उर्फी प्रकरण थांबणार कधी; चित्रा वाघ यांना दुसरा नंगानाच चालतो का? पुन्हा का उफाळून आला वाद…

महादेव कांबळे, Tv9 मराठी

Updated on: Jan 24, 2023 | 11:15 PM

अनेकांनी उर्फी जावेद हिच्याबरोबरच दुसऱ्या अभिनेत्रीच्या अंगप्रदर्शनावरतीही सवाल उपस्थित करून हे तुम्हाला चालतं का असा सवाल चित्रा वाघ यांना करण्यात आला आहे.

उर्फी प्रकरण थांबणार कधी; चित्रा वाघ यांना दुसरा नंगानाच चालतो का? पुन्हा का उफाळून आला वाद...

मुंबईः राज्याच्या राजकारणात अनेक नवनव्या घडामोडी घडत असतानाच उर्फी जावेद आणि चित्रा वाघ यांचा शांत झालेला असतानाच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या नेत्या मनिषा कायंदे यांनी तो पुन्हा उखरून काढला. चित्रा वाघ आणि उर्फी जावेद हा वाद गेल्या काही दिवसांपासून शांत होता मात्र आज मनिषा कायंदे यांनी एका शरीर सौष्ठव स्पर्धेतील महिला बॉडी बिल्डरचा फोटो ट्विट करत चित्रा वाघ यांनी सवाल केला आहे.

त्याला भाजपच्या चित्रा वाघ यांनीही तेवढ्याच जोरदार पणे त्यांनी उत्तर दिले आहे. त्यामुळे आता हा पुन्हा मिठलेला वाद पुनश्च उफाळून येणार असल्याचे दिसून येत आहे.

ठाकरे गटाच्या नेत्या मनिषा कायंदे यांनी शांत झालेला वाद एका ट्विटमुळे त्यांनी पु्न्हा डिवचला आहे. त्यामुळे चित्रा वाघही संतापल्या आहेत. 2020 मध्ये शरीरसौष्ठव स्पर्धेतील महिला बॉडी बिल्डरच्या गौरवप्रसंगीचा फोटा ट्विट करून चित्रा वाघ यांना डिवचण्याचा प्रयत्न केला आहे.

त्यावर चित्रा वाघ यांनी तो फोटो शरीर सौष्ठव स्पर्धेतील आहे एवढं तरी कळतं का तुम्हाल असं म्हणत मनिषा कायंदे यांनाच प्रतिसवाल केला आहे. त्यामुळे शांते झालेल्या वादाला आता नव्याने फोडणी मिळाली आहे.

चित्रा वाघ यांनी अभिनेत्री उर्फी जावेदच्या अंगप्रदर्शनावर सवाल उपस्थित केला होता. त्यावर त्यांनी माध्यमांबरोबरच त्यानी सोशल मीडियावर आपली भूमिका स्पष्ट केली होती.

त्यामुळे अनेकांनी उर्फी जावेद हिच्याबरोबरच दुसऱ्या अभिनेत्रीच्या अंगप्रदर्शनावरतीही सवाल उपस्थित करून हे तुम्हाला चालतं का असा सवाल चित्रा वाघ यांना करण्यात आला आहे.

सोशल मीडियावरही चित्रा वाघ यांना अनेक सवाल उपस्थित केले जात असल्याने तुम्ही चार भिंतीच्या आत काय करता तो तुमचा प्रश्न आहे. पण तुम्ही बाहेर सार्वजनिकरित्या जर हे नागडे नाचणार असाल तर आम्ही ते खपवून घेणार नाही ही आमची भूमिका कालही होती आजही आणि उद्यासुद्धा राहील असा सडेतोड उत्तर चित्रा वाघ यांनी दिले होते.

आता मनिषा कायंदे यांनी ट्विटरवर त्यांना सवाल केला असला तरी आणि त्यांना चित्रा वाघ यांनी प्रतिसवाल केला असल्यामुळे हा वाद आणखी वाढणार की मिठणार हे आता येणारा काळच ठरवणार आहे.

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI