AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Mumbai Bandra Bulldozer Action: वांद्रे येथील लाठीचार्जनंतर ठाकरे गटाची तडकाफडकी पत्रकार परिषद, जातीचा रंग…

Mumbai Bandra Bulldozer Action: ठाकरे गटाचे नेते वरुण देसाई यांनी 'भाजपकडून जातीचा, धर्माचा रंग देण्याचा अतिशय घाणेरडा प्रकार करण्यात आला' असे म्हटले आहे. त्यांच्या वक्तव्याची सर्वत्र चर्चा सुरु आहे.

Mumbai Bandra Bulldozer Action: वांद्रे येथील लाठीचार्जनंतर ठाकरे गटाची तडकाफडकी पत्रकार परिषद, जातीचा रंग...
Varun SardesaiImage Credit source: Tv9 Network
| Updated on: May 20, 2026 | 6:22 PM
Share

मुंबईतील वांद्रे पूर्व रेल्वे स्थानक परिसरातील गरीब नगर भागात रेल्वे प्रशासनाची अतिक्रमण हटाव मोहीम सुरु आहे. दुसऱ्या दिवशी ही मोहिम सुरु असताना रहिवास्यांनी पोलिसांवर दगडफेक केली. दरम्यान, ठाकरे गटाचे नेते वरुण देसाई यांनी या प्रकरणावर प्रतिक्रिया देत, ‘भाजपकडून जातीचा, धर्माचा रंग देण्याचा अतिशय घाणेरडा प्रकार करण्यात आला’ असे म्हटले आहे. त्यांनी, “आपल्याला सर्वांना माहिती आहे की ब्रीफ करायला, आपल्याला माहिती द्यायला पश्चिम रेल्वेचे अधिकारी तेथे होते. पण प्रत्येक गोष्टीमध्ये राजकारण आणायचं, प्रत्येक गोष्टीमध्ये हिंदू मुस्लीम नरेटीव्ह तयार करायचा ही भाजपची जुनी स्ट्ऱॅटर्जी आहे ती परत एकदा प्रयत्न केला. जे काम रेग्युलर इनफ्रास्ट्रकचरसाठी होणार होतं, जे काम रेग्युलर इनफ्रास्ट्रकचरसाठी होणार होतं त्याला जातीचा, धर्माचा रंग देण्याचा अतिशय घाणेरडा प्रकार हा भाजपकडून करण्यात आला” असे म्हटले आहे.

पत्रकार परिषदेत बोलताना वरुण सरदेसाई म्हणाले की, सोशल मीडियाच्या माध्यमातून, आता भाजपाचा महापौर मुंबईत झालाय म्हणून डिमॉलिशन करण्यात आलं. आता मुख्यमंत्र्यांच्या वतीने हे करण्यात आले. मग ह्याच्यामध्ये शिवसेनेला म्हणजे आम्हाला आणि वरुण सरदेसाईंना धक्का लागला असे काय काय व्हिडीओ तयार करुन म्हणजे दररोज व्हायरल करतात. आपण मुंबईमध्ये पाहिलं तर रोड व्हाइटनिंग करता, एसआरएच्या कामा करता, नाल्यांच्या व्हाइटनिंग करता, दररोज डिमॅलिश होत असतात. इन्फ्रास्ट्रक्चर करताना आपल्याला ते करावं लागतं. यामध्ये आमची मागणी ही सरळ सोपी एवढीच होती की या संपूर्ण गरीब नगरमध्ये 2021 साली सर्वे झाला होता. तो सर्वे जेव्हा झाला त्यावेळी त्या सर्वेमध्ये जेवढ्या घरांचा सर्वे झाला त्या सगळ्या घरांना हायकोर्टाने सांगितलं की त्यांचे अधिकार अबाधित ठेवावे, त्यांचे राइट्स प्रोटेक्ट करावेत. तिकडच्या काही रहिवास्यांनी आमदार या नात्याने मला त्यांनी सांगितलं की सगळ्या घरांचा सर्वे हा झालेला नाहीये 2021 साली जे तेव्हाचे आमदार होते खरंतर त्यांची ही जबाबदारी होती की जर अर्धाच सर्वे झाला आहे तर तो त्यांनी पूर्ण करुन घ्यायला पाहिजे होता. पण ते जेव्हा निष्क्रीय होते तेव्हा काम केले नाही आणि मग तेव्हा माझ्या हे लक्षात आले तेव्हा मी डीव्हीजनल रेल्वे मॅनेजर यांची भेट घेतली त्यांना सांगितले की विकासाला अजिबात विरोध नाही.

