
आशिया कपमध्ये भारत आणि पाकिस्तानमधील सामना धावपट्टीऐवजी राजकीय मैदानावर रंगला आहे. चार महिन्यांपूर्वी पहलगाम हल्ला आणि त्यानंतर भारत-पाकिस्तानमधील संघर्षात देश एकसंघ झाला होता. रक्त आणि पाणी एकत्र वाहणार नाही असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ठणकावलं होतं. पण आता आशिया कपमध्ये भारत-पाकिस्तानचा सामना होणार आहे. त्याविरोधात उद्धव सेना आक्रमक झाली आहे. 14 सप्टेंबर रोजी सेनेची महिला आघाडी माझं कुंक, माझा देश असं आंदोलन करणार आहे. त्यापूर्वी उद्धव ठाकरेंची (Uddhav Thackeray criticized PM Narendra Modi) आज अशी तोफ धडाडली.
पाकिस्तान शिल्लकच नसता राहिला
मोदी आणि भाजपवाले म्हणतात त्यावेळी सरदार पटेल पंतप्रधान हवे होते. पण मला वाटतं आज सरदार पटेल पंतप्रधान हवे होते. कारण सरदार पटेल असते तर आजपर्यंत पाकिस्तान शिल्लक राहिला नसता. आणि पाकिस्तानसोबत क्रिकेट खेळण्याचा प्रश्न शिल्लक राहिला नसता, असा खणखणीत टोला उद्धव ठाकरे यांनी भाजपला लगावला.
सिंदूर रक्षा आंदोलन
उद्या शिवसेनेच्या वतीने निषेध राज्यभर केला जाणार आहे. देशभक्तांनी देशभरात निषेध करावा. पाकिस्तानवर चढाई केली होती. त्याला यांनी नाव चांगलं ठेवलं. ऑपरेशन सिंदूर, ऑपरेशन महादेव. उद्याच्या मॅचला काय नाव ठेलं माहीत नाही. त्यांनी हर घर सिंदूर मोहीम राबवली होती. तीव्र विरोध झाल्याने त्यांनी ही मोहीम गुंडाळली होती. आता हर घरसे सिंदूर ही मोहीम राबवून मोदींना पाठवली पाहिजे, असे उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले.
आम्ही तर पाठवतोच. उद्या रविवार आहे. संध्याकाळी मॅच आहे. उद्या ११ वाजता महिला आघाडीच्या कार्यकर्ता चौकात जमतील आणि डब्यात सिंदुराच्या पुड्या टाकतील आणि हे सर्व सिंदूर मोदींना त्यांच्या कार्यालयात पाठवणार आहोत. हर घरसे सिंदूर मोदींना पााठवणार आहे. आताच ही वेळ आहे. देशवासियांना सांगतो. मोदींना दमदारपणे सांगायला पाहिजे की नही होगा, असे उद्धव ठाकरे यांनी आजच्या पत्रकार परिषदेतून ठणकावले. ठाकरे सेनेची महिला आघाडी रविवारी सिंदूर रक्षा आंदोलन करणार आहे. माझं कुंक, माझा देश असा संदेश या आंदोलनातून देण्यात येणार आहे.