Water Supply : पुढील आठवड्यात दोन दिवस मुंबईतील काही ठिकाणी पाणीपुरवठा बंद

उपरोक्त नमूद कालावधीत पाणीकपातीपूर्वी अगोदरच्या दिवशी पाण्याचा आवश्यक साठा करुन ठेवावा. तसेच, कपातीच्या कालावधीत काटकसरीने पाणी वापरुन सहकार्य करावे, अशी विनंती बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे.

Water Supply : पुढील आठवड्यात दोन दिवस मुंबईतील काही ठिकाणी पाणीपुरवठा बंद
पुढील आठवड्यात दोन दिवस मुंबईतील काही ठिकाणी पाणीपुरवठा बंद
Follow us
| Updated on: Mar 10, 2022 | 8:28 PM

मुंबई : बृहन्‍मुंबई महानगरपालिकेतर्फे लोअर परळ येथे सेनापती बापट मार्गावर गावडे चौकात 1450 मिलीमीटर व्यासाच्या तानसा पूर्व व पश्चिम मुख्य जलवाहिनीवरील गळती दुरुस्त (Repair) करण्याचे काम हाती घेण्यात येणार आहे. यामुळे सोमवार 14 मार्च 2022 रोजी सकाळी 8 ते मंगळवार 15 मार्च 2022 रोजी दुपारी 2 वाजेपर्यंत महानगरपालिकेच्या जी/दक्षिण आणि जी/उत्तर विभागातील काही परिसरांमध्ये पाणीपुरवठा (Water Supply) होणार नाही. तर जी/दक्षिण विभागातील काही परिसरांमध्ये कमी दाबाने पाणीपुरवठा करण्यात येईल. (Water supply to some parts of Mumbai will be cut off for two days next week)

या विभागात पाणीपुरवठा बंद

जी/दक्षिण विभाग : डिलाई रोड बी. डी. डी., संपूर्ण प्रभादेवी परिसर, जनता वसाहत, संपूर्ण लोअर परळ विभाग, पांडुरंग बुधकर मार्ग, सेनापती बापट मार्ग, गणपतराव कदम मार्ग, ना. म. जोशी मार्ग, वीर सावरकर मार्ग, एस. एस. अमृतवार मार्ग – (सोमवार दिनांक 14 मार्च 2022 रोजी दुपारी 2.30 ते दुपारी 3.30 वाजता डिलाई रोड पाणीपुरवठा आणि दुपारी 3.30 ते सायंकाळी 7.00 वाजता शहर पाणीपुरवठा – (ही नियमित पाणीपुरवठ्याची वेळ) – पाणीपुरवठा होणार नाही).

जी/उत्तर विभाग : संपूर्ण प्रभादेवी परिसर, सेनापती बापट मार्ग, वीर सावरकर मार्ग, गोखले मार्ग, एल. जे. मार्ग, सयानी मार्ग, भवानी शंकर मार्ग, सेनाभवन परिसर, मोरी मार्ग, टी. एच. कटारिया मार्ग, कापड बाजार, पूर्ण माहीम (पश्चिम) विभाग, माटुंगा (पश्चिम) विभाग, दादर (पश्चिम) विभाग – (सोमवार दिनांक 14 मार्च 2022 रोजी दुपारी 4 ते सायंकाळी 7 वाजता तसेच सायंकाळी 7 ते रात्री 10 वाजता – (ही नियमित पाणीपुरवठ्याची वेळ) – पाणीपुरवठा होणार नाही).

जी/दक्षिण विभाग : ना. म. जोशी मार्ग, डिलाई रोड बी.डी.डी., सखाराम बाळा पवार मार्ग, महादेव पालव मार्ग – (मंगळवार दिनांक 15 मार्च 2022 रोजी पहाटे 4.30 ते सकाळी 7.45 वाजता डिलाई रोड पाणीपुरवठा – (ही नियमित पाणीपुरवठ्याची वेळ) – पाणीपुरवठा होणार नाही)

या विभागात कमी दाबाने पाणीपुरठा

जी/दक्षिण विभाग : धोबीघाट, सातरस्ता – (मंगळवार दिनांक 15 मार्च 2022 रोजी पहाटे 4 ते सकाळी 7 वाजता डिलाई रोड पुरवठा – (ही नियमित पाणीपुरवठ्याची वेळ) – पाणीपुरवठा कमी दाबाने होईल)

संबंधित परिसरातील नागरिकांना आवाहन करण्यात येते की, उपरोक्त नमूद कालावधीत पाणीकपातीपूर्वी अगोदरच्या दिवशी पाण्याचा आवश्यक साठा करुन ठेवावा. तसेच, कपातीच्या कालावधीत काटकसरीने पाणी वापरुन सहकार्य करावे, अशी विनंती बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे. (Water supply to some parts of Mumbai will be cut off for two days next week)

इतर बातम्या

‘मनसे’पेक्षा कमी राजकीय वय असलेल्या ‘आप’ची जादू कशी काय चालली?

जावेद भाई अपना हार्मोनीयम पैक कर लो सलीम भाई को गाना सुनना हैं, मोहीत कंबोज यांचा राऊतांना टोला

Non Stop LIVE Update
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.