पुढे ते म्हणाले, वांद्रे पूर्व स्थानक हे स्वच्छ व्हावं हे मी निवडणुकीला जेव्हा लढलो तेव्हापासून दिलेलं वचन आहे. मी त्यावर विधानसभेत भाषण केलं, प्रत्येक अधिवेषनामध्ये मी हा मुद्दा मांडला आहे आणि वारंवार मी यावर बोलत आलो आहे. गेल्या आठवड्यामध्ये अश्विनी भिडे मॅडम यांची भेट घेतली तिथे सॅटीस प्रकल्प राबवला पाहिजे या करता मी प्रयत्न करतो. त्यामुळे या प्रकल्पाला हे होतय हे चांगलच आहे. सर्वे झाला असता तर जसं बऱ्यापैकी जसं हायकोर्टाने 100 लोकांचे राइट्स हे अबाधित ठेवले तसे बाकी लोकांचेही ठेवले असते. त्यांच्या कागद पत्राची तपासणीही शासनाने केली असती. एवढा सरळ सोपा विषय हा असताना याला मुद्दामून धार्मिक रंग देणं, माझा प्रश्न असा आहे जर हे बांग्लादेशी होते तर यांची घर तोडली आता हे कुठे गेले? ही जबाबदारी आता किरीट सोमैयांची नाही? असा सवाल वरुण सरदेसाईंनी केली आहे.

Follow Us
CJP नेते पुन्हा रस्त्यावर उतरणार! अभिजीत दीपकेंचा मोठा इशारा;
CJP नेते पुन्हा रस्त्यावर उतरणार! अभिजीत दीपकेंचा मोठा इशारा; म्हणाले, बॉन्डवर स्वाक्षरी...
शिवाजी पार्कला वॉर झोन बनवलंय का? अमित ठाकरे पोलिसांवर संतापले, थेट...
शिवाजी पार्कला वॉर झोन बनवलंय का? अमित ठाकरे पोलिसांवर संतापले, थेट दिलं आव्हान!
CJP नेत्यांना जामीन मिळताच आशुतोष रांकांचा मोदी सरकारवर हल्लाबोल;
CJP नेत्यांना जामीन मिळताच आशुतोष रांकांचा मोदी सरकारवर हल्लाबोल; म्हणाले, 'भारतासाठी...
एक स्वाक्षरी लोकशाहीसाठी; संदीप देशपांडेंची मोहीम, सरकारला थेट आव्हान!
एक स्वाक्षरी लोकशाहीसाठी; संदीप देशपांडेंची मोहीम, सरकारला थेट आव्हान!
CJP प्रवक्ते आशुतोष रांका यांचं जामिनानंतर पहिलंच ट्वीट; ज्ञानेश कुमार
CJP प्रवक्ते आशुतोष रांका यांचं जामिनानंतर पहिलंच ट्वीट; ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीवर ठाम
अवमान प्रकरणी दिल्ली पोलिसांना सुप्रीम कोर्टाची नोटीस, सुनावणीत नेमकं
मोठी बातमी! अवमान प्रकरणी दिल्ली पोलिसांना सुप्रीम कोर्टाची नोटीस, सुनावणीत नेमकं काय घेडलं?
मोठी बातमी! महाराष्ट्रातील कृषी संकटावर फडणवीसांची केंद्राकडे मोठी...
मोठी बातमी! महाराष्ट्रातील कृषी संकटावर फडणवीसांची केंद्राकडे मोठी मागणी, शेतकऱ्यांना मिळणार दिलासा?
जामिनावर सुटका होताच अभिजीत दीपके थेट सिब्बल यांच्या निवासस्थानी;
जामिनावर सुटका होताच अभिजीत दीपके थेट सिब्बल यांच्या निवासस्थानी; बैठकीत घेतला मोठा निर्णय
15-20 अज्ञातांनी माझं अपहरण केलं होतं, युट्यूबर ध्रुव राठीचा ट्विट...
Dhruv Rathee | 15-20 अज्ञातांनी माझं अपहरण केलं होतं, युट्यूबर ध्रुव राठीचा ट्विट करत आरोप
भाजपचे 4 प्रमुख नेते वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत; सहा महिन्यात...
भाजपचे 4 प्रमुख नेते वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत; सहा महिन्यात... बड्या नेत्याच्या दाव्याने खळबळ