AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शेतकऱ्यांना मोठा दिलासा… कर्जमाफीबाबत मुख्यमंत्र्यांची सर्वात मोठी घोषणा; वाशिममध्ये काय म्हणाले?

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वाशिममध्ये दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिला आहे. पूर्वी कर्जमाफीपासून वंचित राहिलेल्या सर्व शेतकऱ्यांसाठी मुख्यमंत्र्यांनी कर्जमाफीची सर्वात मोठी घोषणा केली. तसेच, कोरड्या दुष्काळाचा जीआर काढणार असल्याचे आणि विमा प्रश्नांवरही मार्ग काढणार असल्याचे आश्वासन दिले.

शेतकऱ्यांना मोठा दिलासा... कर्जमाफीबाबत मुख्यमंत्र्यांची सर्वात मोठी घोषणा; वाशिममध्ये काय म्हणाले?
devendra fadnavisImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Sep 24, 2026 | 12:26 PM
Share

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गेल्या दोन दिवसांपासून दुष्काळी भागाची पाहणी करत आहेत. मुख्यमंत्र्यांनी काल लातूरमधील दुष्काळी भागाची पाहणी केली. शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांची विचारपूस केली. आज मुख्यमंत्र्यांनी वाशिममध्ये शेतकऱ्यांशी संवाद साधला आणि पाहणी केली. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांचं म्हणणं ऐकून घेतलं. त्यांचं निवेदन घेतलं. तुम्ही काळजी करू नका. सरकार तुमच्या पाठीशी आहे. कोरड्या दुष्काळाचा जीआर आम्ही काढणार आहोत, असं सांगतानाच जे शेतकरी कर्जमाफीपासून वंचित राहिले आहेत, त्यांनाही कर्जमाफी केली जाणार आहे, अशी घोषणाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज वाशिमच्या मसाल गावात आले होते. यावेळी त्यांना भेटण्यासाठी शेतकऱ्यांनी मोठी गर्दी केली होती. एका शेतकऱ्याने तर मुख्यमंत्र्यांचं दर्शन घेतलं. काहींनी मुख्यमंत्र्यांना निवेदन दिलं. काही शेतकरी आपल्या तक्रारी मांडत होते. पिकांपासून पाण्यापर्यंतच्या व्यथा मांडत होते. जनावरांचे होणारे हाल सांगत होते. मुख्यमंत्र्यांनी या सर्व शेतकऱ्यांचं म्हणणं ऐकून घेतलं. त्यांना धीर दिला. प्रत्येकाशी संवाद साधला. त्यानंतर जाताना मुख्यमंत्र्यांनी हात उंचावून शेतकऱ्यांशी संवाद साधला. त्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला.

हात उंचावले, संवाद साधला…

फडणवीस यांचा ताफा जात असताना शेतकऱ्यांनी हात उंचावले. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी ताफा थांबवून शेतकऱ्यांशी संवाद साधला. मी तुम्हा सर्वांना मदत करणार आहे. तुमचे प्रश्न सोडवणार आहे. तुम्ही काळजी करू नका. आम्ही कोरड्या दुष्काळाचा जीआर काढणार आहोत. विम्याचे प्रश्नही मार्गी लावणार आहोत, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं.

देवेंद्र फडणवीस आगे बढो…

2016-17 मध्ये कर्जमाफीत जे वंचित राहिले होते. त्या सर्वांना आम्ही कर्जमाफी देणार आहोत. वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांनाही मदत करणार आहोत. तुम्ही काळजी करू नका. सरकार तुमच्या पाठिशी आहे, असं फडणवीस यांनी जाहीर केलं. फडणवीस यांनी ही घोषणा करताच शेतकऱ्यांनी देवेंद्र फडणवीस आगे बढोच्या घोषणा दिल्या. जे शेतकरी तक्रारी करण्यासाठी आले होते, ते घोषणा देत होते.

दरम्यान, मुख्यमंत्री फडणवीस यांनी काल लातूर, धाराशिव, सोलापूर जिल्ह्यातील दुष्काळसदृश परिस्थितीमुळे नुकसान झालेल्या भागाची पाहणी केली. त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला. त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. लातूरमध्ये 1972 नंतरचा सर्वात मोठा दुष्काळ पडल्याचं सांगितलं. तसेच हा दुष्काळ महाभयानक असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. मात्र, दुष्काळात आम्ही कुणालाही वाऱ्यावर सोडणार नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.

Follow Us
कणाहीन निवडणूक आयोगाची चौकशी करा; राज ठाकरेंनी थेट ज्ञानेश कुमार...
निवडणूक आयोगाचीच चौकशी करा; राज ठाकरेंनी थेट ज्ञानेश कुमारांना घेरलं
दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी सरकार तत्पर; मंत्री चंद्रशेखर बावनकुळे...
दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी सरकार तत्पर; मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी दिली महत्त्वाची माहिती
राहुल गांधींचा निवडणूक आयोगाला इशारा; ‘वेळ आल्यावर...
Rahul Gandhi : राहुल गांधींचा निवडणूक आयोगाला इशारा; ‘वेळ आल्यावर... नेमकं प्रकरण काय?
मुख्यमंत्री फडणवीस अमरावती वाशिम दौऱ्यावर दुष्काळी परिस्थितीचा घेणार..
मुख्यमंत्री फडणवीस अमरावती वाशिम दौऱ्यावर दुष्काळी परिस्थितीचा घेणार आढावा
ज्ञानेश कुमार यांच्यामागचा बॉस कोण? संजय राऊतांनी सरळ नावचं सांगून...
ज्ञानेश कुमार यांच्यामागचा बॉस कोण? संजय राऊतांनी सरळ नावचं सांगून टाकलं
अशोक उईकेंचं अभिजीत दीपकेंना थेट आव्हान; आश्रमशाळ मुद्द्यावरून...
अशोक उईकेंचं अभिजीत दीपकेंना थेट आव्हान; आश्रमशाळांच्या मुद्द्यावरून मोठा वाद
लालबागच्या राजाच्या चरणस्पर्श दर्शनाची रांग बंद, मुखदर्शनासाठी गर्दी..
Lalbaugcha Raja 2026 : लालबागच्या राजाच्या चरणस्पर्श दर्शनाची रांग बंद, मुखदर्शनासाठी गर्दी कायम
अभिनेता अजय देवगणला महापालिकेचा मोठा धक्का, थेट जुहूमधील बंगल्याला...
अभिनेता अजय देवगणला महापालिकेचा मोठा धक्का, थेट जुहूमधील बंगल्याला नोटीस
साहेब पाण्याचा थेंब नाही, बाजारात गेलो होतो पण...मुख्यमंत्र्यांपुढे...
Devendra Fadnavis : साहेब पाण्याचा थेंब नाही, बाजारात गेलो होतो पण...मुख्यमंत्र्यांपुढे हात जोडत शेतकरी ढसा ढसा रडला
निवडणूक आयोगावर बोलताना राऊतांची जीभ घसरली; त्या वक्तव्यावरून...
Ram Kadam : निवडणूक आयोगावर बोलताना राऊतांची जीभ घसरली; त्या वक्तव्यावरून राम कदमांचा पलटवार