची पहिली मागणी म्हणजे गेल्या वर्षी शेतकऱ्यांना किती पॅकेज जाहीर केलं, ते किती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचलं याची माहिती द्या. दुसरी मागणी म्हणजे, आता जी कर्जमाफी करण्यात आली. त्याचा किती शेतकऱ्यांना लाभ झाला याची यादी द्या. तिसरं म्हणजे सरकारने पीक विमा योजना गुंडाळली आहे. दरवर्षी शेतकरी पिक विम्यासाठी नोंद केली जाते. त्यात अर्ध्याहून अधिक जास्त शेतकऱ्यांनी नोंद केलीच नाही. पावणे दोन लाख शेतकऱ्यांनी नोंदणी केली होती. ही योजना बंद केल्यावर ती संख्या 70 हजारावर आली. त्यामुळे हे शेतकरी असेच गेले. यात प्रमुख चार ट्रिगर होते. ते काढून टाकले. पीक विमा कंपन्यांच्या मनमानीमुळे कुठे 5 रुपये, कुठे 21 रुपयांचा चेक शेतकऱ्यांना मिळाला आहे. या गुन्हेगार कंपन्यांना शिक्षा झाली पाहिजे. सर्वच गुन्हेगार शोधले तर शेतकऱ्यांची वाट लागेल. या योजनेचं काय खरं काय नाही हे संगितलं पाहिजे. चौथी मागणी म्हणजे, सोलापूर, संभाजीनगर विदर्भात तातडीने कॅबिनेट मिटिंग घ्यायला हवी. तसेच पाचवी मागणी म्हणजे येत्या दोन ते तीन दिवसात विशेष अधिवेशन बोलवा, अशी मागणी उद्धव ठाकरे यांनी केली आहे.

40 दिवसात आर्थिक मदत द्या

येत्या 40 ते 45 दिवसाच्या आत शेतकऱ्यांना आर्थिक मदत दिली पाहिजे. केंद्र सरकारच्या मदतीची वाट न पाहता ही मदत केली पाहिजे. तसेच शेतकऱ्यांना काय मदत केली जाते याची माहिती देण्यासाठी मंत्रालयात डॅशबोर्डची स्थापना केली पाहिजे. त्यावर रोजची माहिती दिली पाहिजे. तसेच अधिवेशनात पिण्याच्या पाण्याचं नियोजन कसं करणार याची माहितीही दिली पाहिजे. अधिवेशनासाठी कशाचीही वाट पाहू नये. येत्या दोन ते तीन दिवसात अधिवेशन घ्या, अशी मागणीही उद्धव ठाकरे यांनी केली आहे. तसेच सरसकट कर्जमाफी केली पाहिजे. त्याची माहितीही डॅशबोर्डवर दिली पाहिजे, असंही ते म्हणाले.

परिस्थिती गंभीर

गेले काही वर्ष अतिवृष्टी, पूर नैसर्गिक संकटाला महाराष्ट्र तोंड देत आला आहे. गेल्यावर्षी मी मराठवाड्यात गेलो होतो. त्यावेळी सरत्या पावसाने धुमाकूळ घातला होता. पिकं वाया गेली होती. घरदारांचं नुकसान झालं होतं, वह्या पुस्तक वाहून गेले होते. विचित्र संकट होतं. त्यावेळी मी दौरा केला होता. कर्जमुक्तीची मागणी केली होती. तेव्हा वातावरण गरम होत होतं. आताही तीच परिस्थिती आहे, अशी माहिती त्यांनी दिली.

आत्महत्या कशा रोखणार?

दुष्काळाचा साईड इफेक्ट असतो. यावेळीही तो होण्याची शक्यता आहे. अशा परिस्थित शेतकरी आत्महत्या करतात. त्यामुळे त्या रोखण्यासाठी काय करणार आहात? याची माहिती सरकारने दिलं पाहिजे. तसेच दुष्काळामुळे मोठ्या प्रमाणावर स्थलांतर होणार आहे. या स्थलांतरीतांची काय व्यवस्था करणार आहात? त्यांची राहण्याची आणि रोजगाराची सोय काय होईल याची माहितीही मुख्यमंत्र्यांनी दिली पाहिजे, अशी मागणीही त्यांनी केली.

Follow Us
महाराष्ट्राला या संकटातून बाहेर काढा; मंगलप्रभात लोढांची बाप्पाच्या...
महाराष्ट्राला या संकटातून बाहेर काढा; मंगलप्रभात लोढांची बाप्पाच्या चरणी विशेष प्रार्थना
चार एकर सोयाबीन, लाखोंचा खर्च अन् पदरी नुकसान; फडणवीसांसमोर शेतकरी...
चार एकर सोयाबीन, लाखोंचा खर्च अन् पदरी नुकसान; फडणवीसांसमोर शेतकऱ्यांचा आक्रोश
कणाहीन निवडणूक आयोगाची चौकशी करा; राज ठाकरेंनी थेट ज्ञानेश कुमार...
निवडणूक आयोगाचीच चौकशी करा; राज ठाकरेंनी थेट ज्ञानेश कुमारांना घेरलं
दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी सरकार तत्पर; मंत्री चंद्रशेखर बावनकुळे...
दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी सरकार तत्पर; मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी दिली महत्त्वाची माहिती
राहुल गांधींचा निवडणूक आयोगाला इशारा; ‘वेळ आल्यावर...
Rahul Gandhi : राहुल गांधींचा निवडणूक आयोगाला इशारा; ‘वेळ आल्यावर... नेमकं प्रकरण काय?
मुख्यमंत्री फडणवीस अमरावती वाशिम दौऱ्यावर दुष्काळी परिस्थितीचा घेणार..
मुख्यमंत्री फडणवीस अमरावती वाशिम दौऱ्यावर दुष्काळी परिस्थितीचा घेणार आढावा
ज्ञानेश कुमार यांच्यामागचा बॉस कोण? संजय राऊतांनी सरळ नावचं सांगून...
ज्ञानेश कुमार यांच्यामागचा बॉस कोण? संजय राऊतांनी सरळ नावचं सांगून टाकलं
अशोक उईकेंचं अभिजीत दीपकेंना थेट आव्हान; आश्रमशाळ मुद्द्यावरून...
अशोक उईकेंचं अभिजीत दीपकेंना थेट आव्हान; आश्रमशाळांच्या मुद्द्यावरून मोठा वाद
लालबागच्या राजाच्या चरणस्पर्श दर्शनाची रांग बंद, मुखदर्शनासाठी गर्दी..
Lalbaugcha Raja 2026 : लालबागच्या राजाच्या चरणस्पर्श दर्शनाची रांग बंद, मुखदर्शनासाठी गर्दी कायम
अभिनेता अजय देवगणला महापालिकेचा मोठा धक्का, थेट जुहूमधील बंगल्याला...
अभिनेता अजय देवगणला महापालिकेचा मोठा धक्का, थेट जुहूमधील बंगल्याला नोटीस