Uday Samant: आमचं सगळीकडं लक्ष… ऑपरेशन टायगरबाबत उदय सामंत यांचा बॉम्ब… ठाकरे सेना कुठं कुठं फुटणार?

Uday Samant on Operation Tiger : नाशिक महापालिकेतील 10-12 नगरसेवक शिंदे सेनेच्या वाटेवर असल्याचा दावा करण्यात येत आहे. ऑपेरशन टायगरची धास्ती अजून कमी झाली नसल्याचा शिंदे गोटाच्या नेत्यांचा दावा आहे. त्यात मंत्री उदय सामंत यांनी एक बॉम्ब टाकला आहे.

Uday Samant: आमचं सगळीकडं लक्ष... ऑपरेशन टायगरबाबत उदय सामंत यांचा बॉम्ब... ठाकरे सेना कुठं कुठं फुटणार?
उदय सामंत, उद्धव ठाकरे
| Updated on: Jul 10, 2026 | 12:49 PM

Uday Samant on Operation Tiger : ऑपरेशन टायगरचा अजून एक पदर समोर आला आहे. नाशिकमधील ठाकरे सेनेचे 10-12 नगरसेवक शिंदे गटाच्या संपर्कात असल्याचा दावा करण्यात येत आहे. कामासाठी निधी देण्याचे आमिष दाखवून नगरसेवक फोडण्याचा प्रयत्नही सुरू असल्याचा आरोप ठाकरे सेनेने केला आहे. या घटनाक्रमामुळे नाशिकमधील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. तर त्यातच मंत्री उदय सामंत यांनी ऑपरेशन टायगरबाबत मोठे सूचक वक्तव्य केले आहे.

आमचं सगळीकडं लक्ष

नाशिकमध्ये ऑपरेशन टायगर सुरू असण्याची शक्यता नाकारता येत नाही, असे मंत्री उदय सामंत म्हणाले. आमचे सगळीकडे लक्ष आहे असे सूचक वक्तव्य करत केवळ नाशिकच नाही तर इतर अनेक महापालिकांमधील नगरसेवक शिंदे सेनेत येण्यासाठी इच्छुक असल्याचे ते म्हणाले. विरोधी पक्षात बसल्यानंतर त्यांना काय समस्या उद्भवतात त्यांनाच माहिती असे म्हणत, त्यांना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली काम करायचं आहे, असा दावा सामंत यांनी केला.

मुख्यमंत्र्यांच्या भाषणावर काय प्रतिक्रिया

मंत्री उदय सामंत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भाषणावर प्रतिक्रिया दिली. मुख्यमंत्री यांचे भाषण हे प्रत्येकाने ऐकलं पाहिजे. अनावधानाने विकास कामात चूक घडली तर टीका करणं यावर देवेंद्र फडणवीस यांनी भाषण केलं आणि ते सर्वांना आवडलं. फडणवीस यांनी हिंदीत भाषण केलं नाही केवळ एक शायरी हिंदीत केली. काही लोकांना मराठी कळत नाही. मराठी भाषेचे राजकारण न करता मराठी भाषा सातासमुद्रापार जाण्याची भूमिका मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांनी घेतली, असे सामंत म्हणाले.

जयंत पाटील सुरुवातीला म्हणाले की ज्यांना गावात कुत्रे विचारत नाही ते टीका करतात. तेच शब्द मुख्यमंत्री पुढे घेऊन आले आणि त्यात एक शब्द अधिकचा वापर केला. काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष यांनी जी सरकारवर टीका केली त्यावर उत्तर देताना देवेंद्र फडणवीस यांनी भाषण केली. काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष यांचं नाव देखील घेतलं नाही, त्यांना मोठं देखील केलं नाही. देवेंद्र फडणवीस यांनी असंसदीय शब्द वापरला नाही. सकाळी 9 वाजता एक जण शिव्या देतो, असे म्हणत सामंत यांनी राऊतांवर निशाणा साधला.

महामंडळ वाटप लवकरच

महामंडळ वाटपावर चर्चा सुरू आहे. पुढच्या कालावधीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सुनेत्रा पवार एकत्रित बसतील आणि महामंडळ वाटप जाहीर करतील, असे सामंत यांनी सांगितले.

Follow Us